एवोकैडो अर्थ व फायदे Avocado Meaning in Marathi

Avocado Meaning in Marathi. Avocado fruit benefits in Marathi. मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये एवोकैडो म्हणजे काय? (avocado meaning in Marathi) आणि एवोकैडो या चमत्कारिक लाभ देणार्‍या फळाविषयी जाणून घेणार आहोत.

एवोकैडो हे एक आरोग्यदायी फळ आहे. एवोकैडो या फळामध्ये विटामीन A, विटामीन B, विटामीन E, इत्यादि विटामिन्स आढळतात तसेच फॉलिक अॅसिड, पोटाशियम, प्रोटीनस सुद्धा आढळतात. सध्या सगळीकडे एवोकैडो या फळाची क्रेझ आहे, परदेशामध्ये या फळाला खूप मोठी मागणी आहे.

Avocado Meaning in Marathi
Avocado Meaning in Marathi, Avocado fruit benefits in Marathi.

मोठ्या मागणीमुळे या फळाच्या शेतीकडे अनेकांचे लक्षं लागले आहे. जो तो एवोकैडो या फळाची शेती करण्यास उत्सुक होऊ लागला आहे. एवोकैडो हे फळ एक भरगोस उत्पन्न देणारे फळ ठरू शकते. एवोकैडो हे फळ याच्या चमत्कारिक गुणधर्मामुळे अनेक आजारांवर प्रभावी ठरू लागले आहे.

एवोकैडो हे फळ त्याच्यातील लाभकारी गुणधर्मामुळे सुपरफूड म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. एवोकैडो हे फळ नाशपती या फळाच्या वंशाचे आहे. एवोकैडो हे एक विदेशी फळ आहे. भारत देशामध्ये एवोकैडो या फळाला “मखण फल” या नावाने सुद्धा ओळखले जाते.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकामध्ये याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. एवोकैडो हे एक मेक्सिकन फळ आहे कारण मेक्सिको या शहराचा जगभरातील एकूण एवोकैडो निर्यातामध्ये 33% वाटा आहे, इतके उत्पादन मेक्सिको मध्ये केले जाते. मोठ मोठ्या परदेशी हॉटेल्समध्ये एवोकैडो या फळाच्या अनेक टेस्टी डीशेस बनवल्या जातात.

Avocado Meaning in Marathi
Avocado Meaning in Marathi, Avocado fruit benefits in Marathi.

एवोकैडो या फळाची बाजारामध्ये किंमत 600 ते 700 रुपये किलो पर्यंत आढळते. मोठ मोठ्या महानगरातील मॉल, सुपरमार्केट, फूड स्टॉल मध्ये एका फळाची किंमत तुम्हाला साधारणपणे 100 रुपये ते 150 रुपये आढळेल इतके हे फळ गुणकारी आहे.

देशातील उत्तराखंड प्रदेशामध्ये भरगोस उत्पन्नासाठी व या फळातील आरोग्यदायी गुणधर्म मिळवण्यासाठी एवोकैडो ची फळशेती केली जाते. एवोकैडो हे फळ भरगोस उत्पन्न मिळवून देणारे फळ आहे. परदेशामध्ये या फळाला मोठी मागणी आहे. विदेशी पर्यटक या फळाचे सेवन अधिक करतात

एवोकैडो या फळामध्ये एक मोठे बीज सापडते ते साधारणपणे अंड्याच्या आकाराचे असते. या फळाचे रोपटे बाजारामध्ये सहसा मिळत नाही.

Avocado Meaning in Marathi

एवोकैडो या फळाचे फायदे:  

हृदयाशी संबंधित आजारांवर एवोकैडो हे फळ लाभकरी मानले जाते तसेच गर्भधारणे शी संबंधित समस्येवर हे फळ अतिशय उपयुक्त आहे.

या फळामध्ये उपलब्ध असलेले (monounsaturated fat) मोनोसैचुरेटेड फैट हृदयांवरील आजारांवर लाभकरी आहे. तसेच मोनोसैचुरेटेड फैट मुळे शरीरातील इनसुलिन ची पातळी मेंटेन राहते, त्यामुळे मधुमेह सारखा आजार असलेल्या लोकांना हे फळ वरदान ठरले आहे.

एवोकैडो या फळापासून बनवलेल्या तेलाचा वापर त्वचेला उजळ, चमकदार बनवण्याकरिता केला जातो. या तेलाने शरीरावर हळुवार मालीश केल्याने शरीराची त्वचा उजळ तसेच त्वचेतील कोरडे पणा नाहीसा होण्यास मदत होते.

या फळामध्ये (anti inflammatory) दाहक विरोधी गुणधर्म आढळतात त्यामुळे शरीरातील कोणत्याही प्रकारची वेदना कमी होण्यास मदत होते.

एवोकैडो या फळाला anti aging (अॅंटीएजिंग) फळ असे ही म्हटले जाते या फळामधील जीवनसत्वे वाढते वय रोखू शकतात, आणि लवकर येणार्‍या व्रद्धपकाळापासून तुम्हाला दूर ठेऊ शकतात.

एवोकैडो चे नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल व प्लाज्मा ट्राइग्लिसराइड्स कमी होते व हृदयाशी संबंधित आजार बरे होतात.

या फळामध्ये उपलब्ध असलेल्या फायबरमुळे शरीरातील पाचन संस्थेशी निगडीत अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

या फळाचे सेवन केल्याने मुखाशी निगडीत आजार जसे तोंडाचा दुर्गंधयुक्त वास येणे बंद होते, कमजोर हिरड्या मजबूत होतात तसेच तोंडातील बॅक्टीरिया नष्ट होतात. या फळातील गुणधर्म शरीराच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.

एवोकैडो पासून बनवलेल्या तेलामध्ये Oleic acid linoleic acid (ओलिक एसिड लिनोलिक एसिड) आढळते, जे वाढते कोलेस्ट्रॉल थांबवते.

सूचना:

या पोस्टमध्ये लिहली गेलेली माहिती इंटरनेट वरून घेतली गेलेली आहे, वरील रोगांवर या फळाचे उपचार करण्यापूर्वी तसेच सेवन करण्यापूर्वी व या फळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करा अथवा आयुर्वेद तज्ञ यांच्याशी संपर्क साधा.

आणखी वाचा:

Vibes शब्दाचा अर्थ व उपयोग Vibes Meaning in Marathi

Kalonji Meaning in Marathi, कलौंजी बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये

If you find this post “Avocado Meaning in Marathi, Avocado fruit benefits in Marathi” helpful please share with your friends on social media.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *