माझी शाळा यावर सुंदर निबंध मराठी मध्ये. Essay on My School in Marathi

Essay on My School in Marathi

Essay on My School in Marathi for classes 1,2, 3, 4, 6, 7, 8, 9.

Essay on My School in Marathi

“स्वर्गाहुन प्रिय आहे माझी शाळा… जिथे पिकवला जातो ज्ञानाचा मळा!”

खरच प्रत्येकाच्या जीवनामध्ये शाळा ही अगदी सर्वश्रेष्ठ स्थानी आहे. शाळा ही प्रत्येक जन्माला आलेल्या मुलासाठी एक पवित्र ज्ञानमंदिर आहे जिथे ते मूल जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्ये शिकते. आई लहानपणी चालायला बोलायला शिकवते कारण आई ही लहान मुलाचा पहिला गुरु असते पण शाळा हे एक असे ज्ञानमंदिर आहे जिथे संपूर्ण जगाची ओळख होते जिथे नीतीमूल्ये, निरनिराळी शास्त्रे शिकवली जातात. अशी ही शाळा महान असते.

माझी शाळा माझ्यासाठी एक ज्ञान मंदीर आहे, माझी शाळा माझ्या जीवनातील माझ्या प्रगतीची पहिली वाटचाल आहे. माझ्या शाळेचे नाव गुरुकुल विद्यामंदिर असे आहे. माझ्या शाळेमध्ये 1 ली ते 10 वी पर्यंत चे वर्ग भरवले जातात. माझी शाळा नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता भरते आणि संध्याकाळी 5 वाजता सुटते. दर रविवारी माझ्या शाळेला सुट्टी असते.

आमच्या शाळेतील सर्व विषयांचे शिक्षक सुटीच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना घरी करण्यासाठी होमवर्क देतात. मी सध्या इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये तुकडी ‘ब’ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये तीन तुकडया आहेत. प्रत्येक तुकडी मध्ये मुलांच्या शैक्षणिक बुद्धिमते नुसार विभागणी केली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी शाळेसमोर खूप मोठे मैदान आहे.

या मैदानावर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. या मैदानावर खो-खो, क्रिकेट, कबड्डी, फूटबॉल आणि लांबउडी उंचउडी यांसारखे मैदानी खेळ भरवले जातात. माझी शाळा खूप सुंदर आहे. आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी खूप दूरचे विद्यार्थी येतात. शाळेमध्ये बाहेरगावच्या विद्यार्थाँसाठी राहण्याची स्वतंत्र सोय केली गेली आहे. बाहेरगावच्या विद्यार्थाँसाठी हॉस्टेल ची सुविधा आहे. माझ्या शाळेमध्ये अद्ययावत विज्ञान प्रयोग शाळा सुद्धा आहे. वर्गामध्ये शिकवला जाणारा विज्ञानाचा प्रत्येक तास प्रत्यक्षात विज्ञान प्रयोगशाळेमध्ये शिकवला जातो.

Essay on My School in Marathi for classes 1,2, 3, 4, 6, 7, 8, 9.

Essay on My School in Marathi

Essay on My School in Marathi for class 1,2, 3, 4, 6, 7, 8, 9.

माझ्या शाळेतील सर्व विषयांचे शिक्षक हे उच्चशिक्षित आहेत. सर्व शिक्षक स्टाफ स्वभावाने प्रेमळ आणि प्रत्येक विषय सर्व विद्यार्थ्यांना समजेपर्यत शिकवतात. माझ्या शाळेच्या पाठीमागे एक सुंदर बगीचा आहे जिथे विविध प्रकारची फुले, फळे, झाडे आहेत. माझ्या शाळेसमोर शालेय उपयोगी साहित्याचे दुकान आहे. माझ्या शाळेची इमारत खूप मोठी आहे.

शाळेच्या बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. माझ्या शाळेच्या चारी बाजूने मजबूत कुंपण बांधण्यात आले आहे. शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली गेली आहे. आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थासाठी एक नियमावली तयार करण्यात आली आहे. शाळेचे सर्व नियम सर्व विद्यार्थ्यांना पाळावे लागतात. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकसारख्या गणवेशात शाळेत यावे लागते.

शाळेतील प्रत्येक विषयाचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना एकसारखी समान वागणूक देतात. माझ्या शाळेमध्ये दररोज देशभक्तीपर गीते गायली जातात. छान छान बोधकथेच्या गोष्टी व सुविचार सांगितले जातात. माझ्या शाळेमध्ये महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

त्याचबरोबर वर्षातील महत्वाचे दिवस जसे बालक दिन, शिक्षक दिन, पालक दिन, हिंदी दिन, शाळा वर्धापन दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यांसारखे दिवस सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी केले जातात. माझ्या शाळेच्या दोन्ही बाजूला रंगबेरंगी फुलांची सजावट केली गेली आहे. माझी शाळा माझ्यासाठी अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी आहे. आमच्या शाळेतील आमचे वर्ग शिक्षक आम्हाला शालेय ज्ञानासोबत व्यवहारज्ञानाची सुद्धा ओळख करून देतात. समाजात कसे राहिले पाहिजे थोरामोठ्यांशी कसे वागले पाहिजे असे संस्कार सुद्धा आमच्यावर करतात.

आमच्या शाळेत प्रत्येक विषयाचे तास अगदी वेळेप्रमाणे घेतले जातात. दररोज प्रत्येक विषयाची चाचणी घेतली जाते. माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधनात्म्क कार्यक्रम भरवले जातात. आठवड्यातून एकदिवस चित्रकला स्पर्धा, पाढे पाठांतर, मातीच्या वस्तु तयार करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी स्पर्धा, पाठांतर, वाचन, शुद्धलेखन, बुद्धिमता चाचणी अशाप्रकारचे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या वार्षिक व सहामाही प्रगीतीचा आढावा घेण्यासाठी शाळेमध्ये पालक मीटिंग भरवली जाते.

माझ्या शाळेमध्ये प्रत्येक मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासकडे लक्ष दिले जाते, अशी ही माझी शाळा मला खूप खूप अगदी मनापासून आवडते.

आणखी वाचा:

पाळीव आणि जंगली प्राण्यांची नावे मराठी मध्ये

सर्व फळांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये

शरीर के अंगो के नाम हिंदी इंग्लिश और मराठी मे

मराठी महीने व सहा ऋतु

सूचना: जर तुम्हाला Essay on My School in Marathi for classes 1,2, 3, 4, 6, 7, 8, 9. हा निबंध आवडला असेल तर आपल्या शालेय मित्रांसोबत Essay on My School in Marathi for classes 1,2, 3, 4, 6, 7, 8, 9. हा निबंध Whatsapp किंवा Facebook वर जरूर शेअर करा.

पाळीव आणि जंगली प्राण्यांची नावे मराठी. Animals Names in Marathi

Wild Animals and Domestic Animals names in Marathi

Wild Animals and Domestic Animals names in Marathi

कित्येक वर्षांपासून मानव प्राण्यांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवना मध्ये आपली शेतीविषयक कामे करण्यासाठी करत आलेला आहे. मानवाच्या प्रगती मध्ये पाळीव प्राण्यांचा खूप मोठा वाटा आहे. बकरी, म्हैस आणि गाय यांसारखे पशु  मानवाला दुध आणि शेतीसाठी उपयोगी खत देतात. त्याचप्रमाणे जंगलात राहणारे प्राणी आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. काही प्राणी शाकाहारी असतात तर काही प्राणी मांसाहारी असतात. गाय, म्हैस, बकरी, घोडा, ससा, हरीण, यांसारखे प्राणी शाकाहारी आहेत तर वाघ, सिंह, चिता, लांडगा यांसारखे प्राणी मांसाहारी आहेत. प्राणी संग्रहालयात अनेक प्रकारचे जंगली प्राणी आपल्याला पहायला मिळतात. भारत देशामध्ये एकूण 355 प्राणिसंग्रहालय आहेत.

Wild Animals and Domestic Animals names in Marathi

Wild Animals and Domestic Animals names in Marathi

Domestic Animals names in Marathi

Wild Animals and Domestic Animals names in Marathi

Cat (कॅट) मांजर

Buffalo (बफेलो) म्हैस

Cow (काऊ) गाय

Dog (डॉग) कुत्रा

Goat (गोट) शेळी

Horse (होर्स) घोडा

Ox (ऑक्स) बैल

Pig (पिग) डुक्कर

Ass (अॅस) गाढव

Donkey (डाँकी) गाढव

Sheep (शीप) मेंढी

Hen (हेन) कोंबडी

Rabbit (रॅबिट) ससा

Wild Animals names in Marathi

Wild Animals and Domestic Animals names in Marathi

Camel(कॅमल) उंट

Bear(बेअर) अस्वल

Kangaroo (कांगारू) कांगारू

Panda (पांडा) पांडा

Zebra (झेब्रा) झेब्रा

Cheetah(चीता) चित्ता

Elephant (एलिफेंट) हत्ती

Deer (डीअर) हरीण

Fox (फॉक्स) कोल्हा

Wolf (वुल्फ) लांडगा

Fish (फिश) मासा 

Hare/Rabbit (हेअर) ससा

Male goat (मेल गोट) बोकड

Frog (फ्रॉग) बेडूक 

Giraffe (जिराफ) जिराफ

Hippopotamus (हिप्पोपोटामस) पणघोडा

Monkey (मंकी) माकड

Lion (लायन) सिंह

Mongoose (मंगूस) मुंगूस

Bison (बायसन) जंगली बैल

Boar (बोअर) रानडुक्कर

Reindeer (रेनडीअर) बरसिंगी हरिण

Stag काळवीट

Yak (याक) हिमगाय

Wolf (वुल्फ) लांडगा

Rhino (र्हायनो) गेंडा

Mouse (माऊस) उंदीर

Squirrel (स्क्विरल) खार

Tiger (टायगर) वाघ

आणखी वाचा:

सर्व फळांची नावे मराठी व इंग्रजी

शरीर के अंगो के नाम हिंदी, इंग्लिश, मराठी

मराठी महीने/हिंदू महीने व सहा ऋतु

भारत देशातील महत्वाची प्राणी प्राणिसंग्रहालये:

1. Sri Venkateswara Zoological Park -Tirupati, Andhra Pradesh

2. Jawaharlal Nehru Zoological Park -Bokaro, Jharkhand

3. National Zoological Park -Delhi, New Delhi

4. Padmaja Naidu Himalayan Zoological Park -Darjeeling, West Bengal

5. Amirtha Zoological Park -Vellore, Tamil Nadu

6. Nandankanan Zoological Park – Bhubaneswar, Odisha

7. Indira Gandhi Zoological Park -Visakhapatnam, Andhra Pradesh

8. Nehru Zoological Park -Hyderabad, Telangana

9. Sakkarbaug Zoological Park -Junagadh, Gujarat

error: Content is protected !!