संगणकाची संपूर्ण माहिती सर्व भागांसहित | Computer Information in Marathi
Computer Information in Marathi, संगणकाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये.
मित्रांनो कम्प्युटर हा आपल्या जीवनातील अति महत्वाचा घटक बनला आहे. सध्या मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. दैनदीन जीवनातील छोटी मोठी कामे सध्या कम्प्युटरच्या मदतीनेच पार पाडली जात आहेत,
जसे हिशोब ठेवणे, ईमेल करणे, ऑनलाइन फॉर्म भरणे, कामगारांची नोंद, पगार पत्रक, फोटो विडियो एडिटिंग, पैसे पाठवणे, ऑनलाइन खरेदी विक्री करणे, इमारतीचे डिजाइन बनवणे, ड्रॉइंग, डिजिटल जाहिरात, ऑनलाइन रीचार्ज, गेम, जॉब अॅप्लिकेशन आणि न्यूज पाहणे अशी अनेक कामे केली जात आहेत.

कम्प्युटर ने पूर्ण जग बदलून टाकलं आहे, अगदी मानवाच्या कल्पनेच्या जगातील गोष्टी कम्प्युटर ने प्रत्यक्ष सत्यात उतरून दाखवल्या आहेत. कम्प्युटर हे मानवाला लाभलेल अनमोल वरदान आहे. पूर्वी जे काम करण्यासाठी 100 माणसांची गरज पडायची ती कामे आता कम्प्युटर काही वेळा मध्येच पूर्ण करत आहे.
संगणकाच्या मदतीने मानवाने त्याच्या जीवनात खूप मोठी प्रगति केली आहे, मानवाच्या कल्पना विश्वातील सर्व गोष्टी संगणकाने साध्य करून दाखवल्या आहेत. अस कोणतही क्षेत्र नाही जिथे संगणकाचा वापर केला जात नाही. खेळ, आरोग्य, संरक्षण, शिक्षण, व्यवसाय, पत्रकारिता, व कला अशा अनेक क्षेत्रात संगणकाने आपली कामगिरी अचूकपणे पार पाडली आहे.
आरोग्य क्षेत्रात मोठी मोठी जटिल शस्त्र क्रिया आता संगणकाच्या मदतीने काही वेळात केली जात आहे. उद्योग क्षेत्रातील व्यवसायामध्ये मोठ मोठी कामे कम्प्युटर नियंत्रित रोबोट च्या मदतीने केली जात आहेत.
शिक्षण क्षेत्रात सुद्धा संगणकाचे काम उल्लेखनीय आहे, जगातील करोडो विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिक्षण देणे ऑनलाइन क्लास च्या माध्यमातून संगणकामुळे शक्य झाले आहे.
संरक्षण क्षेत्रात सुद्धा संगणकाने खूप मोठी प्रगती केली आहे. शत्रूची निगराणी करणे, शत्रूच्या हालचाली टिपणे, मोठी मोठी घातक क्षेपणास्त्रे, दारू गोळा, बंदुका संगणकाच्या मदतीने नियंत्रित करणे शक्य झाले आहे. 20 व्या व 21 व्या शतकातील मानवाला संगणक हे वरदान सिद्ध झाले आहे. दिवसेंदिवस संगणकामध्ये बदल होत चालले आहेत.
संगणकाची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संगणकाची काम करण्याची गती, पद्धत, अचूकता या सर्व गोष्टी विकसित होत चालल्या आहेत. रोज नवे हार्डवेअर, सॉफ्टवेअर मार्केट मध्ये नव्याने येऊ लागले आहेत.
मित्रांनो संगणक हा टॉपिक अभ्यासासाठी खूप मोठा आहे, त्यामध्ये जेवढे आपण जाणून घेऊ तेवढं कमीच आहे. मित्रांनो आज आपण या छोट्याशा लेखामध्ये संगणकाची बेसिक माहिती जाणून घेणार आहोत.
कम्प्युटर बद्दल माहिती, Computer information in Marathi.
सरकारी निमसरकारी क्षेत्रातील कम्प्युटरचा उपयोग:
संगणकाचा उपयोग सरकारी निमसरकारी कार्यालये, जसे बँक, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद कार्यालय, RTO, PWD, शाळा, महाविद्यालये, अशा अनेक विभागामध्ये कम्प्युटर चा उपयोग केला जात आहे.
कम्प्युटर सॉफ्टवेअर computer software:
हा कम्प्युटर च्या अशा प्रोग्राम्स चा एक समुह आहे जो कम्प्युटर च्या हार्डवेअर ला नियंत्रित करतो.
कम्प्युटर हार्डवेअर computer hardware
संगणकाच्या या विभागामध्ये संगणकाचे सर्व हार्डवेअर चे भाग येतात, कम्प्युटरच्या ज्या भागांना आपण स्पर्श करू शकतो अशा भागांना कम्प्युटर चे हार्डवेअर असे म्हणतात. ज्या मध्ये motherboard, mouse, keyboard, monitor, cpu इत्यादि भाग येतात.
parts of computer in Marathi (संगणकाचे प्रमुख भाग)
1) keyboard

कीबोर्ड हा संगणकाची एक महत्वाचा भाग आहे जो संगणकाला keys च्या माध्यमातून सूचना देण्याचे काम करतो. कीबोर्ड हा कम्प्युटरचा इनपुट डिवाइस आहे. कीबोर्ड चा उपयोग संख्यात्मक माहिती, अल्फाबेटिकल माहिती तसेच इतर functional माहिती पुरवण्यासाठी केला जातो.
कीबोर्ड व माऊस द्वारे पुरवलेली माहिती मशीन लॅंगवेज मध्ये कन्वर्ट होऊन cpu कडे जाते आणि cpu कीबोर्ड, व माऊस द्वारे मिळालेल्या माहिती वर प्रक्रिया करून ती माहिती मॉनिटर च्या मदतीने स्क्रीन वर डिसप्ले करतो. एका नॉर्मल कीबोर्ड वर कमीत कमी 104 keys असतात.
Function keys (f1 ते f12): कीबोर्ड च्या वरच्या बाजूला f1 ते f12 पर्यंत keys असतात ज्यांना function कीज असे म्हटले जाते, या फंकशन कीज चे काम प्रत्येक प्रोग्राम नुसार वेगवेगळे असते.
Alphanumerical keys: या keys चा जास्तीत जास्त उपयोग typing करण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये संख्या व अक्षरे यांचा समावेश आहे.
2) Mouse

माऊस हा एक इनपुट डिवाइस आहे जो स्क्रीन वरील कर्सरला कंट्रोल करतो. आपण माऊस(कर्सर) च्या मदतीने स्क्रीन वरील फाइल, फोल्डर, इमेज, विडियो, सॉफ्टवेअर प्रोग्राम उघडणे बंद करणे इत्यादि कामे करू शकतो.
माऊस च्या मदतीने आपण कम्प्युटरला सुचना देऊ शकतो तसेच कम्प्युटरच्या प्रत्येक भागामध्ये कर्सरच्या मदतीने प्रवेश करू शकतो. प्रत्येक माऊस मध्ये कमीत कमी दोन buttons नक्की असतात जे बटन माऊस च्या उजव्या बाजूला असते त्याला आपण right button व माऊसच्या डाव्या बाजूला असणार्या button ला आपण left button से म्हणू शकतो.
माऊस च्या राइट आणि लेफ्ट बटन च्या मध्यभागी एक स्क्रोल व्हील (scroll wheel) असते, जे page ला खाली आणि वर स्क्रोल करण्यासाठी use केले जाते.
3) CPU

cpu चा लॉन्ग फॉर्म central processing unit (सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट) आहे. cpu हा कम्प्युटरचा इलेक्ट्रोनिक मेंदू आहे. cpu कम्प्युटरला जोडलेल्या वेगवेगळ्या हार्डवेअर च्या उपकरणांना नियंत्रित करण्याचे काम करतो आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स, अॅप्लिकेशनस आणि हार्डवेअर यांचे काम सुरळतीपणे चालू ठेवण्यास मदत करतो. cpu अंकगणित, तार्किक, इनपुट, आउटपुट अशी अनेक कार्ये व्यवस्थितीपणे पार पाडतो.
4) Monitor

मॉनिटर हे संगणकाचे आउटपुट उपकरण आहे जे (cpu) संगणकाद्वारे प्रक्रिया केलेली माहिती संगणकाच्या उपयोग कर्त्याला मॉनिटरच्या स्क्रीन वर प्रदर्शित करते.
संगणकाची व्याख्या definition of computer in Marathi
संगणक एक अशी मशीन किंवा उपकरण आहे जे सॉफ्टवेअर, हार्डवेअर प्रोग्रामद्वारे दिलेल्या सूचनांच्या आधारे प्रक्रिया, गणना आणि ऑपरेशन्स करते आणि प्रक्रिया केलेली माहिती मॉनिटर च्या साहय्याने स्क्रीनवर डिसप्ले करते.
संगणकाचे प्रकार Types of computer in Marathi
Personal computer (वैयक्तिक कम्प्युटर)
a) Desktop Computer(डेस्कटॉप कम्प्युटर)(PC): डेस्क, आणि टेबलच्या पृष्ठभागावर हा कम्प्युटर ठेवला जातो म्हणून ह्या कम्प्युटर ला डेस्कटॉप कम्प्युटर असे म्हटले जाते. हा कम्प्युटर घरातील व ऑफिस मधील विजेवर (इलेक्ट्रिक करंट) चालतो.

b) Laptop(लॅपटॉप): लॅपटॉप हा कम्प्युटर सहजपणे कुठेही घेऊन जाता येतो. हा कम्प्युटर बॅटरी वर चालतो. लॅपटॉप चालू ठेवण्यासाठी लॅपटॉप मधील बॅटरी मध्ये चार्जिंग असणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यामधील बॅटरी गरजेनुसार वेळोवेळी चार्ज करावी लागते. हा कम्प्युटर कुठेही वापरता येतो, जसे घर, ऑफिस, कामाच्या ठिकाणी, शाळा, क्लास, किवा गार्डन इत्यादि.

final words: मित्रांनो “Computer Information in Marathi” या पोस्ट मध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.