कोरोनावर लस तयार केल्याचा दावा करणारे बबन शिंदे नेमके आहेत तरी कोण?

कोरोनावर लस तयार केल्याचा दावा करणारे बबन शिंदे नेमके आहेत तरी कोण? चला जाणून घेऊया बबन शिंदे यांच्याबद्दल!

आज आपण पाहतोय आपला संपूर्ण भारत देश नव्हे तर संपूर्ण जग कोरोना महामारीने हैराण झालं आहे. अशा वाईट परिस्थिति मध्ये एक आशेचा किरण म्हणून एक प्रौढ व्यक्तिमत्व बबन शिंदे यांच्या नावान समोर आल आहे.

आज संपूर्ण जग कोरोंना महामारी वर औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहे पण अद्याप कोणत्याही देशाला कोरोना महामारीवर औषध शोधण्यात यश मिळालेल नाही. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील एका वैदू समाजातील बबन शिंदे यांनी चक्क कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे.

बबन शिंदे यांनी समाजातील अनेक लोकांना सर्वसाधारण तसेच संसर्ग जन्य आजारांतून आयुर्वेदिक औषध देऊन मुक्त केलेलं आहे. बबन शिंदे यांचा दुर्मिळ जडीबुटी पासून तसेच झाड पाल्यांपासून बनवलेल औषध देण्याचा आणि रुग्णांना सर्वसामान्य आजारातून मुक्त करण्याचा व्यवसाय फार काळा पासून चालत आलेला आहे. पांढर्‍या कोडा सारख्या त्वचारोगाने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना बबन शिंदे यांचं आयूर्वेदिक औषध वरदान ठरलं आहे.

बबन शिंदे यांचे आई वडील सुद्धा जडीबुटी पासून, तसेच झाड पाल्यांपासून बनवलेल औषध देण्याचा व्यवसाय करत होते आणि तोच वारसा बबन शिंदे यांनी पुढे चालू ठेवला आहे. बबन शिंदे यांनी News 24 Sahyadri ला दिलेल्या मुलाखती मध्ये म्हटलय कि, बबन शिंदे यांचं शालेय शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत झालेल आहे, दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी ते इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले आहेत.

इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बबन शिंदे यांनी काही दिवस दूध डेअरी तसेच एस.टी. महामंडळामध्ये सुद्धा नौकरी केली आहे, त्यांच्या तरुणपणी बबन शिंदे पेशाने पैलवान सुद्धा होते, तरुणपणी त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद मध्ये तिसरा क्रमांक पटकवला होता. नवनाथांची भक्ति करणारे आणि गोरक्षनाथांवर अतूट श्रद्धा असणारे बबन शिंदे यांनी कोरोना व्हायरस वर तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधाला “गोरक्षनाथ लस” असं नाव ही दिलेलं आहे.

बबन शिंदे यांनी या आपल्या औषधाची चाचणी सरकारी लॅब मध्ये करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे, आणि ही आयुर्वेदिक लस लॅब मध्ये जर यशस्वी ठरली तर ती आयुर्वेदिक लस आपण सरकारला मोफत देऊ अस मत बबन शिंदे यांनी व्यक्त केल आहे, आता प्रतीक्षा फक्त एवढीच आहे की सरकार यावर काय निर्णय घेतय.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *