100+गुढी पाडवा शुभेच्छा। Gudi Padwa Wishes Messages in Marathi

Gudi padwa wishes messages in Marathi, Ugadi Messages in Marathi, Gudi padwa status in Marathi, Gudi padwa sandesh in Marathi, Gudi padvyachya hardik shubhechha in Marathi, Gudi padwa sms in Marathi, Gudi padwa 2020, Hindu nav varsh message in Marathi.

आला आला गुढी पाडव्याचा सण, आनंदाने गुढी उभारा रे, मागील वर्षातील दु:ख विसरून, नव्या वर्षाच आनंदाने स्वागत करा रे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

वर्षामागून वर्ष जाती नष्ट होऊन जाती साडेसाती, नव्या आयुष्याच्या नव्या गोष्टी, नव्या स्वप्नांची मनी होऊ द्या दाटी, नव्या वर्षाची नवी पहाट आज उगवली तुमच्यासाठी. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आज आहे रे गुढी पाडव्याचा सण झालं गेल विसरून, मन करा रे प्रसन्न. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

सोडून देऊ रूसवे फुगवे सारे, दु:ख सारे विसरून जाऊ, नव्या दिवशी नवीन वर्षाच आनंदाने स्वागत करू. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढी उभारूया नवीन वर्षाची, नव्या आयुष्याची, नव्या क्षणांची, सुख समृद्धीची, चांगल्या आरोग्याची समाधानाची, आणि उज्ज्वल यशाची. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, आरोग्य संपन्न जीवन आणि सुख समृद्धि लाभो. चेहर्‍यावर सदैव हास्य राहो, प्रत्येक कार्यात यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

चला उंच गुढी उभारूया, आभाळाला भिडवूया, विसुरुन सारे दु:ख, कष्ट नव्याने आभाळा एवढी स्वप्ने पाहूया. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढी पाडव्याचा सण म्हणजे नव वर्ष नव्या संधी, या आनंदाच्या शुभ मुहर्तावर तुमच्या जीवनात नांदो हर्ष, समाधान आणि सुख समृद्धि. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन दिवस, नवी पहाट, नवा आनंद नवा विश्वास, नवी स्वप्ने नवे यश, नवे सुख, नवे धन, चला मिळून साजरी करूया नव वर्षाचे नवे क्षण. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

झाली पहाट मराठी नव वर्षाची, नव्या आनंदाची नव्या हर्षाची. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

पहाट पहिली चैत्राची, नवा आनंद नव्या हर्षाची, नवा विश्वास नव्या मैत्रीची, नवे क्षण नव्या स्वप्नपुर्तीची, झाली सुरुवात मराठी नव वर्षाची. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

तेजोमय आयुष्याची सुरुवात होऊ दे या नव वर्षाला, सीमा न राहो तुमच्या आनंद हर्षाला, आणि तुमच्या उत्तुंग यशाची किर्ति भिडू दे गगनाला. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

या नव्या वर्षी, तुमचं मन सुखं समाधानाने आनंदीत होऊ दे, माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या वर राहू दे, आणि तुमचं घर नेहमी धन धान्यांनी भरून दे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आजचा दिवस खास आहे, घरो घरी आनंदाचा वर्षाव आहे, आणि आजच खरी नव्या वर्षाची सुरुवात आहे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आणखी वाचा: वाढदिवसाच्या शुभेच्छा HD इमेजस

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *