Happy Birthday Wishes In Marathi Language Text, Vadhdivsachya Hardik shubhechha in Marathi.

जीवनातला प्रत्येक क्षण आनंद घेऊन येवो,
उजडणारा प्रत्येक दिवस जीवनात यश घेऊन येवो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवे पर्व, नवे लक्ष, आनंद, आरोग्य आणि भरगच्च यश लाभो.
तुमच्या आयुष्यातले क्षण हे तेजस्वी सूर्या सारखे प्रकाशमय होऊन जावो,
तुमचं तेज तुमच्या कुटुंबावर ही निखळत जाव,
तुमच्या यशस्वी जीवनात तुमचं यश, ज्ञान, आणि किर्ति वृद्धीगंत होत जावी.

कर्तुत्वाच्या प्रत्येक वळणावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवा हीच आमची इच्छा.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
तुमच्या विषयी हृदयात असणार प्रेम अगदी अतूट आणि जिव्हाळ्याच होत आहे.
भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

उमलत्या फुलांनी तुला जीवनभर बहरण्याच वरदान द्याव,
चंद्र, सूर्य, तार्यांचनी तुला दीर्घ आयुष्याच वरदान द्यावं,
आकाशात उंच भरारी घेणार्यार पक्षांनी
तुला स्वत:च्या पंखावर विश्वास ठेवण्याच वरदान द्याव.
तुझ्या वाढदिवसादिवशी तुझ आयुष्य सुख, संपती, यश,
आणि वैभवाने समृद्ध व्हावं.
वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
इच्छा आकांशाने तुमचं जीवन भरून जावो,
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाने न्हाऊन जावो,
फुलांसारख तुमच आयुष्य सुगंधित होवो,
ईश्वर करो या शुभ दिवशी तुमची सर्व स्वप्ने साकार होवो.
भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपल्या सुंदर नात्याला कुणाची नजर न लागो
आणि तुझ माझ नात असच सुखाच रहावो.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
फुलांच्या सुवासाने क्षण सुगंधित व्हावेत,
वार्या्ची थंडगार झुळूक अलगद स्पर्श करून जावी,
आकाशातील कडाडत्या वीजांनी मैफिल सजावी,
कोकिळेच्या मधुर स्वरांनी मन तृप्त व्हाव,
तुझ्या वाढदिवसादिवशी तू, माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजाव.
वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे एक अनमोल आठवण,
तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर स्वप्न,
तुझा वाढदिवस म्हणजे यशाचं पहिलं पाऊल,
तुझा वाढदिवस म्हणजे खर्याल आनंदाची खरी चाहूल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wishes In Marathi Language Text

चांदण्याशिवाय आकाशाला शोभा नाही,
सुगंधाशिवाय फुलांना किमंत नाही,
आमच्या खास मित्राशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,
कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.

आयुष्याच्या वाटेवर तुझ्या नव्या विश्वातील नव्या स्वप्नांना आकार घेऊ दे,
तुझ्या यशाचा वेल असाच वाढत राहू दे,
आणि तुझ्या यशाची किर्ति सार्या जगभर पसरू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मनी बाळगलेल्या तुझ्या स्वप्नांना पंख फुटू दे,
तुझ्या इच्छा आकांशाना उंच भरारी घेऊन दे,
तुझ्या यशाची किर्ति जगभर पसरू दे,
तुझ्या वाढदिवसानिम्मीत ईश्वरचरणी फक्त एवढीच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे.

यशाची शिखरे तू सर करत रहावी,
रोज नवी स्वप्ने उरी बाळगावी,
आली आठवण कधी आमची तर
आपली गोड भेट आठवावी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रॉयल मनाचा माणूस! नव्या पर्वाचा युवा शिलेदार!
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी एक सणच आहे,
मग ती दिवाळी असो नाहीतर शिमगा जल्लोष तर ठरलेलाच असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आकाशाने चांदण्यांचा वर्षाव केला आहे,
फुलांनी सुगंध पाठवला आहे,
माझ्या खास मैत्रिणीला/मित्राला
मी बडे च्या हृदयातून शुभेच्छा पाठवल्या आहेत.

आपल्या जीवनाचा प्रवास या वळणावर आलेला असताना,
आठवतो आजवर आपण केलेला सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष,
आपली कठोर साधना, आपल्या जगण्यातून आपण आमच्यापुढे ठेवलेलेला आदर्श,
तुमचे विचार आणि कार्य हीच आमच्या आयुष्याची शिदोरी आहे,
आपल्या इथून पुढच्या जीवनासाठी ईश्वराने आपल्याला उत्तम आरोग्य,
सुख, समृद्धि आणि उज्ज्वल आयुष्य द्यावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
भाऊ आपणांस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
आज माझ्या जीवनातला सर्वात आठवणीचा दिवस आहे,
आज मला सर्वात अनमोल भेट मिळाली होती.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवी स्वप्ने,
नवा हर्ष घेऊन यावा, नव्या आनंदाच्या क्षणांनी,
सुख समृद्धीने, तुझा आनंद द्विगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नात आपल स्नेहाच दिवसेंदिवस असच फुलाव,
तुझ्या आठवणीत नेहमी असच रमाव,
जिथे जिथे उघडतील हे डोळे तिथे फक्त तुलाच पहावं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू माझ्या घरट्यात राहणार छोटसं पाखरू आहेस,
तू माझ्या हृदयात राहणार माझ छोटसं स्वप्न आहेस,
तूच माझा आधार आणि तूच माझा श्वास आहेस.
माझ्या इवल्याश्या पाखराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस भाऊ

माननीय …..भाऊ यांना जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…
लोकनेते …..साहेबांचे सामाजिक संस्कार जपणारे पुत्र,
युवकांचे प्रेरणास्थान, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, कणखर नेतृत्व,
आमचे लोकप्रिय युवानेते …..यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
श्री …..यांना ….व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक:-…..
सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे,
थोरा मोठ्यांशी नम्रतेने वागणारे,
आपले विचार आणि संगतीने इतरांचे जीवन फुलवणारे,
स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व जोपासणारे, तरुणांचे मार्गदर्शक,
माननीय आदरणीय ……साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस भाऊ
भाऊ म्हणजे शब्द! भाऊ म्हणजे प्रेरणा! भाऊ म्हणजे सर्वकाही!
ज्याच्या स्मित हास्याने जाणवते एक आनंदाची लहर! भाऊ म्हणजे एक विचार,
ज्याच्या आदर्शाने मिळते जगण्याची नवी उमेद!
अशा मनमिळावू भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी अशा सर्वच क्षेत्रात दूरदृष्टी असलेले
माजी …… ……यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपल्या कडून अशीच समाजसेवा घडो,
आपणांस उदंड आयुष्य लाभो,
आपल्याला वाढदिवसानिमित्त मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.
vadhdivsachya hardik shubhechha in Marathi
आपणांस उदंड, आरोग्यदायी, आणि समृद्ध आयुष्य लाभो हिच देवाकडे प्रार्थना!
आपल्याला वाढदिवसानिमित्त मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.
….. तालुक्यातील तडफदार नेत्रत्व,
माननीय ….साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपणांस उदंड आयुष्य, यश किर्ति, आणि समृद्धि लाभो…!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
रात्रीला साथ चंद्राची, फुलांला साथ सुगंधाची
आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या over smart मित्राची.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मित्राचा वाढदिवस विसरण अशक्य आहे
पण girlfriend चा वाढदिवस विसरण
त्याही पेक्षा अशक्य आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा प्रत्येक वर्षी येणारा वाढदिवस
तुला लवकरच uncle नावाची
पदवी भेटणार याचे संकेत देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या शुभ प्रसंगी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो
हीच मनी सदीच्छा आपल्या म्हातारपणीच्या वाटचालीस
आम्हा सर्व मित्रांकडून आपणास लाख लाख शुभेच्छा.
वाढदिवसादिवशी wish तर सगळेचजन करतात
पण आपल्या वाढ दिवसादिवशी जे लोक पार्टी देतात
ते लाखात एक असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मित्रांना कळविण्यात येते की
आज आपल्या पप्पूचा वाढदिवस आहे
येताना गिफ्ट जरी नाही आणले तरी चालेल
पण आज रात्री संध्याकाळी पार्टीला जरूर यावे.
वय तर वाढणारच, टक्कल तर पडणारच,
जल्लोष पण होणार, पण पार्टी मात्र पाहिल्यापेक्षा
जबरदस्त असणार.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
चंद्र वाढतो कलेकलेने आणि
आमचा मित्र वाढतो cake आणि bread खाऊन
किलो किलोने. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू पाहिलेल प्रत्येक स्वप्न सदा सत्यात उतरू दे,
चेहर्यावरील हास्य तुझ्या सदा उमलत राहू दे
आणि cake सारख गोड नात आपल
सदा अमर राहुदे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू कितीही दूर असलास तरी
तू आजही आमच्या हृदयात आहेस,
तू जरी आम्हाला विसरलास तरी
तुझा वाढदिवस मात्र आज ही
आमच्या लक्षात आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तरुण असे पर्यंत टिकत ते प्रेम
आणि आयुष्यभर साथ देते ती मैत्री.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कोणी तरी मला म्हटलं की
तू मित्रांना बडे दिवशी एवढ विश का करतो
तर मी त्यांना हसत उत्तर दिल
माझ्या शिवाय या गरीबांना आहे तरी कोण!
बडे दिवशी अशा मित्रांना आवर्जून विश करा
आणि पार्टी सुद्धा जररू मागा जे
तुमच्या बडेला पार्टी चा आग्रह धरतात.
पाखरे मोठी झाल्यावर आपल्या घरट्यातून दूर निघून जातात
आकाशाला गवसणी घालण्यासाठी तसा तू ही मित्रा दूर निघून गेलास परदेशी
पण आज ही ते दिवस आठवतात ज्या दिवशी तुझा वाढदिवस होता
आणि आपण खूप धमाल केली होती खूप मौज मस्ती केली होती
पण आता तुझ्या वाढदिवसा दिवशी नाही येऊ शकत म्हणून
वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
फुलांसारखं तुझ आयुष्य सुगंध दरवळूदे,
जगातील सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घेऊ दे,
या शुभ प्रसंगी तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होवू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
उजडलेली प्रत्येक पहाट तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येवो,
आयुष्यातील प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जावो.
ईश्वर चरणी फक्त एवढीच प्रार्थना करतो
तुम्ही पाहिलेल प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणखी वाचा:
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो फ्रेम बॅनर. Marathi Birthday Banner
वाढदिवस हार्दिक शुभेच्छा Png Text.Vadhdivsachya Hardik Shubhechha Png
वाढदिवसाबद्दल काही ओळी:
प्रत्येक धर्मामध्ये, संस्कृती मध्ये वाढदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो. अगदी जंगालामध्ये राहणारे आदिवासी जमातीतील लोक सुद्धा परंपरागत वाढदिवस साजरी करतात. हल्ली शहरी भागामध्ये वाढदिवसाचे स्वरूप बदलले आहे. आणि हे वाढदिवस साजरी करण्याचे स्वरूप ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहचले आहे.
वाढदिवसासाठी आइस केक मागवणे, चॉकलेटस, सजावट, फॅन्सि कपडे, फोटो शूट, अंगावर अंडे फोडणे, केकने अंघोळ घालणे म्हणजे संपूर्ण चेहरा आणि डोके केकने भरवणे हल्ली असले प्रकार खूप वाढले आहेत, पूर्वी वाढदिवस घरामध्येच आपल्या फॅमिली सोबत साजरी केले जात असायचे, पण सध्याचा युवा वर्ग वाढदिवस चक्क रस्त्यावर साजरी करतो,
म्हणजे जिथे जागा दिसेल तिथे वाढदिवस साजरी केला जात आहे, म्हणजे घर हे एक मंदिर आहे ही गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. व्यक्तिनुसार वाढदिवसाचे स्वरूप वेगवेगळे असते. राजकीय व्यक्तीचा वाढदिवस हा शाही परंपरेने, शाही रीतीरिवाजाने साजरी केला जातो,
मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात, मनोरंजनाचे कार्यक्रम भरवले जातात. शाही पद्धतीचे जेवण दिले जाते, राजकीय जेष्ठ व्यक्तींचे, पाहुण्यांचे सत्कार समारंभ आयोजित केले जातात. भव्य मिरवणूक काढली जाते, ढोल, ताशे, नगारे वाजवले जातात.
घरातील लहान, थोर मंडळीचा वाढदिवस हा काही घरांमध्ये साधेपणाने साजरी केला जातो तर काही घरामध्ये वाढदिवस मोठा खर्च करून साजरी केला जातो. आताच्या वाढदिवस साजरी करण्याच्या पद्धतीला लग्नाचे स्वरूप आले आहे म्हणजे वाढदिवसाला केला जाणारा खर्च हा लग्नाच्या खर्चाच्या एवढा आहे.
समाजामध्ये काही दूर दुष्टि असलेले विचारवंत आपला वाढदिवस हा झाडे लावून, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून, रक्तदान, आरोग्य शिबीर तसेच प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून, आणि समाजातील कमजोर वर्गाला जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून साजरी करतात.
मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आपल्या वाचकांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. आपण आपल्या मित्र, मैत्रीनींना, पाहुणे किंवा नातेवाईकांना त्यांच्या वाढदिवसा निम्मीत या शुभेच्छा देऊ शकता.
Happy Birthday Wishes In Marathi Language Text