होळी, रंगपंचमी सणा बद्दल संपूर्ण माहिती। Holi Information in Marathi

Holi information in Marathi in short, Holi essay in Marathi essay,  Holi essay in Marathi for class 6, 10 points on holi in Marathi, Rang panchami information in marathi, dhulivandan information in Marathi  holi vishe mahiti Marathi, Holi sana vishe mahiti Marathi.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये होळी या उत्सवाला विशेष महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये होळी हा उत्सव फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला साजरी केला जातो. संपूर्ण भारतामध्ये होळी उत्साहाने साजरी केली जाते पण उत्तर भारतामध्ये होळी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

होळी हा उत्सव “शिमगा” किंवा “होलिकादहन” या नावाने सुद्धा ओळखला जातो. होळीचा हा सण साधारणपणे दोन दिवस साजरी केला जातो पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते यावरून या सणाला “होलिकादहन” असे नाव दिले गेले आहे आणि दुसर्‍या दिवशी रंगाची उधळण केली जाते म्हणजेच रंगपंचमी खेळली जाते याला “धूलिवंदन” असे ही म्हणतात.

अगदी लहानांपासून ते वडीलधार्‍या लोकांपर्यंत रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. होळी च्या दिवशी प्रत्येकाच्या घरी निरनिराळ्या पक्वान्नाची मैफिल असते. लहान मुले, पुरुष आणि श्रीया मोठ्या संख्येन रंगपंचमी साजरी करतात. खर्‍या अर्थाने होळी हा सण बंधुत्वाचे प्रतीक आहे, आपल्या संस्कृती मध्ये इतर उत्सवांप्रमाणे एक सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी होळी या सणाच विशेष योगदान आहे.

Holi information in Marathi

महाराष्ट्रात कशी साजरी केली जाते होळी?

होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी वाळलेली लाकडे एकत्र करून जाळली जातात. पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून होळीचे पूजन केले जाते आणि लहान, थोर सर्वजण होळीला प्रदीक्षणा घालत “बोंबा” मारतात आणि प्रदीक्षणा पूर्ण करतात.

कोकणात कशी साजरी केली जाते होळी?

कोकणातील रत्नागिरी जिल्यात शिमगा हा सण 5 ते 15 दिवस मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहाने साजरी केला जातो, या दिवशी ग्रामदेवतेचे पूजन केले जाते आणि ग्राम देवतेची पालखी सजवून ढोल ताश्याच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. तिथी प्रमाणे प्रत्यक्ष पौर्णिमेला खरी होळी साजरी केली जाते. कोकणात होळीमध्ये माड तोडून आणण्याची पारंपरिक पद्धत आहे.

Holi information in Marathi

पौराणिक कथा

एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता तो खूप अहंकारी आणि दुष्ट होता, हिरण्यकश्यपू हा राजा देव, ऋषीमुनी यांना खूप त्रास द्यायचा त्यांचे आश्रम, यज्ञ उधवस्त करायाचा. हिरण्यकश्यपूने देवलोकांवर विजय प्राप्त करण्यासाठी ब्रह्मदेवाची घोर तपस्या केली. ब्रह्मदेवाची घोर तपस्या केल्यानंतर ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला एक असे वरदान दिले कि त्याला कोणताही देव, दानव किंवा मनुष्य मारू शकणार, त्याला कोणतेही शस्त्र-अस्त्र मारू शकणार नाही.

हिरण्यकश्यपू राजा देवतांचा खूप तिरस्कार करायचा. हिरण्यकश्यपू विष्णु देवाची भक्ति करणार्‍याला कठोर शासन करायचा, विष्णुचे नाव ऐकने त्याला मुळीच पसंद नव्हते. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णुचा प्रिय भक्त होता. भक्त प्रल्हाद विष्णु भक्ति मध्ये नेहमी लीन असायचा. भक्त प्रल्हाद सतत नारायण नारायण या नावाचा जप करत असे. प्रत्यक्ष आपल्या पुत्राची विष्णु भक्ति पाहून हिरण्यकश्यपूला भयंकर राग आला आणि त्याने आपला पुत्र प्रल्हाद याला ठार मारण्याचे ठरवले.

हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाला त्वरित आज्ञा दिली आणि जळत्या चितेवर पुत्र प्रल्हादला मांडीवर घेऊन बसायला संगितले. हिरण्यकश्यपूची बहीण होलिकाला कोणतीही अग्नि जाळू शकणार नाही असे इच्छित वरदान प्राप्त होते. भक्त प्रल्हाद शांतपणे होलिकाच्या मांडीवर जाऊन बसला आणि विष्णु भक्ति मध्ये लीन झाला, भक्त प्रल्हाद होलिकाच्या मांडीवर बसून नारायण नारायण असा जप करू लागला.

चिता पेटली गेली आणि काही क्षणातच होलिका जळायला लागली. होलिकाला अग्निदेवताचे वरदान असताना ही होलिकाचे शरीर जळू लागले होते कारण वरदान देता वेळी तिला बजावले गेले होते तू ज्यावेळी ह्या शक्तीचा दुरुपयोग करशील त्यावेळी ही शक्ति नष्ट होईल आणि तिने ह्या शक्तीचा दुरुपयोग केला म्हणून ती अग्निमध्ये जळून मेली. अग्नीतून भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आला, अग्नि प्रल्हादला काहीही करू शकली नाही, कारण प्रत्यक्षात विष्णू देवाने भक्त प्रल्हादचे प्राण वाचवले.

हा सर्व प्रकार स्वर्गातून सर्व देव पाहत होते, सर्वांनी भक्त प्रल्हादवर फुलांचा वर्षाव केला आणि नारायण नारायण या नावाचा जयघोष केला. अशाप्रकारे तेव्हापासून तो दिवस होलिका दहन(होळी) म्हणून साजरी केला जातो.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *