Kalonji Meaning in Marathi, कलौंजी बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Kalonji meaning in Marathi, Kalonji in Marathi, Kalonji uses in Marathi, Kalonji information in Marathi.

कलौंजी

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कलौंजी ला अनन्यसाधारण महत्व आहे, पिढ्यान पिढ्या कलौंजीचा वापर आयुर्वेदिक उपचारपद्धतीमध्ये करण्यात आला आहे, कलौंजी ही एक औषधी वनस्पति आहे.

आयुर्वेदिक चिकित्सा या उपचार पद्धती मध्ये कलौंजी चा उपयोग केला जातो. मृत्यू सोडून प्रत्येक आजार कायमचा बरा करण्याचे औषधी गुणधर्म कलौंजी मध्ये आहेत असा दावा आयुर्वेद शास्त्रात करण्यात आला आहे, कलौंजी हे खूप परिणामकारक आणि प्रभावी औषध आहे.

Kalonji Meaning in Marathi
Kalonji Meaning in Marathi

English meaning of Kalonji: Black seeds (ब्लॅक सीड्स)

कलौंजी चे मराठी/हिंदी नाव: मंगरेला

इंग्रजी मध्ये कलौंजी या शब्दाला Black seeds असे म्हणतात.

कलौंजी चे शास्त्रीय नाव Nigella Sativa (निजेला सटाईव्हा) असे आहे.

The Scientific name of Kalonji: Nigella Sativa

Kalonji Meaning in Marathi
Kalonji Meaning in Marathi

अपचन, रक्तदाब, केस गळती, ब्राँकायटिस, कावीळ, मूळव्याध, दमा, गुडघे दुखी, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, मधुमेह, लघवीतून सूज येणे, इसब, अर्धांगवायू, अशा अनेक आजारांमध्ये कलौंजी चा वापर केला जातो.

चेहरा स्ंदर करण्यासाठी सुद्धा कलौंजीचा वापर केला जातो, चेहर्‍यावर जर मुरूम, फोडी असतील तर त्या कलौंजीच्या वापराणे नाहीशा होऊ शकतात. कलौंजीचा सर्वात जास्त उपयोग केसांच्या समस्यांवर केला जातो, या मध्ये प्रामुख्याने केस गळती, केस विरळ होणे इत्यादि समस्यांमध्ये कलौंजीचा वापर केला जातो.

कानाच्या समस्या आणि केसांच्या समस्यांमध्ये कलौंजीचे आयुर्वेदिक तेल वापरले जाते. अशा प्रकारच्या अनेक आजारांमध्ये कलौंजी प्रभावीपणे काम करते आणि त्या आजाराला आपल्या मध्ये असलेल्या अद्भुत शकतीद्वारे म्हणजेच औषधीय गुणधर्माच्या साह्याने त्या आजाराला मुळासकट नष्ट करते.

कलौंजी तेलाचे फायदे:

सध्या कलौंजी चे तेल सुद्धा मार्केट मध्ये उपल्ब्ध आहे, जे केसांच्या समस्या, कानाच्या समस्या, डोकेदुखी, मायग्रेन, सर्दी, खोकला, आणि बलगम इत्यादि आजारांवर वापरले जाते.

मार्केट मध्ये अनेक कंपन्या कलौंजी चे तेल बनवतात. कलौंजी चे तेल आयुर्वेदिक दुकानामध्ये/मेडिकल मध्ये सहजपणे उपलब्ध होऊ शकते.

कलौंजी चे काही चमत्कारिक फायदे:

स्मरणशक्ती वाढवते, सौंदर्य वृद्धी करते, श्वसनातील अडथळे दूर करते जसे(दमा विकार), डोकेदुखी त्रास कमी करते, सांधे दुखीतील त्रास दूर करते, दात निरोगी व मजबूत करणे, दातातून होणारा रक्तस्राव थांबवणे, दातांमधील कमजोरी दूर करणे इत्यादि.

Kalonji meaning in Marathi

कलौंजी मध्ये समाविष्ट असलेले पोषकतत्वे:

कलौंजी मध्ये खालील पैकी पोषक घटक पहायला मिळतात.

Crystalline Nigellone

Amino Acids(अमिनो आम्ल)

Crude Fiber (क्रूड फायबर)

Alkaloids(अल्कॉइड्स)

Voltile Oils

Protein (प्रथिने)

Sodium (सोडियम)

Potassium (पोटॅशियम)

Calcium (कॅल्शियम)

Iron (लोह)

YouTube, Google आणि अशा अनेक सोशल प्लॅटफॉर्म वर अनेक प्रमुख भाषांमध्ये जसे हिंदी, इंग्रजी, आणि मराठी भाषांमध्ये तुम्हाला कलौंजी बद्दल माहिती वाचायला, आणि पहायला मिळेल. इतके कलौंजीचे महत्व आहे.

YouTube वर तर तुम्हाला कलौंजीबद्दल अनेक videos पहायला मिळतील, या videos मध्ये अनेकांनी प्रत्यक्ष उपचार कसा करायचा, आणि औषधाचा फॉर्म्युला कसा बनवायचा याबद्दल माहिती दिलेली आहे.

सूचना: हा लेख अशा प्रकारच्या कोणत्याही “औषधाचा फॉर्म्युला” चे किंवा videos चे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधा.

सूचना: या लेखामध्ये दिलेली माहिती फक्त शैक्षणिक हेतु (Educational Purpose) करिता दिली गेलेली आहे, त्यामुळे कलौंजीचा वापर कोणत्याही आजारांवर करण्यापूर्वी त्या आजाराशी संबंधीत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

अधिक माहिती घ्या: Nigella Sativa

मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृति मध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीला खूप महत्व आहे, आपल्या संस्कृती मध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, आणि चिकित्सा पद्धतीमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीला प्रथम स्थान दिले जाते, कारण जडी बुटी पासून आणि वनस्पति पासून बनवलेली औषधे कोणत्याही शारीरिक आजारांवर एक Permanent सोल्यूशन आहेत.

पूर्वी आपले पूर्वज भयंकर त्रासदायक असे दुर्मिळ आजार केवळ वनस्पति आणि झाड पाल्यांपासून बनवलेल्या औषधा पासून नष्ट करायचे आणि आपले शरीर धष्टपुष्ट ठेवायचे.

राजे महाराजे यांच्या दरबारात सुद्धा एक आयुर्वेदिक तज्ञ(वैद्य) याची नेमणूक केली जात होती आणि तो आयुर्वेदिक तज्ञ(वैद्य) संपूर्ण राजदरबाराला केवळ झाड पाल्यांपासून बनवलेल्या औषधा पासून निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते असे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *