100+Love Images Marathi. Sad Love Images in Marathi
Love Images Marathi. Sad Love Images in Marathi
प्रेमामध्ये ईश्वराचा अंश असतो, प्रेमाने जग जिंकता येत, प्रेम अमर असत प्रेमाला मरण नाही अस म्हणतात ते काही खोट नाही. खरच या जगामध्ये प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. खर्या प्रेमामध्ये स्वार्थ नसतो, खर्या प्रेमाला वाईट विचारांचा स्पर्श नसतो.
खर प्रेम निखळ पाण्यासारख निर्मळ, सूर्या सारखं तेजस्वी, फुलांसारख सुगंध देणार आणि फुलपाखरा सारखं स्वतंत्र असतं. प्रेम हे स्वच्छ आकाशा सारखं निरभ्र, रात्रीच्या आकाशातील चांदण्यासारख न मोजता येणार असावं.
सध्याच्या युगात प्रेम हे प्रेमच राहिलेले नाही. प्रेमाची व्याख्याच पुर्णपणे बदलली आहे. स्वार्थापोटी केलेलं प्रेम जास्त काळ टिकत नाही. इतरांच्या सुखातच आपल सुखं असावं, इतरांच मन दुखवेल अस न वागणं, एकमेकांना समजून घेण हेच खर प्रेम असत.
प्रेमामध्ये आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा सुद्धा विचार व्हायला हवा कारण या जगात पाऊल ठेवण्याअगोदर पासून ते मोठे होईपर्यंत आपले आई वडील आपल्यावर प्रेम करत असतात. आपल्या आई वडिलांचे आपल्या वर फार उपकार आहेत, त्यांचे उपकार फेडणे आपल्याला या जन्मी तरी शक्य नाही.

काय माहीत उद्या तू माझ्या नशिबात असशील का नाही
पण आज तरी तू माझ्या मनात आहेस.
Love Images Marathi. Sad Love Images in Marathi

ती तूच आहेस जी रोज रात्री माझ्या स्वप्नात येतेस.

माझ हृदय छोटसंच आहे
पण हे तुझ्यावर आभाळाएवढ प्रेम करत.

असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला पाहण्याचा प्रयत्न केला नाही
आणि अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तुझी आठवण आली नाही.

सांग प्रिये सांग तुझा जोडीदार
तू मला बनवशील का?
माझ्या नावाची अंगठी सांग तू स्वीकारशील का?

तूच माझ्या दिलाची राणी आहेस
आणि तूच माझ्या जीवनाची कहाणी आहेस.

प्रेम स्वभाव पाहून करावं, मन पाहून करावं,
सौंदर्य पाहून नाही कारण तारुण्य, सौंदर्य हे काही काळापर्यंतच असत
आणि जीवनभर टिकत ते प्रेम, स्वभाव, आणि मन.

मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मला नाही माहीत,
पण एवढ मात्र नक्की आहे कि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.

प्रेम तर मी आज ही तिच्यावर करतो
पण ती आजपर्यंत मला समजू शकली नाही.

मी तुझ्यावर एवढ प्रेम करतो कि
प्रेम व्यक्त करायला शब्द कमी पडतील
आणि निभवायला आयुष्य.

माझा ध्यास तू आहेस,
माझा श्वास तु आहेस,
माझ जीवन माझ सर्वकाही फक्त तूच आहेस.
आणखी वाचा:
हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी
इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये
50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश