1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा इमेज। Maharashtra Day Images Wishes in Marathi

Maharashtra day images wishes in Marathi. Maharashtra day information in Marathi language. quotes on maharashtra culture in marathi, maharashtra din status in marathi, 1 may maharashtra din quotes in marathi, maharashtra day images in marathi download hd. maharashtra images culture wallpapers.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले महान असे राज्य म्हणजे महाराष्ट्र होय. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि महाराष्ट्राच्या स्थापनेत अनेक हुतात्म्यांचे बलिदान आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून मराठी भूमिपुत्रांच, मराठी भाषिकांच राज्य महाराष्ट्र म्हणून ओळखल जाऊ लागलं. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी सन 1960 सालापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं, त्यानंतर स्वतंत्र मराठी भाषिकांच्या राज्याची म्हणजेच महाराष्ट्र राज्याची मागणी जोर धरू लागली.

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या आंदोलनामध्ये एस. एम जोशी, सेनापति बापट, कॉ. श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि अमर शेख यांसारख्या थोर नेत्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वा खालील सरकार द्वारा आंदोलनातील जनसमुदयाला मागे हटविण्यासाठी जनसमुदयावर लाठीचार्ज, गोळीबार करण्यात आला होता. आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबारा मध्ये 105 भूमिपुत्रांना आपले प्राण गमवावे लागले होते. अखेर विशाल मराठी आंदोलनापुढे सरकारने नमते घेतले आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस मान्यता दिली.

Maharashtra day images wishes in Marathi

मंगल देशा…! पवित्र देशा…! महाराष्ट्र देशा…! आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जय जय महाराष्ट्र माझा…! गर्जा महाराष्ट्र माझा…! आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra day images wishes in Marathi

“शौर्य, ज्ञान, बंधुता, आणि समानता असे अष्टपैलू घेऊन जगणारे आणि जगावणारे माझे महान असे राष्ट्र ” महाराष्ट्र…!” आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा महाराष्ट्र माझा…! आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra day images wishes in Marathi

मी महाराष्ट्राचा…!, महाराष्ट्र माझा…! आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जय शिवराय…! जय महाराष्ट्र….! आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra day images wishes in Marathi

आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra day images wishes in Marathi

आपणांस आणि आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra day images wishes in Marathi

शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून सुद्धा महाराष्ट्रची ओळख आहे, त्याचबरोबर संतांची भूमी म्हणून सुद्धा महाराष्ट्रची ओळख आहे.

याच महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, सिंधुताई सपकाळ, राजश्री शाहू महाराज, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, सावित्री बाई फुले, अहिल्याबाई होळकर, यांसारखे महान नेतृत्व लोकल्याणाकरिता जन्मास आले. आज ही महाराष्ट्रातील डोंगर, कर्‍या कपारी मराठी मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देतात. आज ही आपला महाराष्ट्र संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख जपून आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *