महाशिवरात्र संपूर्ण शास्त्रोक्त माहिती। Mahashivratri Information in Marathi

Mahashivratri Information in Marathi

Shivratri mahatva in marathi, Mahashivratri information in marathi 2020, Happy mahashivratri in Marathi, Mahashivratri Marathi mahiti.

हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा धार्मिक सण माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी या तिथीला मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो. वर्षातून येणार्‍या 12 शिवरात्री पैकी ही महाशिवरात्र सर्वात महत्वपूर्ण मानली जाते, वर्षातून एकदाच येणारा महाशिवरात्र हा सण शिवशंकरचा प्रमुख सण मानला जातो, या दिवशी शिव शंकराची आराधना करून उपवास ठेवला जातो आणि दुसर्‍या दिवशी उपवासाची सांगता केली जाते.

महाशिवरात्री दिवशी शिव मंदिर फुलांनी सजवले जाते त्याचबरोबर शिवलिंगाची विशेष पुजा केली जाते. बेलाची पाने, धोत्रा आणि पांढरी फुले वाहून शिवलिंगाची पुजा केली जाते आणि शिवलिंगाला प्रदक्षिणा घातली जाते जाते. तूप, दूध, दही लावून शिवलिंगाला महाअभिषेक घातला जातो आणि ऊँ नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. काही शिवभक्त महाशिवरात्री दिवशी मोठ्या श्रद्धेने अन्नदान आणि वस्त्रदान सुद्धा करतात.

महाशिवरात्री दिवशी उपवास ठेवल्याने आणि शिवशंकरची पुजा केल्याने इच्छित वरदान प्राप्त होते अशी शिवभक्तांमध्ये धारणा आहे. महाशिवरात्री च्या संबंधित काही पौराणिक कथा प्रचलित आहेत.

पौराणिक कथा:

1) समुद्र मंथन

समुद्र मंथनाच्या वेळी अमृता बरोबर हलाहल नावाचं विष सुद्धा निर्माण झालं होत आणि त्या विषामध्ये संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करण्याची ताकत होती. समुद्र मंथनातून निर्माण झालेले हलाहल नावाचं विष फक्त शिव शंकरच नष्ट करू शकत होते. शिव शंकरानी ते विष स्वत: प्राशन करून  संपूर्ण विश्वाला जीवनदान दिल. ते विष इतकं विषारी होत की ते विष प्राशन केल्यानंतर शिवशंकराची प्रकृती खालावली आणि शिव शंकराचा घसा कोरडा पडून निळा झाला होता आणि त्यावरूनच शिव शंकराला नीळकंठ ह्या नावाने ओळखल जाऊ लागलं.

शिवशंकराची प्रकृती खालावल्यानंतर काही चिकित्सकांनी शिवशंकराला रात्रभर जागृत ठेवण्याचा सल्ला दिला. शिव भक्तांनी मोठ्या श्रद्धेने संगीत वाजवून आणि नृत्य करून शिवशंकराला रात्रभर जागृत ठेवले. सकाळ होताच शिवशंकराने सर्व भक्तांना आशीर्वाद दिला आणि तेव्हा पासून ती रात्र शिवरात्र म्हणून ओळखली जाऊ लागली.  

Mahashivratri Information in Marathi. Shivratri Mahatva in Marathi.

आणखी वाचा: Mahashivratri Wishes, SMS, Status, Images in Marathi

2) चित्रभानु नावाच्या शिकार्‍याची कथा

एक चित्रभानु नावाचा शिकारी होता, शिकार करणे हा त्याचा व्यवसाय होता, तो नेहमी शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याने एका सावकाराकडून कर्ज घेतले होते, त्या सावकाराच कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे धन उपलब्ध नव्हते. तो शिकारी त्या सावकाराचा ऋणी होता. कर्जाची वेळेत परत फेड न करू शकल्याने त्या सावकाराने त्या चित्रभानू नावाच्या शिकार्‍याला त्याच गावातील शिव मठात रात्रभर बंदिस्त करून ठेवले. योगायोग असा कि त्या दिवशी शिवरात्र होती आणि शिव मठामध्ये शिवरात्रीच्या व्रतपूजेची कथा सांगितली जात होती आणि ती संपूर्ण कथा त्या शिकार्‍याने ध्यान मग्न होऊन ऐकली.

संध्याकाळ होताच सावकाराने शिकार्‍याला शिव मठातून बाहेर काढले आणि लवकरात लवकर कर्ज फेडण्याची आज्ञा दिली. उद्या कर्ज चुकवतो असे वचन देऊन शिकारी तिथून निघून गेला. दुसर्‍या दिवशी दिवस उगवल्यानंतर नेहमीप्रमाणे शिकारी शिकार करण्यासाठी जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये एका तळ्याची काठी असलेल्या बेलाच्या झाडावर तो चढून बसला आणि शिकारी साठी धनुष्य बाण हातात घेऊन सज्ज झाला आणि शिकार येण्याची वाट पाहू लागला. बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होत ते शिवलिंग झाडावरची बेलाची पाने पडून ते झाकल गेल होत त्यामुळे ते शिकार्‍याच्या प्रथम दर्शनी नजरेस पडल नाही.

शिकारीसाठी झाडावरची बैठक व्यवस्थित करण्यासाठी शिकार्‍याने बेलाच्या झाडाच्या काही फांद्या आणि पाने ही तोडली आणि ती पाने झाडाखाली असलेल्या शिवलिंगावर पडली आता इथे गोष्ट अशी कि सावकाराने दिवसभर शिव मठामध्ये बंदिस्त करून ठेवल्यामुळे शिकार्‍याला शिवरात्री दिवशी उपवास घडला आणि बेलाची पाने झाडावरून शिवलिंगावर पडून शिकार्‍याचे व्रत ही पूर्ण झाले पण शिकार्‍याला ह्या घटनेबद्दल जरा ही कल्पना नव्हती. तेवढ्यात तिथे एक हरिण पाणी पिण्यासाठी तळ्याच्या काठी आली.

हरिणीला पाहताच शिकार्‍याने बाण तिच्या दिशेने रोखला आणि धनुष्यातील बाण सोडणार इतक्यात ती हरिण त्या शिकार्‍याला म्हणाली “हे शिकारी मी गर्भवती आहे मी लवकरच माझ्या पिल्लांना जन्म देईन आणि तू एकावेळेस दोन जीवांचा बळी नाही घेऊ शकत, तू एक काम कर मला काही वेळाची मुदत दे, मी लवकरच माझ्या मुलांना जन्म देऊन परत माघारी येईन आणि मग तू माझा जीव घे.” असे वचन तिने त्या शिकार्‍याला दिले हरिणीचे केविलवाणे शब्द ऐकून शिकार्‍याला दया आली आणि त्याने तिला तिथून जाऊ दिले.

काही वेळाने पुन्हा एक हरिण तिथून निघाली होती हरिणीला पाहताच शिकार्‍याने बाण तिच्या दिशेने रोखला आणि धनुष्यातील बाण सोडणार इतक्यात ती हरिण त्या शिकार्‍याला म्हणाली “हे शिकारी मी एक कामातुर विरहिणी आहे, आणि मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून पुन्हा तुझ्याकडे येईन तोपर्यंत तू मला इथून जाऊ दे.” शिकार्‍याने तिच्यावर ही द्या दाखवली आणि तिला तिथून जाऊ दिले. शिव मठामध्ये उपासमार झाल्यामुळे आणि दोन वेळा शिकार हाती न लागण्यामुळे शिकारी भुकेणे व्याकुळ झाला होता.

शिकारीची वाट पाहता पाहता संध्याकाळ होत आली होती. इतक्यात एक हरिण आपल्या पिल्लांन सोबत तिथून निघाली होती, हरिणीला पाहताच शिकार्‍याने बाण तिच्या दिशेने रोखला आणि धनुष्यातील बाण सोडणार इतक्यात ती हरिण त्या शिकार्‍याला म्हणाली “हे शिकारी मी ह्या पिल्लांची माता आहे, आणि माझ्या पिल्लांना त्यांच्या वडिलांच्या हाती सोपवणे हे माझे कर्तव्य आहे, मी तुला विनंती करते तू मला इथून सुखरूप जाऊ दे, मी माझ्या पिल्लांना त्यांच्या वडिलांच्या हाती सोपवते, आणि परत माघारी येते आणि मग तू माझा जीव घे.” हरिणीचे केविलवाणे शब्द ऐकून शिकार्‍याला दया आली आणि त्याने तिलाही तिथून जाऊ दिले.

तेवढ्यात तिथुन एक नर हरिण चालला होता. नर हरिणाला पाहताच शिकार्‍याने बाण त्याच्या दिशेने रोखला आणि धनुष्यातील बाण सोडणार इतक्यात नर हरिण त्या शिकार्‍याला म्हणाला “हे शिकारी आता तुझ्या जवळून ज्या तीन हरिणी गेल्या त्या सर्व माझ्या पत्नी आहेत, आणि तू जर माझ्या मुलाबाळांची शिकार केली असेल तर तू माझी सुद्धा शिकार करण्यासाठी विलंब करू नकोस, कारण मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही.” शिकार्‍याने त्याला सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला तुझ्या तिन्ही पत्नी मला परत येण्याचं वचन देऊन निघून गेल्या आहेत त्यावर तो नर हरिण म्हणाला “हे शिकारी मी त्यांना भेटल्याशिवाय त्या सर्व तुला दिलेल वचन पूर्ण करू शकणार नाहीत, त्यामुळे तू मला ही इथून जाऊ दे मी त्यांना भेटून पुन्हा तुझ्याकडे येतो आणि मग तू माझा जीव घे.”

नर हरिणाचे केविलवाणे शब्द ऐकून शिकार्‍याला दया आली आणि त्याने नर हरिणाला ही तिथून जाऊ दिले. आता मात्र शिकारी पूर्णपणे हताश झाला होता भुकेणे व्याकुळ झाला होता. हा सर्व घटनाक्रम घडत असताना शिकारी बेलाच्या झाडावर बसून बेलाची पाने तोडून झाडाखाली टाकत होता आणि ती बेलाची पाने झाडाखाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. झाडाखाली असलेल्या शिवलिंगामध्ये शिवशंकरचा वास होता. जागरण, उपवास, शिव मठामध्ये शिवरात्री व्रत कथा ऐकणे आणि शिवलिंगावर बेलाची पाने पडून झालेली शिवलिंगाची पुजा अशा प्रकारे त्या शिकार्‍याला शिवरात्र घडली होती आणि शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते.

काही वेळानंतर नर हरिण आणि त्याच्या सर्व पत्नी आणि मुले हे सर्वजण वचन दिल्याप्रमाणे त्या शिकार्‍याकडे आले. साक्षात शिवशंकर शिकार्‍यावर प्रसन्न झाल्यामुळे शिकार्‍याचे हृदय प्रेमळ आणि दयाळू झाले होते आणि शिकार्‍याला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि त्याने इथून पुढे कधीही शिकार न करण्याचे ठरवले. शिकार्‍याने त्या सर्व प्राण्यांना जीव दान दिले. शिवशंकराच्या कृपादृष्टीने त्या सर्वांना मोक्ष प्राप्त झाला त्यांचे जीवन धन्य झाले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *