Marathi Quotes on Relationship। Family Status in Marathi
Marathi Quotes on Relationship, Family Status in Marathi
नमस्कार मित्रांनो mywordshindi.com मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे. मित्रांनो माणूस हा समाजप्रिय व्यक्ति आहे, तो समाजाशिवाय जगू शकत नाही, समाजामध्ये जगत असताना तो अनेक नाती निर्माण करतो, अनेक माणसे जोडतो पण हीच जोडलेली नाती जपत असताना कळत नकळत त्याच्या हातून काही चुका होतात, गैरसमज निर्माण होतात आणि हीच फुलांच्या रोपट्यासारखी जीवनभर जपलेली नाती काही क्षणात उधवस्त होतात. मित्रांनो नाती जरूर निर्माण करावीत, माणस जरूर जोडावीत पण नाती जोडत असताना कोणत्याही अपेक्षांशिवाय कोणत्याही स्वार्थाशिवाय नाती जोडली जावीत कारण अपेक्षाभंग झाला की नाती तुटायला वेळ लागत नाही.
नात कोणतही असो रक्ताच किंवा जोडलेल पण जर नात्यामध्ये स्वार्थ, गैरसमज आला की नाती संपतात. म्हणून नाती भावनांनी जोडली गेली पाहिजेत, नाती प्रेमान जोडली गेली पाहिजेत तरच अशी नाती आपल्या आयुष्याला जातील. मित्रांनो खास तुमच्यासाठी आज आम्ही Marathi quotes on relationship ह्या पोस्ट मध्ये हृदयाला स्पर्श करणारे Marathi quotes on relationship घेऊन आलोत आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.
Marathi Quotes on Relationship, Family Status in Marathi

नात तोडण सोप असत पण नात टिकवण खूप अवघड असत.
काही नाती अशीच अर्धवट राहतात कारण एक बोलू शकत नाही आणि दूसरा समजू शकत नाही.
नेहमी समोर असल्यावर नात्यांची किमंत कळत नाही, म्हणून थोड दूर जा.
जीवनातली एक चूक आयूष्यभर केलेले उपकार मातीत घालते.
एखाद्याला इतकही आठवू नये की नंतर विसरण अशक्य होईल.
Family Status in Marathi

एखाद्यावर तेवढच प्रेम करा जितकी त्याला त्या प्रेमाची गरज आहे कारण गरजेपेक्षा जास्त प्रेमाची किमंत केली जात नाही.
खरी नाती कधीच तुटत नाहीत ती फक्त काही काळासाठी दूर जातात.
प्रेमाने जग जिंकता येत पण स्वार्थाने दुसर्याच मन सुद्धा जिंकण कठीण बनत.
मनातील भावनांनी जोडलेली नाती कधीच तुटत नाहीत, पण स्वार्थापोटी जोडलेल्या नात्यांना एकदिवस नक्की तडा जातो.
इतरांची सुद्धा किमंत करा पण त्यासाठी स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेऊ नका.
Family Status in Marathi

पैशाने सर्व काही विकत घेऊ शकाल पण पैशाने आपली माणसं कधीच विकत घेता येत नाहीत.
जो या जगात माणस ओळखायला शिकला तो या जगात जगायला शिकला.
ज्याला तुमच्या मदतीची गरज नसताना सुद्धा जो तुमच्यावर जीव लावतो, अशी माणसं भेटायला नशीब लागते.
गैरसमज हा सुंदर नात्यांचा शत्रू आहे.
श्रीमंताना इतरांपेक्षा अधिक नाती-गोती असतात.
Family Status in Marathi

सगळं जग फिरून आल्यावरच आपल्या माणसांची किंमत कळते.
एखाद्याला जाऊ देण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्याची काळजी नाही तर याचा अर्थ असा आहे की तुमचं तुमच्यावर नियंत्रण आहे. – Deborah Reber
कधी कधी आपल्याला गाढ झोपेतून उठवण्यासाठी आपल हृद्य तुटण तितकच गरजेचं असत. कारण तेच आपल्याला आपण त्यापेक्षा कितीतरी अधिक मूल्यवान आहोत याची जाणीव करून देत. – Mandy Hale
एखाद्याला आपल्या जीवनातून जाऊ देण म्हणजे तो एक इतिहासाचा भाग आहे आपल्या नशिबाचा भाग नाही. – Steve Maraboli
रक्तांच्या नात्यांपेक्षा परकी नाती सुद्धा कधी कधी श्रेष्ठ ठरतात.
Family Status in Marathi

आपल्या हृदयावरचे घाव आपल्याला दुख दिलेल्या माणसांची आठवण करून देतात.
समोर असल्यावर डोक्यात राहत आणि दूर असल्यावर हृदयात राहत.
नाती जरूर जोडा पण नात्यांत अपेक्षा मात्र काहीच ठेऊ नका तरच नात जीवनभर टिकेल.
माणस जितक्या जवळ जातात ना तितक्याच गतीने ती दूर सुद्धा फेकली जातात.
नात्यांमध्ये दुरावा हा कधीतरी येतोच कारण प्रत्येक व्यक्तिची नजर समोरच्या व्यक्तीने न पूर्ण केलेल्या अपेक्षांवर असत. – Wayne Dyer
Marathi Quotes on Relationship

जेव्हा तुम्ही लोकांकडून पूर्ण होण्याच्या अपेक्षा करणं बंद कराल तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या खर्या रूपासाठी पसंद करत आहात. – Donald Miller
खरी माणसे समोर चुका दाखवतात, आणि खोटी माणसे तोंडावर स्तुति करतात आणि आपल्या पाठीमागे आपली निंदा करतात.
कधीही कुणाकडून काहीच अपेक्षा ठेऊ नका, आपल जीवन आनंदाने जगा.
जर तुमची कोणी साथ देत नसेल तर स्वत:ची मदत स्वत करायला शिका, कारण वादळात कितीही वेळा घरट मोडल तर पाखरू आपलं घरट बांधायच कधी सोडत नाही.
प्रेम त्यांच्यावरच करा जे तुमच्यावर प्रेम करतात.

माणसे एकटीच राहतात कारण ती पूल बनवण्याएवजी भिंतीच निर्माण करायला लागतात. – Joseph F. Newton Men
आयुष्यभर पैसा कमवण्याच्या नादात आपण आपली माणसं हरवून जातो.
प्रेमाने कुटुंब एकत्र येत आणि तिरस्काराने नात नाहीस होत.
आपली माणस सोबत असतील तर जगातल कोणतच अपयश तुमच मन खचवू शकत नाही.
आपल कुटुंब आपल एक छोटसं घरट असत, जे प्रेमाच्या धाग्यांनी गुंफलेल असतं.

आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी घराबाहेर जरूर पडा पण आपले जिवलग हृदयातून बाहेर पडू देऊ नका.
आकाशात कितीही उंच भरारी घ्या पण संध्याकाळ झाल्यावर पक्षांसारख शेवटी आपल्या घरट्याकडेच परताव लागत.
जीवनातल खर धन आपल कुटुंबच आहे.
ते आईवडीलच असतात जे प्रत्येक संकटात सावली सारखे आपल्या पाठीशी उभा असतात.
आपलीच माणसं आपल्याला दुख देतात. हे एक कटू सत्य आहे.

डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण डोंगरा आड गेलेले आई वडील पुन्हा कधीच दिसणार नाहीत.
नात जपायला आयुष्य कमी पडत पण आयुष्य भर जपलेले नात तुटायला एक क्षण सुद्धा लागत नाही.
नात फक्त एकाच गोष्टीवर टिकल आहे ती गोष्ट म्हणजे विश्वास, तो कधीही गमावू नका.
जगात बुद्धीने जगा, आणि घरात प्रेमाने वागा
घराला घरपण देणारी आणि सर्व नात्यांना एकत्र बांधून ठेवणारी आईच असते.

विश्वास एक छोटासा शब्द आहे, पण तो जपायला खूप मोठा त्याग करावा लागतो.
तुमचं इतरांसोबतच वागणं तुमच कुटुंब कस आहे हे दाखवत.
या जगात तुम्हाला रडवणारे असंख्य भेटतील पण तुमचं दुख पाहून रडणारे फक्त आपलेच असतील.
मातीच भांड आणि कुटुंबाची किमंत फक्त बनवणारालाच कळते, तोडणारला नाही.
जेव्हा जीवनरूपी समुद्रात आशेची नौका बुडत असते तेव्हा कुटुंबरूपी लाकडाचा ओंडका आधारासाठी तुमच्या आसपासच पोहोत असतो.
बाप घराचा पाया तर आई घराचं मांगल्य असते.