100+गमतीदार, चावट उखाणे। Marathi Ukhane Comedy, funny & Chavat

Marathi Ukhane Comedy in Marathi, ukhane chavat ukhane in marathi for male, marathi ukhane for girlfriend funny marathi, ukhane for male, romantic marathi ukhane for female, marriage marathi ukhane list, smart marathi ukhane female.

प्रत्येक शुभ कार्यात उखाणे घेणे ही एक पारंपारिक आग्रहाची प्रथा आहे. उखाणे घेणे हा सोहळा पती पत्नी  यांचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा मनोरंजनाचा सोहळा आहे. शुभ कार्यामध्ये उखाणे घेणे हा खासकरून श्रीयांचा आवडता उत्सव आहे. संपूर्ण भारत देशामध्ये उखाणे घेणे ही प्रथा लोकप्रिय आहे. आज आम्ही या पोस्ट मध्ये खासकरून वाचकांच्या पसंतीनुसार Marathi Ukhane comedy, Marathi Ukhane funny, Chavat Marathi Ukhane घेऊन आलो आहोत, आवडल्यास प्रत्येक कार्यामध्ये यांचा नक्की उपयोग करा.

डाळीत डाळ मटकीची बायको माझ्या एका फटक्याची.

गुलाबाच्या झाडाला पानी घालतो वाकून …..चे नाव घेतो अर्धी क्वाटर टाकून.

पाटीभर तांदूळ निवडू कशी, गळ्यात घंटन वाकु कशी, पायात जोडवी चालू कशी, गणपतराव गेले टमरेल घेऊन आता संडासला जाऊ कशी.

वेडी वाकडी बाभळ हालती लचा लचा, हे आमचे —- खातात गचा गचा.

पोपटाचा जन्म मिटू मिटू करण्याकरिता आणि बाबूरावाने मटन आणले खास माझ्याकरिता

काळी कोंबडी पट्या पट्याची आणि बायको माझी एका रट्याची.

चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा मी लग्नच करत नाही बोंबलात बसा.

चपल तुटली म्हणून घेतली सांधायला —–चे नाव घेताना आले मला पादायाला.

कपाळावरच्या टिकलीचा लाल लाल रंग, मी वाचत होते अभंग आणि —राव होते दारू पिण्यात दंग.

नजर गेली दूर बाभळ होती हालत आणि हे आमचे रोज रात्री येतात दारू पिऊन डुलत.

मटनाच्या रसात पिळतो लिंबू, बायको एवढी हॉट असताना घराच्या बाहेर कशाला थांबू.

पौर्णिमेच्या रात्री आकाशात चमकतात चांदण्या नाव घ्यायच्या कार्यक्रमाला जमल्या सार्‍या ठेंगण्या.

टोपलीत टोपली टोपलीत होत्या पालेभाज्या ती माझी राणी आणि मी तिचा राजा.

आईसारख्या सासूबाईला नमस्कार करते —–रावांच्या राज्यात दिवसभर चरते.

चांदण्या रात्री —-ने घातला गळ्यात हार रात्र झाली फार पण आम्ही नाही मानली हार.

गोड गोड लाडू खमंग चिवडा —–राव मला तुम्ही जन्मो जन्मी निवडा.

भाजीत भाजी घेवड्याची —–माझ्या अगदी आवडीची.

प्लॅस्टिकच्या पिशवीत कोल्हापुरी जोडे, बायको माझी शहाणी बाकी सगळे वेडे.

म्हसोबाच्या जत्रेला पोलिसांचा पहारा, —–राव म्हणजे माळावरचा हिरा.

लांब केसाची वेणी घालते दाट, —–रावांचा लय मोठा थाट.

हंड्यावर हंडे बत्तीस हंडे, मधल्या हंड्यात काजू —-चा मुका घ्यायला मी कशाला लाजू.

चांदीच्या ताटात पांढरी शुभ्र टोपी, जेव्हा —-ने दिली पपी तेव्हा दिल झाले हॅप्पी.

संध्याकाळच्यावेळी मारत होतो गप्पा —–राव सोबत असताना पार केला शेवटचा टप्पा.

भाजीत भाजी मेथीची —–माझ्या प्रीतीची.

—–गावच पाखरू झाडावर बसलं, —-च आणि माझ प्रेम जगभर गाजलं.

काचेची बाटली कचकण फुटली माझ नाव घ्यायला लाज नाही वाटली.

भाजीत भाजी मेथीची बायको माझ्या एका हाताची.

आल्या आल्या सासूबाई नमस्कार करते वाकून —-रावांचे नाव घेते ग्लासभर टाकून.

—-ला समोरून पाहिल्यावर वाटते ऐश्वर्या रॉय आणि पाठमोरी झाल्यावर दिसते जर्सी गाय

मांडवाच्या दारी पूजला वारू —-राव रोज प्या दारू पण मला नका मारू.

झाडावर बसला चिमण्यांचा थवा—–च नाव घ्यायला एवढा आग्रह कशाला हवा.

आला आला रुकवत त्यात होत्या लाहया, —-रावांनी पिक्चर दाखवला मैने प्यार किया.

गोर्‍या गोर्‍या हातात डझनभर बांगड्या —–राव कुठे दिसत नाहीत पडले का कुठे उलट्या करून तंगड्या.

एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात —–शी लग्न केल लोडणा पडला गळ्यात.

रेशमाच्या साडीला पदर लावते साधा, —–रावांनी पिक्चर दाखवण्याचा केला मला वादा.

जात होती फुलाला पदर अडकला वेलीला, ——रावांनी लग्नासाठी प्रपोज केला —–च्या मुलीला.

हंड्यावर हंडे मधल्या हंड्यात मीठ —–च नाव घेतो सायकलवर बसून डबल सीट.

फुलात फूल मोगरा —–रावांचे नाव घेते नवरा माझा लाजरा.

आणखी वाचा:

नवरी आणि स्त्रीयांसाठी सुंदर मराठी उखाणे

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये

गुड मॉर्निंग संदेश

50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

सुंदर प्रेम कविता मराठी हृदयाला स्पर्श करणार्‍या

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *