नवरी आणि स्त्रीयांसाठी सुंदर मराठी उखाणे. Marathi Ukhane for female & Bride.

marathi ukhane for female bride

Marathi Ukhane for female & Bride. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्न समारंभ, बारसे, साखरपुडा, भूती सोडणे, ग्रहप्रवेश, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, अशा अनेक प्रकारच्या शुभ कार्यामध्ये नाव(उखाणे) घेणे ही प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. अशा प्रकारच्या शुभ कार्यामध्ये खास करून स्त्रियांना(उखाणे) नाव घेण्यासाठी आग्रह केला जातो. अशा शुभ कार्यामध्ये स्त्रियां आपल्या पतीच्या नावाने नाव(उखाणे) घेतात आणि इतरांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही या लेखामध्ये खासकरून स्त्रियांसाठी नवीन उखाण्यांचे कलेक्शन घेऊन आलो आहोत.

Marathi Ukhane for female & Bride

मंडप रंगला रंगाने हात भरला चुढ्याने ….नाव घेते हळदीच्या अंगाने.

केळ देते सोलून पेरु देते चिरून …नाव घेते स्टेजवर बसून.

हंड्यावर हंडे बत्तीस हंडे मधल्या हंड्यात चहा फुकून फुकून प्या पण मला मोठ्या घरी द्या.

माडीवर माडी बत्तीस माडी मधल्या माडीत कॉट कॉट वर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घड्याळ घड्याळात वाजली एक ….यांची मी लेक.

Marathi Ukhane for female & Bride.

इंद्रदरबारी शोभते रंभा आणि उर्वशी ….रावांचे नाव घेते गौरी गणपतीच्या पूजना दिवशी.

सासू सासरे आहेत प्रेमळ जाऊ बाई आहे हौशी … रावांचे नाव घेते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी.

देवाच्या देव्हार्‍यात दिवा लावते वाकून … रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून चांदीच्या ताटात सातारचे पेढे …नाव घेते अग्निला सात वेढे घालून.

सुखी संसाराची स्वप्ने पहाते रावांच्या डोळ्यात … रावांचा हार शेवटी माझ्याच गळ्यात.

Marathi Ukhane for female & Bride.

Marathi Ukhane for female & Bride.

माहेर आहे प्रेमळ सासर आहे हौशी …च नाव घेते लग्नाच्या दिवशी.

ईश्वराच्या चरणी फुले वाहते श्रद्धेने … रावां बरोबर लग्न जमले पांडुरंगाच्या कृपेने.

चांदीच्या ताटात मटनाचा रस्सा मी लग्नचं करत नाही बोंबलत बसा.

रास माझी कुंभ … रावांचे नाव घेण्यास आजपासून केला आरंभ.

आला आला रुकवत त्यात होती खडीसाखरेची वाटी रावांचे नाव घेते जन्मो जन्मी साठी.

लाल मणी काढले काळे मणी जोडले, … रावांसाठी आईवडील सोडले.

पायात पैजण, नाकात नथ …रावांनी घरी न्यायला आणला मला रथ.

गुलाबाच्या फांदीवर पाय कसा ठेऊ, लग्नाच्या आधी नाव कस घेऊ.

सहज गेली फुलाला पदर अडकला वेलीला ….रावांचे नाव घेते पसंत केले …..यांच्या मुलीला

द्राक्षाच्या बागेत पोपट करतो टोटो …. रावांच्या हातात माझाच फोटो.

चांदीच्या ताटात मिठाईचा पुडा …रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा.

कोकीळेने गायले गाणे आवाज भिडला गगनाला …राव आले दारी आनंद झाला माझ्या मनाला.

…रावांनी निवडले मला अर्धांगींनी म्हणून ग्रहप्रवेश करते सर्वांना नमस्कार करून.

मोगर्‍याचा गजरा केसात साजे …राव आले दारी सौभाग्य माझे.

थंडीच्या दिवसात वारा लागे गार …रावांची नजर म्हणजे काळजावर वार.

कोल्हापूरची देवी नवसाला पावते …रावांच्या नावाच, कुंकू मी लावते.

मोत्याची माळ शोभते माझ्या गळा …रावांना माझा खूप आहे लळा.

पांढर्‍या शुभ्र आकाशात पक्षी विहार करतात छान …रावांसाठी करते मी माझ्या जीवाच रान.

आणखी वाचा:

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेट्स मराठी

50+ जीवनावर महान विचार

गर्ल एट्टीट्यूड स्टेटस दो लाइन

30+ दर्द भरे स्टेट्स दो लाइन हिंदी मे

टॉप 40+ गर्ल एट्टीट्यूड स्टेटस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *