{SMS} Missing Father After Death in Marathi Miss u Papa Status
Missing father after death in Marathi, Miss u papa status in Marathi after death, father death quotes in Marathi.
बाबा तुमची उणीव म्हणजे जस दिवसा “सूर्याच” आकाशात नसणं आणि रात्री “चंद्राच” आकाशात नसणं अशी आहे. miss you dad!
बाबा रात्री जेव्हा मी आकाशात पाहतो तेव्हा अस वाटत तुम्ही तारा होऊन आम्हाला पाहत आहात, आणि तुम्ही आमच्या सोबत असल्याची गोड जाणीव होऊन जाते. miss you dad!
बाबा तुम्ही आज ही माझ्या जीवनाचे रीयल हीरो आहात. miss you dad!
बाबा तुमचा प्रत्येक शब्द माझ्या लक्षात आहे, बाबा माझा प्रत्येक आनंद तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. miss you dad!

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीतली चव नाहीसी झाली आहे. बाबा तुम्ही पुनर्जन्म घ्या आणि लवकर परत या. miss you dad!
बाबा अशी अर्ध्यावरती साथ सोडून का गेलात, आम्हाला पोरक करून दूर निघून का गेलात. miss you dad
जे देवाकडे मागितल ते कधी भेटलच नाही आणि जे पपांकडे मागितल ते कधी भेटल नाही अस कधी झालच नाही. miss you dad!
बाबा तुम्ही गेल्यापासून आमच्या डोक्यावरच आभाळ नाहीस झालय, तुमच्या शिवाय जीवन जगन बाबा आता खूप असह्य झालय, miss you dad!

बाबा तुमच्या प्रत्येक कठोर शब्दामागे मायेचा झरा लपला होता, बाबा तुमच्या प्रत्येक घामाच्या थेंबामागे आमच भविष्य लपल होत. खूप आठवण येते तुमची बाबा! I love you dad!
बाबा तुम्ही जीवंत असताना तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करायची होती मला पण आज ती सर्व स्वप्ने पूर्ण झालीत पण दुर्भाग्य माझे की तुम्ही ते पाहण्यासाठी आमच्यामध्ये नाही आहात पण खर्या अर्थाने त्या स्वप्नांना आता काहीच अर्थ उरला नाही. I am sorry my dad i miss you so muchबाबा आज ही तुमची फार आठवण येते तुम्हाला आठवताना नयनी अश्रु दाटून येते. miss you dad!
बाबा खरचं तुम्हाला विसरता येणार नाही…..तुम्ही आम्हाला सोडुन गेलात पण तुम्हास रोज आठवन केल्याशिवाय दिवस जात नाही. I miss my dad too much
Missing Father After Death in Marathi

मला सावलीत ठेवून जीवनभर उन्हात तळपत राहिला, असा एकच देवदूत मी माझ्या आयुष्यात माझ्या बाबाच्या रूपात पाहिला. miss you dad!
बाबा हे जग खूप वाईट आहे, बाबा तुम्ही गेलात आणि लोकांची खरी रुपे दिसायला लागली, बाबा तुम्ही आम्हाला सुखात ठेऊन हे सर्व कस सहन केल असेल हे आठवताच खूप वाईट वाटत बाबा, बाबा तुम्ही लवकर परत या! miss you dad!
बाबा तुम्ही माझा खरा आत्मविश्वास होता, अशक्य ते शक्य करण्याची ताकत केवळ तुमच्या एका शब्दातून येत होती. miss you dad!
खूप काही सांगायचं आहे रे बाबा तुला! बाबा लवकर परत ये! miss you dad!

स्वत:च्या स्वप्नांना आणि इच्छांना मारून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र राबणारी या जगात एकच व्यक्ति आहे ती म्हणजे आपले बाबा! miss you dad!
ज्या व्यक्तीने आपल्या उभ्या आयुष्यात आपल्याला कशाचीही झळ लागू दिली नाही अशी व्यक्ति म्हणजे फक्त आपले पपा! miss you dad!
कधी रूसल्यावर माझी समजूत काढत होता, माझी प्रत्येक चूक माफ करत होता, कधी उपाशी झोपलो तर आईला हळूच म्हणत होता, उठव त्याला आणि दोन घास चारून झोपव त्याला अस म्हणत होता! miss you dad!

आपल्या बाबांचा त्याग:
वडील हे आपल्या कुटुंबाचा आधार असतात, ज्या घरामध्ये वडील असतात त्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही.
घराला घरपण हे खर्या अर्थाने वडिलांमुळेच येते. आई रडून मोकळी होते पण वडिलांचा हृदय रडत असत. आई जशी अश्रुं द्वारे आपल दुख व्यक्त करते
तसे वडील आपल् दुख डोळ्यांतील अश्रु द्वारे व्यक्त करत नाहीत कारण वडिलांना माहीत असते आपण जर रडलो आपण जर खचलो तर संपूर्ण कुटुंबाचा आधार संपले संपूर्ण कुटुंबाचा आत्मविश्वास हरवेल म्हणून वडील आपल दुख रडून कधीच व्यक्त करत नाही.
पण ज्यावेळी दुख असह्य होऊन जात, ज्यावेळी दुख सहन शीलतेच्या पलीकडे जात तेव्हा या जगातील कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रु वाहिल्या शिवाय राहणार नाहीत.
आपले वडील आपण लहान असताना आपल्याला हव ते देतात, आपला सर्व हट्ट पूर्ण करतात. लहान असताना पाहिजे तो खाऊ देणे,
Miss U Papa Status in Marathi

पाहिजे ती वस्तु खरेदी करून देणे ह्या सर्व गोष्टी आपले पपा आपल्याला पुरवतात. खरच वडिलांची जागा या जगात दुसर कुणीच घेऊ शकत नाही. आपले बाबा आपल्यासाठी खूप ग्रेट आहेत. सायकल ते बाइक इथपर्यंतचा प्रवास आपले बाबाच आपल्याला घडवतात.
आपण आपल्या आयुष्यात एक सक्सेस फूल व्यक्ति व्हावं यासाठी आपले बाबा आपल्याला हव ते पुरवतात, आपल्या शिक्षणावर खर्च करणे, कॉलेज मध्ये असताना प्रत्येक महिन्याचा पॉकेट मनी पुरवणे आणि पिकनिक या सर्व गोष्टींवर आपले बाबा खर्च करतात.
आपले बाबा आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत, ज्यावेळी बाबा सोबत असतात त्यावेळी जगातील कोणतच संकट आपल्याला भीती दाखवू शकत नाही.
बाबा सोबत असल्यावर एक वेगळीच शक्ती अंगामध्ये संचारते. जे दुख, जे अपयश आपण पाहिल ते आपल्या मुलांना पहायला मिळू नये म्हणून आपले बाबा अहोरात्र कष्ट घेतात.
आपली स्वप्ने बाजुला ठेवून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपले बाबा दिवस रात्र कष्ट घेत असतात, आपल्या बाबांच्या प्रेमाला, मायेला, आणि कष्टाला कोणतीच सीमा नाही. आपल्या बाबांच प्रेम आपल्यासाठी आभाळा एवढ विशाल आहे.
आपल्या मुलांच्या सुखासाठी बाबा कोणत्याही प्रकारचा त्याग करायला मागे पुढे पाहत नाहीत. खरच आपले बाबा आपल्यासाठी साक्षात ईश्वरचा अवतार आहेत.
पण बाबा जीवंत असताना बाबांच्या कष्टाची जाणीव फारच थोड्या लोकांना होते. आणि खरी जाणीव, खरी जाग तेव्हा येते जेव्हा बाबा हे जग सोडून दूर निघून जातात.
मित्रांनो तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले “status about missing father after death in Marathi” आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेयर करा.