50+ Personality Status Quotes in Marathi for WhatsApp

Personality Status in Marathi, Personality Quotes in Marathi.

Personality Status Quotes in Marathi

प्रेम, नम्रता, सहनशीलता, धैर्य, आत्मविश्वास, ध्येय, कष्ट, आणि शुद्ध चारित्र्य हे चांगल्या व्यक्तिमत्वाचे उत्तम गुण आहेत.

उत्तम व्यक्तिमत्व हे तुमच्या जीवनाच सार आहे.

स्व:तावर पूर्ण विश्वास असेल तर या जगातील कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही.

तुमचं कार्य हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे.

Personality Status Quotes in Marathi
Personality Status in Marathi

तुमचा आनंद आणि तुमचं यश तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.

दुर्गुणांचा धिक्कार आणि सद्गुणांचा स्वीकार करण हे उत्तम व्यक्तिमत्व  निर्माण करण्यासाठी उचललेल पहिलं पाऊल आहे.

तुमचे वाईट गुण तुमच्या सौंदर्‍यावरील काळे डाग आहेत.

राहणीमान साध असल तरी चालेल पण विचारसरणी महान असायला हवी.

Personality Status Quotes in Marathi
Personality Status in Marathi

व्यक्ति जवळ एक चांगलं व्यक्तिमत्व असणं म्हणजे फुला जवळ सुंगध असल्यासारख आहे.

लोकांना तुमचे Plans कधीच सांगू नका त्यांना तुमचे Results दाखवा.

आता वेळ आली आहे स्व:तला बदलण्याची जे झालं ते विसरून पुन्हा जोमाने कामाला लागायची.

जीवनात एक यशस्वी व्यक्ति होण्याबरोबरच एक सद्गुणी व्यक्ति होण सुद्धा खूप गरजेचं आहे.

Personality Status Quotes in Marathi
Personality Quotes in Marathi

चांगलं व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावं लागत.

बुद्धीमान व्यक्ति जर सद्गुणी नसेल तर त्याच्या बुद्धिमतेला काहीच अर्थ  नाही.

सहीचे रूपांतर जेव्हा ऑटोग्राफ मध्ये होईल तेव्हा तुम्ही खर्‍या अर्थाने यशस्वी झाला असे समजा.

स्व:तची ओळख निर्माण करायला खूप कष्ट घ्यावे लागतात.

Personality Status Quotes in Marathi

आत्मविश्वास हा परिपूर्ण व्यक्तिमत्वाचा आत्मा आहे.

तुमचं कर्म चांगलं आहे की वाईट आहे याच उत्तर येणारी वेळच देईल.

तुमचे विचारच तुमचं जीवन घडवत असतात. विचार बदला आयुष्य बदलेल.

तुम्ही घेतलेला एक योग्य निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो.

Personality Status in Marathi

Personality Status Quotes in Marathi
Personality Status in Marath

केवळ सुंदर, स्वच्छ दिसणं म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे, त्यासाठी आपले गुण, आपले विचार आणि आपल वागणं सुद्धा स्वच्छ असायला हवे.

जगाने तुमच्या साठी काय करावं याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्व:तसाठी काय करू शकता याचा विचार करा.

बुद्धी आणि कष्ट या दोन्हींचा ज्यावेळी योग्य वापर होतो तेव्हा यश सहजा सहजी मिळून जात.

Personality Status Quotes in Marathi
Personality Status in Marathi

जीवनात मोठ यश मिळवण्यासाठी माणसाजवळ एक उत्तम व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे.

बाहेरून श्रीमंत असल्याचा दिखावा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होण्यासाठी वेळ द्या.

स्व:तची कमजोरी समजून त्यावर मात करण ही सर्वात मोठी कला आहे.

व्यक्तिमत्व हे आपल्या परिपूर्ण जीवनातील महत्वाचा भाग आहे, आपले विचार, आपल वागणं, आपल चारित्र्य, आपला दृष्टीकोण, आपलं ज्ञान सहनशीलता, प्रेम, नम्रता, सहनशीलता, धैर्य, आत्मविश्वास, ध्येय, आणि कष्ट या सर्वांचा संगम म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व होय.

आपल्या भारतीय इतिहासामध्ये अनेक थोर असे विचारवंत होऊन गेले ज्यांचे विचार या जगाला आणि आपल्या समाजाला एक नवीन दिशा देऊन गेले आहेत.

स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबडेकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज असे अनेक थोर विचारवंत थोर व्यक्तिमत्व लाभलेले महापुरुष होऊन गेले आहेत.

एका उत्तम व्यक्तिमत्वाच खर उदाहरण म्हटलं तर यांच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तिमत्व कुठेही सापडणार नाही.

मित्रांनो आपलं व्यक्तिमत्व हे प्रभावी असायला हव, कारण समोरच्यावर प्रथम भेटीत छाप पाडायची असेल तर आपल व्यक्तिमत्व हे उत्तम आणि पर्फेक्ट असण गरजेचं आहे. ते म्हणतात ना “first impression is the last impression” ते अगदी खर आहे.

व्यक्तिमत्वाचे दोन प्रकार आहेत एक आहे outer Personality आणि दुसरी आहे inner Personality.

Outer personality:

outer personality म्हणजे प्रथम दर्शनी आपण ज्या व्यक्तीला पाहताच आपण म्हणतो की, “काय personality आहे!”

म्हणजे outer personality मध्ये व्यक्तीचा पोशाख, त्याचे कपडे, बॉडी फिटनेस, त्याचे हावभाव, त्याच बोलणं, चालणं, या सर्व गोष्टी outer personality मध्ये येतात. सध्या लोक outer personality विकसित करण्यासाठी जास्त भर देत आहेत, कारण समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी outer personality जास्त परिणामकारक आहे.

मराठी मध्ये एक म्हण आहे “जे दिसत तेच विकत” ते अगदी खर आहे. तुम्ही घरी कोणता आहार घेता, काय करता, तुमच्या जवळ किती पैसे आहेत हे कोणी पाहत नाही पण तुम्ही सध्या कसे दिसता हे सर्वजण पाहत असतात म्हणून लोक जास्तीत जास्त स्व:ताला सुंदर ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करत आहेत.

Inner personality:

inner personality मध्ये आपला ज्ञान, आपलं वागणं, आपले संभाषण, आपलं कार्यभार, आपले पद, आपले सामाजिक भान, कर्तव्यतत्परता, निर्णय घेण्याची क्षमता, वैज्ञानिक दृष्टीकोण, आपली वैचारिक पातळी आणि आपली समाजात असलेली प्रतिष्ठा या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

मित्रांनो आपण समाजात अशा काही व्यक्ति पाहिल्या असतील ज्या दिसताना अतिशय साध्या सिम्पल वाटतात पण आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी संवाद साधतो तेव्हा आपण खूप आश्चर्यचकित होतो आणि आपल्याला जाणवत की समोरची व्यक्ति खूप ग्रेट आहे,

त्या व्यक्तीचे विचार खूप महान आहेत, आणि त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख होऊन जाते. आपल्या वैयक्तिक जीवनात अशी अनेक वरून साधी वाटणारी पण विचाराने खूप मोठी असणारी माणसे भेटतात. अशा अनेक महान लोकांच्या सहवासात आल्याने आपल आयुष्य बदलून जात आणि आपल्याला जीवन जगण्याची नवी दिशा मिळते.

आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण आपलं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त प्रभावी करण्यासाठी लक्ष केन्द्रित केल पाहिजे. outer personality बरोबर inner personality विकसित करण्यासाठी सुद्धा जास्त लक्ष दिल पाहिजे.

आणखी वाचा:

Cool 90+ Marathi Caption for Instagram Attitude

Taunting Quotes on Relationships in Marathi

200+ Marathi FB Status | Instagram Marathi status new

सूचना: जर तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले “Personality Status in Marathi” “Personality Quotes in Marathi” आवडले असतील तर आपल्या मित्रासोबत सोशल मीडियावर नक्की शेयर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *