अकस्मात पडलेला पाऊस प्रसंग लेखन Prasang Lekhan in Marathi

Prasang Lekhan in Marathi. प्रसंग लेखन मराठी

प्रसंग लेखनाला अनुभवलेखन असे सुद्धा म्हटले जाते. प्रसंग लेखन हा निबंध लेखनाचाच एक प्रकार आहे.

प्रसंग लेखनाची व्याख्या/प्रसंग लेखन म्हणजे काय?

पाहिलेली घटना, स्थळ, व्यक्ती, दृश्य यांचे स्वतःच्या शब्दात आहे तसे हुबेहूब वर्णन करणे/लिहिणे याला प्रसंगलेखन असे म्हटले जाते. प्रसंगलेखन लिहिताना आपली निरीक्षणशक्ती किती प्रभावी आहे याचे दर्शन प्रसंग लेखनामध्ये दिसून येते. प्रसंग लेखन म्हणजे एखादी घटना, दृश्य पाहताना आपल्याला आलेला अनुभव यांचे हुबेहूब वर्णन होय.

प्रसंग लेखन लिहिताना खालील बाबी विचारात घ्याव्यात:

शब्दबद्ध करणारे लेखन:

प्रसंग लिहीताना एखाद्या घटनेचे दृश्याचे असे वर्णन करण्यात यावे जे वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला पाहिजे.

संवेदनशील करणारे लेखन:

प्रसंगाचे दृश्याचे वर्णन करताना लेखन हे संवेदनशील असायला हवे, म्हणजेच आपल्याला त्याप्रसंगाबद्दल काय वाटते, ती घटना, दृश्य पाहून आपल्या स्वतःच्या भावना काय आहेत याचा उल्लेख करण्यात यावा.

सहज सोप्या प्रभावी भाषेचा किंवा शब्दांचा वापर:

प्रसंग लेखन करताना सहज सोप्या आणि प्रभावी भाषेचा वापर करण्यात यावा जेणेकरून आपल्याला काय सांगायचे आहे हे वाचणाऱ्याच्या सहजपणे लक्षात येईल. निरीक्षण: प्रसंग लेखन करताना तुम्ही पाहिलेली घटना दृश्य यांचे तुम्ही किती सूक्ष्म पद्धतीने, बारकाईने निरीक्षण केले आहे. कोणकोणत्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या घटनेमध्ये पहिल्या आहेत यांचा सुद्धा उल्लेख प्रसंग लेखनामध्ये करण्यात यावा.

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये अकस्मात पडलेला पाऊस या प्रसंगाचे प्रसंग लेखन करणार आहोत.

Prasang Lekhan in Marathi

अकस्मात पडलेला पाऊस

Prasang Lekhan in Marathi

जून महिन्यातील शाळेचा पहिला दिवस शाळेच्या चार च्या सुट्टीत आम्ही सर्व विद्यार्थी मित्र आमच्या खेळांच्या शिक्षकांसोबत शाळेच्या खेळाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होतो. अचानक वातावरणामध्ये झालेल्या बदलाने आम्ही सर्वजण थोडेसे घाबरून गेलो.

आकाशामध्ये काळे ढग जमा होऊ लागले होते. जोरजोरात थंडगार वारा वाहू लागला होता. तो थंडगार वारा अंगाला स्पर्श करून जात होता. वाहत्या वार्‍यासोबत झाडे, झाडांची पाने सुद्धा डुलत होती. पक्षी आपल्या घरट्यामध्ये जाऊन बसू लागले होते, तसेच वार्‍यासोबत माती, धूळ, धुळीचे कण व कचरा सुद्धा आकाशात झेप घेत होता.

ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट काळजाचा थरकाप उडवत होता. हळूहळू वारा कमी होऊ लागला आणि आकाशातून पावसाच्या पाण्याचे थोडे थेंब पडू लागले होते. आता थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरुवात होणार हे सर्वांनी ओळखलं होतं.

तेवढ्यात खेळाच्या शिक्षकाने आम्हा सर्वांना खेळाचे साहित्य गोळा करून पटकन वर्गात जाण्याची सूचना केली. आम्ही सर्वजण वर्गात पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका जोराचा पडत होता कि शाळेच्या समोर असणारी वाहने वस्तु अगदी दिसेनाशा झाल्या होत्या.

आम्ही फार उशिरापर्यंत पावसाच्या एक संथ पडणाऱ्या धारा शाळेच्या खिडकीतून पाहत होतो. कामानिमित्त घराच्या बाहेर पडलेली माणसे मात्र पावसाच्या तावडीत सापडली होती. कारण आज पाऊस येईल याची कल्पना कुणालाच नव्हती, त्यामुळे सर्वजण भिजत आपल्या घराकडे निघाले होते.

अचानक कुठून तरी वीज पडल्याचा जोराचा कडकडाट करणारा आवाज कानावर पडायचा आणि आम्ही सर्वजण पुन्हा घाबरायचो. अचानक येणाऱ्या पावसाने सुरुवातीला मन अगदी आनंदित झाले होते पण पावसाच्या बदलत्या भयानक रूपामुळे मनात आनंदाऐवजी भीती निर्माण झाली होती.

बाहेर पडणारा मुसळधार पाऊस पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता सहजपणे दिसून येत होती. मुलांना मुलींना वाटत होते कि आता हा पाऊस जर असाच दिवस-रात्र चालू राहिला तर घरी कसं जायचं किंवा आई बाबा शेतामध्ये या अशा मुसळधार पावसामध्ये काय करत असतील? आत्ता आई-बाबा घरी तरी कसे परतणार? मग मला घरी न्यायला तरी कोण येणार?

कदाचित या विचाराने तर सर्वजण काळजी करत नसतील असा अंदाज मी मनाशी बांधला होता. त्यावेळी माझ्या मनामध्ये सुद्धा हेच विचार चालू होते. जवळ जवळ एका तासाने पाऊस कमी झाला होता आणि पावसाच्या धारा कमी पडू लागल्या होत्या. या कमी पावसामध्ये आपण घरी जाऊ शकतो असे सर्वांना वाटले होते.

काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर चालत घरी जात असत तर काही जणांना त्यांचे पालक घरी न्यायला येत असत, त्यामुळे शाळा आहे त्या वेळेत सोडण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांची घरे जवळ असल्याने ती सर्व मुली चालत आपल्या घराकडे निघाली होती, तर काही मुले शाळेपासून दूर शेजारच्या गावांमध्ये राहत असल्याने त्यांचे पालक येण्याची वाट पाहत बसले होती.  

पाऊस जवळ जवळ कमी झाला होता. तेवढ्यात शाळेच्या समोर माझे बाबा हातात छत्री घेऊन मला न्यायला आलेले दिसले व मी पटकन विस्कटलेली पुस्तके, पेन व इतर शालेय साहित्य बॅगमध्ये भरले आणि वर्गा बाहेर पडलो आणि बाबांसोबत घराकडे निघालो.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *