RIP चा अर्थ आणि फूल फॉर्म? Rip Meaning in Marathi, Rip full form in Marathi

Rip Meaning in Marathi, Rip full form in Marathi

Rip Meaning in Marathi Rip full form in Marathi

नमस्कार मित्रांनो mywordshindi.com मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे, मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये rip या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. rip या शब्दाचा वापर आपल्याला जास्तकरून सोशल मीडिया वर पहायला मिळतो.

मित्रांनो ज्यावेळी एखादी दुखद घटना घडते म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ति नैसर्गिक किंवा अनैसर्गिक पणे मरण पावते, त्यावेळी मरण पावलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी rip या इंग्रजी शब्दाचा वापर केला जातो.

Facebook, WhatsApp सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ज्यावेळी मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो timeline ला, किंवा पोस्ट केले जातात त्यावेळी त्या व्यक्तीचे मित्र, स्नेही, नातेवाईक, त्यावेळी त्या पोस्टच्या कमेन्ट बॉक्स मध्ये rip हा शब्द कमेन्ट करून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांति लागो या भावनेतून श्रद्धांजली वाहतात आणि त्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराचे सांत्वन करतात.

Rip Meaning in Marathi, Rip full form in Marathi

Rip Meaning in Marathi: Rip चा लॉन्गफॉर्म Rest in Peace असा आहे.

Rest in Peace: या इंग्रजी वाक्याचा शब्दशा मराठी अर्थ शांततेत आराम करा असा आहे.

Rip full form in Marathi: Rest in Peace (शांततेत आराम करा (आत्म्याला शांती मिळो) )

Shortcut(शॉर्टकट): मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पाहतो की whatsapp आणि facebook वर good morning साठी GM good night साठी GN टाइप केले जाते. त्याचप्रमाणे Rest in Peace साठी RIP टाइप केले जात आहे.  

ख्रिश्चन धर्म:

मित्रांनो, ख्रिश्चन धर्मामध्येरिप या शब्दाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो ज्यावेळी एखादी ख्रिश्चन धर्मातील व्यक्ति मरण पावते त्यावेळी त्या व्यक्तिला दफन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या थडग्यावर(समाधी) Rest in Peace असा मोठ्या अक्षरात उल्लेख केला जातो म्हणजेच शांततेत आराम करा असा त्याचा अर्थ होतो, आणि rip हा इंग्रजी शब्द Rest in Peace या वाक्याचा शॉर्ट फॉर्म आहे.

एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्ति, सिने अभिनेते, किंवा उद्योग पतींचे निधन होते त्यावेळी सोशल मीडिया, न्यूज वरुन मोठ्या प्रमाणात अशा लोकांना श्रद्धांजली वाहिली जाते. सोशल मीडिया वर तर जणू श्रद्धांजलीचा पाऊसच पडत असतो.

ज्यावेळी अशा नामांकित व्यक्ति मरण पावतात त्यावेळी आपल्याला सोशल मीडिया वर rip या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो मग ज्या लोकांना या शब्दाचा अर्थ माहीत नसतो असे लोक हा शब्द पाहिल्यावर गोंधळून जातात.

आणखी वाचा: भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी, Rip Meaning in Gujarati

मित्रांनो मृत्यू हा अटळ आहे ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत चालला आहे. पैसा कमवण्याच्या छंदापायी तो आपल्या मोलाच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत चालला आहे.

त्यामुळे आपलं जीवन आणि आपलं आयुष्य आपल्याच हातात आहे आपण जर आपल्या दैनंदिन कामामध्ये निष्काळजीपणा केला, व्यसन, वाईट संगत, वाईट कामे अशा गोष्टींच्या जर आपण आहारी गेलो तर आपल शरीर कमजोर होईल आणि एकदिवस आपण नक्की आजारी पडू आणि आपलं मौल्यवान जीवन आपण गमावून बसू.

पैसा काय आजचा उद्या भेटेल पण निकृष्ट दर्जाचं शरीर पुन्हा आहे तस बनवणं खूप अवघड आहे, म्हणून आपण चांगले विचार, चांगला आहार आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. रोज सकाळी कमीत कमी एक तास तरी आपण शारीरिक कसरत, किंवा शारीरिक व्यायाम करण्यासाठी दिला पाहिजे, ज्यामुळे आपलं शरीर फिट राहील आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील.

मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला या लेखामध्ये rip या शब्दाचा अर्थ समजला असेल आणि त्याचा वापर नेमका कुठे करायचा हे ही समजलं असेल. मित्रांनो जर तुम्हाला आणखी काही अशा शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेन्ट बॉक्स मधून कळवू शकता.  

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *