50+पाणी वाचवा घोष वाक्य। Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi. पाणी हा प्रत्येक सजीवाच्या जीवनातील अतिशय महत्वाचा घटक आहे. संपूर्ण सजीवसृष्टी पाण्यावर अवलंबून आहे. पाणी पृथ्वीचा आत्मा आहे, पाणी पृथ्वीचा श्वास आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी पाणी अतिशय महत्वाची भूमिका बजावते. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने केला पाहिजे, आवश्यक तेवढेच पाणी वापरले पाहिजे.

दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खाली चालली आहे त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा अपव्यय टाळला पाहीजे, पिण्याचे स्वच्छ पाणी दूषित होण्यापासून वाचवले पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्याच्या पाण्याची तोटी(नळ) पुर्णपणे बंद केली पाहिजे.

आपल्या घरामध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळला पाहीजे, किचन आणि बाथरूम मध्ये आवश्यक तेवढेच पाणी वापरले पाहिजे. पाणी वाचवण्यासाठी जर योग्य पाऊल उचलले गेले नाहीत तर पाण्याविना येणारा भविष्यकाळ खूप भयानक असेल, संपूर्ण सजीव सृष्टी संकटात सापडेल. खेडोपाडी, शहरामध्ये होणारा पाण्याचा गैरवापर थांबला पाहिजे.

पाणी वाचवणे किंवा पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे या विषयावर ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. जर प्रत्येक जन दररोज थोड थोड पाणी वाचवेल तर संपूर्ण देशामध्ये कितीतरी करोडो लीटर पाणी प्रत्येक दिवसाला वाचू शकते आणि आपण भविष्यात येणार्‍या पाणी संकटातून वाचू शकतो.

Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi

चला सर्वांना सांगूया उज्ज्वल भविष्यासाठी पाणी वाचवूया.

जर असच पाणी वाया जाईल तर प्रत्येक जीव तहानलेला राहील.

Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi

पाणी आहे अमृताची धारा पाणी आहे प्रत्येक जीवाचा सहारा.

चला हात हाती देऊया भविष्यासाठी पाणी वाचवूया.

Save Water Slogans in Marathi

पाणी वाचवा जीवन वाचवा.

चला सर्वजण मिळून शपथ घेऊया थेंब थेंब पाणी वाचवूया.

Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi

पाणी आहे जगण्याचा आधार पाण्याशिवाय शक्य नाही जीवनाचा उद्धार.

चला पाणी जतन करूया धरती मातेच सरंक्षण करूया.

Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi

जीवन छोट आहे पण जीवनात पाण्याच महत्व खूप मोठ आहे.

जर असेल स्वच्छ पाणी स्वच्छ परिसर तरच होईल जीवन अति सुंदर.

Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi

चला सर्वांना सांगूया पाणी बचतीचे उपाय सुचवूया.

बचत करा पाण्याची नाहीतर होईल हानी जीवनाची.

थेंब थेंब पाणी वाचवा दुष्काळातले दिवस आठवा.

आणखी वाचा:

इंडस्ट्रियल सेफ्टी पर टॉप प्रसिद्ध नारे

जल संरक्षण पर 21 सर्वश्रेष्ठ नारे

सड़क सुरक्षा पर 30 सर्वश्रेष्ठ नारे

शिक्षा पर 34 Latest सर्वश्रेष्ठ नारे

सुरक्षा पर टॉप 42 प्रसिद्ध नारे

Save Water Slogans in Marathi

चला झाडे लावूया पाणी संकटापासून वाचुया.

जी माणसे वाचवतील पाणी तीच माणसे समजली जातील शहाणी.

नका घालू पर्यावरणावर घाला पाणी वाचवण्याची सवय लावा.

एक पाऊल पाणी वाचवण्यासाठी एक पाऊल जीवन समृद्धीसाठी.

जर आज तुम्ही पाणी वाचवाल तर उद्या तुम्हाला पाणी वाचवेल.

जाणा महत्व पाण्याचे होईल कल्याण जीवनाचे.

जर आज तुम्ही पाणी व्यर्थ नष्ट कराल तर उद्या पाण्याविना तूमचे जीवन नष्ट होईल.

पाणी आहे प्रकृतीची अनमोल धारा, पाण्याचा वापर काटकसरीने करा.

घरो घरी देऊया नारा पाण्याचा वापर काटकसरीने करा.

चला पाण्याचे महत्व जाणूया आपल्या जीवनाला अर्थ आणूया.

पाणी पृथ्वीचा प्राण आहे मानवी जीवनाची शान आहे.

पाणी आहे अमृताची धारा पाणी आहे प्रत्येक जीवाचा सहारा.

चला हात हाती देऊया भविष्यासाठी पाणी वाचवूया.

पाणी वाचवणे प्रत्येकाच कर्तव्य आहे कारण पाणी जगण्यासाठी अति आवश्यक आहे.

स्वच्छ पाणी सुंदर मन चला वाचवूया निसर्गाचे धन.

पाणी आहे सर्वश्रेष्ठ तीर्थ पाण्याशिवाय नाही जीवनाला अर्थ.

पाणी आहे प्रत्येक जीवाचा श्वास त्यास वाचवण्याचा घ्या थोडा त्रास.

पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे.

पाण्याच रक्षण भविष्याच सरंक्षण.

पाण्याविना जग अधुर आहे पाण्यावर जीवसृष्टी निर्भर आहे.

नवीन वर्षी नवा संकल्प करू पाण्याचा वापर काटकसरीने करू.

पाणी वाचवण्याचे घ्या आज कष्ट नाहीतर येणारी पिढी होईल उद्या नष्ट.

आज तुम्ही पाणी वाचवा उद्या पाणी तुम्हाला वाचवेल.

पाण्याच रक्षण परिवारच सरंक्षण.

पाणी वाचवण्याचा घ्या पुढाकार उद्या पाणीच देईल तुमच्या भविष्याला आकार.

पाणी आहे खर सोन पण पाण्याला वाचवेल कोण?

आणखी वाचा:

अन्न की बर्बादी पर प्रसिद्ध नारे

अंगदान पर Latest सर्वश्रेष्ठ नारे

नेत्रदान पर 20 Latest (2019) नारे

40 लेटेस्ट स्वच्छता पर नारे

सूचना: भविष्यात येणार्‍या “भीषण पाणी टंचाई” या संकटापासून वाचण्यासाठी, पाण्याचे महत्व आणि पाण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी Save Water Slogans in Marathi हा लेख आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *