शिवाजी महाराज जयंती भाषण 2020. Shivaji Maharaj Speech in Marathi

Shivaji Maharaj Speech in Marathi, अंगावर शहारे आणणारे शिवाजी महाराजांचा इतिहास वर्णन करणारे जबरदस्त भाषण.

shivaji maharaj speech in marathi

इथे जमलेल्या सर्व बंधु भगिनींचे, माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांचे मी———————–मनापासून स्वागत करतो/करते.

विजेसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून गेला मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा छत्रपती शिवबा राजा होऊन गेला.

“अरे सांगतो उघडी ठेऊन छाती, देव माझा राजा शिवछत्रपती …!”

“वीर तर हजार जन्माला आले पण माझ्या शिवबा सारखा एकपण नव्हता, राजा तर अनेक झाले पण माझ्या छत्रपतीं राजासारखा एक पण नव्हता.”

“इतिहासाच्या पानावर आणि आमच्या हृदयावर फक्त शिवाजी राजाच नाव कोरलय …!”

उभ्या हिंदुस्थानाच दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा…! मानाचा मुजरा…! मानाचा मुजरा…!

“उभ्या हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा…! जय जिजाऊ…! जय शिवराय…! जय शंभुराजे…! जय महाराष्ट्र…!”

जवळ जवळ 300 वर्ष ह्या मुघलांनी हिंदुस्थांनावर राज्य केल. विदेशी लोकांनी मराठी माणसांवर अत्याचार केले. घर, जमीन सर्व काही असुरक्षित होत. प्रत्येक जन स्वताला असुरक्षित समजत होता, लोक आपल्या घरातून बाहेर पडायला घाबरत होती. अशा वेळी 1630 सालातील 19 फेब्रुवारी, तो सोनेरी दिवस होता ज्या दिवशी शिवनेरी किल्यावर जिजामातेच्या, वीरमातेच्या पोटी पुत्ररत्नाने जन्म घेतला आणि अखंड हिंदुस्थान आनंदाने न्हाऊन निघाला.

छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे भोसले, त्यांच्या मातोश्री जिजाबाई भोसले यांनी मराठी मानसाच्या स्वराज्याच स्वप्न पहिलं होत, रयतेच्या राज्याच्या स्वप्न पहिलं होत. एकीकडे पुत्र रत्नाने जन्म घेतला होता त्यांना विश्वास होता आता रयतेच राज्य निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही आणि अगदी तसच झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थानातील मराठी जनतेला मुघलांच्या गुलामगिरितून मुक्त केल.

Shivaji Maharaj Speech in Marathi

वयाच्या 14 व्या वर्षी शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक, अवघ्या महाराष्ट्राला गुलामगिरीच्या बेड्या तोडून स्वाभिमानान जगायला शिकवणारे, छत्रपती शिवाजी महाराज असे एकच महान व्यक्तिमत्व होऊन गेले, ज्यांनी आपल्या महान कर्तुत्वातून मराठा साम्राज्याची, रयतेच्या राज्याची निर्मिती केली, आणी अगदी सर्व सामान्य माणसाला सुद्धा छाती ठोकपणे अन्याया विरुद्ध लढण्याची ताकत निर्माण करून दिली.

शिवाजी महाराजानी आपल संपूर्ण आयुष्य हिंदूस्थांनातील रयतेच्या अस्मितेसाठी समर्पित केल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक दिली जात होती, त्यांनी कधीच माणसा माणसा मध्ये भेदभाव केला नाही. आपल्या सैनिकांना सापडलेली कुराणाची प्रत त्यांनी मोठ्या आदराने मुस्लिम धर्मियांकडे दिली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पर स्त्रीला माते समान मानल होत. स्वराज्यामध्ये पर स्त्रीला वाकड्या नजरेने पाहणार्‍यांची शिवाजी महाराजांनी कधी गय केली नाही, पर स्त्रीला वाकड्या नजरेने बघणार्‍या व्यक्तींना शिवाजी राजांनी कठोरात कठोर शिक्षा केली.

असा एकच राजा होऊन गेला ज्याने स्वताच्या कर्तुत्ववार विश्वास ठेऊन, दिवस रात्र लढून रयतेच राज्य निर्माण केल. सुपारी च्या खंडाच सुद्धा व्यसन नसणारे शिवाजी राजे ज्यांनी तरुणांनसाठी नवा आदर्श घालून दिला. तरुणांना एक नवी दिशा दिली पण खरच आजचा तरुण तसा वागतो आहे का? या वर विचार करावा लागेल. शिवाजी महाराजांनी शेळी प्रमाणे जगणार्‍या जनतेला वाघासारख जीवन जगायला शिकवल, ताठमानेन वावरायला शिकवलं.

अशा थोर महापूरुषाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा…! मानाचा मुजरा…! मानाचा मुजरा…!

एवढ बोलून मी माझे चार शब्द थांबवतो. जय शिवराय…! जय जिजाऊ…! जय शंभुराजे…! जय महाराष्ट्र…!

आणखी वाचा:

हृदयाला स्पर्श करणारे लव स्टेटस मराठी

इमोशनल, रोमॅंटिक SMS मराठी मध्ये

सुंदर प्रेम कविता मराठी

सुंदर गुड मॉर्निंग संदेश

50+हृदयस्पर्शी शुभ रात्री संदेश

50+जीवनावर महान विचार

आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, SMS, Status

टॉप 40 संभाजी महाराज स्टेटस

जबरदस्त मराठा स्टेटस, कोटस

Shivaji Maharaj Speech in Marathi. Shivaji Maharaj Speech in Marathi. Shivaji Maharaj Speech in Marathi. Shivaji Maharaj Speech in Marathi. Shivaji Maharaj Speech in Marathi. शिवाजी महाराज जयंती भाषण. शिवाजी महाराज जयंती भाषण, शिवाजी महाराज जयंती भाषण, शिवाजी महाराज जयंती भाषण. शिवाजी महाराज जयंती भाषण.

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *