50+{मराठी टोमणे} Taunting Quotes on Relationships in Marathi
Taunting Quotes on Relationships in Marathi, Marathi Tomne Status SMS Whatsapp Photo
वेळ दिसत नाही पण वेळ आल्यावर, वेळ सर्व काही दाखवून देते.
काही लोकांच्या सहवासात राहून दु:खी होण्यापेक्षा एकट राहिलेले बर.
काही लोकांना आमची किंमतच वाटत नाही.
प्रेम बिम काय नसत हो! हा सगळा स्वार्थ आहे.
घमंड तर सगळ्यांकडेच असतो पण नमतो तोच ज्याला माणसांची गरज आहे.
आजकाल लोक आपल्याला नात आहे म्हणून नव्हे तर आपल्या जवळ असलेल्या पैशामुळे जवळ करतात.
काय आश्चर्य आहे, ज्यावेळी आपल्याकडे असत तेव्हा सगळ्या जगाकडे असत आणि ज्यावेळी आपल्याकडे नसत तेव्हा सगळ्या जगाकडे सुद्धा नसत.
सल्ला तर सगळेच देतात पण प्रत्यक्षात मदत करण्याचं कुणी नाव घेत नाही.

लोकांचे खरे रूप हे आपल्यावर संकट आल्यावर कळते.
असुदया, शेवटी गरीबाला कोणच वाली नसतो.
ज्यावेळी माझी वेळ येईल ना त्यावेळी माझे शत्रू सुद्धा माझ्याशी मैत्री करायला तडपतील.
मी लोकांचा अपमान कधीच करत नाही फक्त त्यांच कुठ चुकतय एवढच मी त्यांना दाखवतो.
आपल्या पायांचा उपयोग आयुष्यात पुढे जाण्यासाठी करा, दुसर्यांच्या पायात पाय अडकवून त्यांना खाली पाडण्यासाठी नव्हे.
आम्ही खर बोलतो पण लोकांना ते पटत नाही.
मग आज कशी गरिबाची आठवण झाली!
तुम्ही आलात आणि आम्ही धन्य झालो!

एक विषाणू आला आणि माणसात दडलेला खरा माणूस दाखवून गेला.
पहिला तुमचा मान, आणि मग शेवटी आम्ही!
तुम्हाला शिकवण्या इतपत आम्ही इतके सुज्ञान कुठे आहोत.
शेवटी आम्हाला इथे रहायचं आहे तुमचा शब्द मोडून कस चालेल.
प्रेम काय कुणीही करत हो पण खरा जीव लावता आला पाहिजे.
तुमच्यासारखी माणसे भेटायला नशीब लागत.

काही लोकांना इतरांना मदत करण्यापेक्षा त्यांना मागे ओढण्यात जास्त मज्जा येते.

खर्याला न्याय कुठे आहे.
तुमचा/तुझा शब्द मोडण आजपर्यंत कोणाला शक्य झाल आहे का?
तुझ्या वाट जाण म्हणजे मोठ्या दगडा खाली हात घातल्यासारख आहे.
आमच्यावर लोकांनी प्रेम करावं इतके आम्ही सुंदर कुठे आहोत.
तुम्ही कितीही मोठे व्हा शेवटी बाप तो बापच असतो.

थोडीशी इज्जत काय दिली हा तर अगदी डोक्यावरच बसायला लागला.
काही स्वार्थी लोकांपासून चार हात लांब राहिलेलच बर!
मागे खेचणारी परकी माणसे कमी पण आपलीच माणसे जास्त असतात.
आज तुमची वेळ आहे उद्या माझी पण वेळ येईल.

शांत आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत.
जो अति शहाणा असतो ना शेवटी त्याचाच बैल रिकामा असतो.
तुम्ही माझ्या हातातलं हिसकावून घेऊ शकता पण माझ्या नशिबातल कधीच हिसकावून घेऊ शकत नाही.
गाढवाला गुळाची चव काय कळणार!
संधी आहे तोपर्यंत घ्या हात धुवून.
अगोदर ताटात जे वाढलय ते संपवा!
शेवटी तुमचेच खरे!
दगडापेक्षा वीट बरी!
आणखी वाचा:
50+ मनाला लागणारे SMS | Manala Lagnare SMS
200+ Marathi FB Status | Instagram Marathi status new
100+ आदर्श मराठी सूविचार संग्रह | New Marathi Suvichar Sangrah
Taunting Quotes on Relationships in Marathi
टोमणे यांबदल दोन शब्द:
खर तर इतरांना (taunting)टोमणे मारणे हे वाईट आहे पण इतरांना त्यांची जागा दाखवण्यासाठी, आणि त्यांच कुठ चुकतय हे अप्रत्यक्षरीत्या दाखवण्यासाठी अशा वाक्यप्रकारांचा कधी कधी उपयोग करावा लागतो.
पण विनाकारण अशा वाक्यांचा उपयोग करून एखाद्याचे मन दुखवू नये, फार तर असे वाक्यप्रकार टाळण्यात यावेत. मित्रांनो ज्यावेळी अशा वाक्यप्रकारांचा उपयोग आपल्यावर केला जातो त्यावेळी आपल्याला खूप वाईट वाटत अस वाटत जाणून बुजून कुणीतरी आपल्याला टोचून बोलत आहे.
मित्रांनो, आपण पाहतो आपल्या दैनदीन जीवनामध्ये रोज कोणी नाहीतरी कोणी एकमेकांना टोचून बोलत असतो किंवा टोमणे मारत असतो. काही लोकांना तर टोमणे मारण्याची सवयच झालेली असते, त्यांच्या वाक्याची, बोलण्याची सुरुवात ही टोमणे मारूनच होते.
एखाद्याच कौतुक करणे किंवा एखाद्याला प्रेमाने बोलणे हे अशा लोकांना जमतच नाही, मग अशा लोकांपासून सर्वजण दूर राहणेच पसंत करतात. अशा लोकांच्या संपर्कात जाणे सर्वजण टाळतात.
आपल्या घरामध्ये पण कधी आपले वडील आणि आपली आई आपण ज्यावेळी चुकीच वागत असतो ना त्यावेळी ते आपल्याला सुद्धा टोमणे मारून आपली चुक अप्रत्यक्षरीत्या दाखवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत असते आपला मुलगा/मुलगी आता मोठी झाली आहे प्रत्यक्ष बोलावं तर नाराज होईल म्हणून काही माणसे टोमणे वापरुन आपली चूक आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतात.
टोमणे मारण्यात अग्रेसर कोण असेल तर आपली मित्र मंडळी, त्यांच प्रत्येक वाक्य म्हणजे नवीन टोमण्याचा जन्मच आहे. मित्रमंडळी सतत आपल्या मित्रांना सहकार्यांना टोमणे मारत राहते कारणं त्यांना तो विनोदाचा भाग वाटतो म्हणून आणि काही मित्र टोमणे मारून तोंड सुख घेतात.
मित्रांनो आज आम्ही या पोस्ट मध्ये दिलेले “Taunting Quotes on Relationships in Marathi” म्हणजे “मराठी टोमणे” आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर शेयर करा.