100+विश्वास स्टेट्स कोटस। Vishwas Marathi Status Trust Quotes

Vishwas Marathi Status Quotes, Trust Quotes in Marathi

विश्वास एक छोटासा शब्द आहे
वाचायला गेल्यावर एक क्षण लागतो,
विचार करायला गेल्यावर एक मिनिट लागतो
आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य जात.

Vishwas Marathi Status Quotes

स्वत:च्या पंखावर विश्वास असणार्‍या पक्षांना आकाशाच्या उंचीची भीती नसते.

Vishwas Marathi Status Quotes

स्वत:वर विश्वास असणं ही यशाची पहिली पायरी आहे.

Vishwas Marathi Status Quotes, Trust Quotes in Marathi

Vishwas Marathi Status Quotes

नात्यापेक्षा विश्वास हा सर्वश्रेष्ठ आहे,
कारण जिथे नात असेल तिथे विश्वास
असेलच अस मात्र नाही पण जिथे
विश्वास असतो तिथे मात्र नात आपोआप तयार होत.

विश्वास एक अशी गोष्ट आहे जो कमवायला आयुष्य लागत
आणि गमवायला एक क्षण सुद्धा लागत नाही.

Vishwas Marathi Status Quotes

काचेच्या भांड्यासारखी सर्वात जास्त वेळा तुटली जाणारी
या जगात कोणती वस्तु असेल तर ती म्हणजे विश्वास.

प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी
जर तुम्ही प्रामाणिक नसाल
तर त्या पुन्हा मिळवण कधीच शक्य आहे.

Vishwas Marathi Status Quotes, Trust Quotes in Marathi

Vishwas Marathi Status Quotes

“विश्वास” ठेस लागलेल्या वाटेवर पुन्हा कधीच जात नाही.

मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल
तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.

Vishwas Marathi Status Quotes, Trust Quotes in Marathi

Vishwas Marathi Status Quotes

जिथे विश्वास नाही तिथे प्रेम सुद्धा राहत नाही.

Vishwas Marathi Status Quotes, Trust Quotes in Marathi

Vishwas Marathi Status Quotes

एखाद्यावर पटकन विश्वास ठेऊ नका,
कारण पाण्यात मिसळलेला विषाची चव पोटात गेल्यावरच कळते.

Vishwas Marathi Status Quotes

“विश्वास” आणि “प्रेम” जबरदस्तीने जन्माला घालता येत नाहीत.

हरवलेला हिरा पुन्हा मिळेल,
पण गमावलेला विश्वास पुन्हा कधीच मिळणार नाही.

Vishwas Marathi Status Quotes

जो तुमच्यावर विश्वास ठेवतो,
त्या व्यक्तीला कधीच धोका देऊ नका.

Vishwas Marathi Status Quotes, Trust Quotes in Marathi

Vishwas Marathi Status Quotes

इतरांच्या भावनांशी खेळणं ही लोकांची सवयच झाली आहे,
म्हणून एखाद्यावर सहजासहजी विश्वास ठेऊ नका.

Vishwas Marathi Status Quotes

शरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते,
कारण श्वास संपला की जीवन संपत आणि विश्वास उडाला की नात संपत.

काही लोकांवर सख्या भावापेक्षा जास्त विश्वास ठेवला
पण इतक्या सहजपणे विश्वासघात करतील
अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.

विश्वास तर गेला “पानिपतच्या लढाईत”

Vishwas Marathi Status Quotes

आज तुम्ही आमचा विश्वासघात केला
उद्या तुमचाही कोणी तरी विश्वासघात करेल.

काही लोकांनी आमचा विश्वासघात केला
पण त्यामुळे या जगाकडे पाहण्याचा
आमचा दृष्टीकोणच बदलून गेला.

दुसर्यां नी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा
आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे. – चाणक्य

विश्वास उडाला की प्रेम संपते
आणि प्रेम संपलं की नात्यांना अर्थ उरत नाही
आणि नात संपलं की माणुसकी राहत नाही
म्हणून विश्वास जपा,
विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.

विश्वास देणार्‍या लोकांपेक्षा
विश्वास तोडणारी लोक मूर्ख असतात
कारण मूर्ख लोक आपल्या छोट्याश्या स्वार्थासाठी
लाखमोलाची माणस गमावून बसतात.

नात्यांना एकत्र बांधून ठेवतो, तो विश्वास.

जिथे विश्वास असतो,
तिथे प्रेम, आदर, आपुलकी,
नात, समाधान हे सर्वकाही असत.

तू माझ्या श्वासात आहेस कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे.

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि पुन्हा
तो त्या फांदीवर बसेलच याची काही शाश्वती नाही.

तुम्ही कोणावर कितीही विश्वास ठेवा
पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे
तो एकदिवस विश्वासघात करणारच.

स्वत:वर अविश्वास दाखवणं म्हणजे
साक्षात परमेश्वरावर विश्वास नसल्यासारख आहे.

एखाद्याने जर तुमचा विश्वास घात केला
तर त्याला धन्यवाद द्या कारण
तो तुम्हाला या जगाची रीत समजावून गेलेला असतो.

विश्वास दिसायला अदृश्य आहे,
पण विश्वासामध्ये एवढी ताकद आहे कि
एखाद्या मौल्यवान हिर्‍याची
सुरक्षा करायला सुद्धा जगातल्या
कोणत्याच शक्तीशाली कुलूपाची गरज भासत नाही.

नात तेच टिकत ज्यात गैरसमज कमी
आणि विश्वास अधिक असतो.

विश्वास आणि नात हे पाणी आणि जीवन यांसारखे आहेत
कारण जिथे पाणी असत तिथेच जीवन असत,
अगदी तसच जिथे विश्वास असतो तिथेच नात असत.

ज्ञान धन आणि विश्वास या तिन्ही गोष्टींमध्ये
फक्त एवढाच फरक आहे कि
ज्ञान आणि धन निघून गेल कि
पुन्हा मिळवता येत पण
विश्वास एकदा निघून गेला कि
पुन्हा कधीच मिळवता येत नाही.

विश्वास ठेवा पण सावधगिरी सुद्धा असुदया,
कारण कुणाचा काही भरोसा नाही.

आणखी वाचा:

Girl Attitude Status, Dialouge in Marathi, Marathi Mulgi Status

1000+ मराठी स्टेटस, कोट्स फॉर फ्रेंडशिप

TOP 51+ Emotional Status in Marathi Text

विश्वास हा नात्यांचा आत्मा असतो, नात्यांमध्ये जर विश्वासच  नसेल नात्याला काही अर्थच उरत नाही मग ते नात केवळ म्हणण्यापुरत आणि जगाला दाखवण्यापूरत शिल्लक राहत. अशा नात्यांमध्ये कोणत्याही प्रकारच प्रेम, माया नसते. मित्रांनो विश्वास हा खूप मौल्यवान आहे, विश्वास जपण म्हणजे तुमच्या सुंदर आणि माणुसकीच्या स्वभावाच खर दर्शन असत.

एखाद्यान तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला तुम्ही किती किमंत देता यावरून तुमच्या मनात त्या व्यक्तिबद्दल किती आदर आहे, किती प्रेम हे समजते. मित्रांनो नात जर आयुष्यभर टिकवायच असेल तर विश्वास दिला पाहिजे आणि तो जपाला सुद्धा पाहिजे, कारण विश्वास हा चांगल्या स्वभावाचा खरा दिगिना आहे.

आयुष्यात माणसाला सर्वकाही मिळत, अगदी पैसा, बंगला, गाडी पण नात, हरवलेला विश्वास, हरवलेल प्रेम, आणि हरवलेली माणुसकी पुन्हा कधीच मिळत नाही. मित्रांनो म्हणून आपल्या माणसांना जपा त्यांची किमंत करा, आदर करा, आपल्या माणसांना समजून घ्या. मोठ्या मनान त्यांना माफ करा.

पूर्वी नात जर रक्ताच असेल तर विश्वास डोळे झाकुन ठेवला जायचा आणि नात जर जोडलेल असेल तर विश्वास ठेवन्या पूर्वी खूप विचार केला जात असायचा, पण सध्याच्या जमान्यात नात रक्ताच असुदया नाहीतर मानलेल असुदया, विश्वास ठेवायचं तर बाजूलाच राहील पण साधी मदत सुद्धा केली जात नाही. मित्रांनो सध्याच्या काळात जीवन जगताना आपण इतरांकडून काहीच अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजेत. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण स्वत: समर्थ राहील पाहिजे.

मित्रांनो  आज आम्ही या पोस्ट मध्ये विश्वास स्टेटस, कोटस घेऊन आलो आहोत, आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेयर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *