Wedding Anniversary Wishes in Marathi text SMS, lagnachya shubhechha in marathi sms sandesh, marriage anniversary images in marathi, happy married life wishes in marathi, lagnacha vadhdivas shubhechha message.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्न हा एक असा पवित्र सोहळा आहे, जिथे दोन जीवांच मिलन होत, जिथे शपथ घेतली जाते जीवनभर साथ देण्याची, जिथे वचन दिल जात जीवनभर प्रेमानं आणि विश्वासान नात जपण्याच. खरच तो क्षण, तो दिवस आणि तो सोहळा जीवनभर आपल्या आठवणीत राहतो आणि या अतूट क्षणांच्या आठवणींचा उजाळा म्हणून साजरी केला जातो तो लग्न वाढदिवस.
जीवनभर तुम्ही दोघांनी सुखी रहावं कोणतीही अपेक्षा नाही, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो कोणताही रुसवा नाही, आणि आज या शुभ दिवशी ते सर्व काही तुम्हांला मिळो जे आतापर्यंत कोणाला मिळाल नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुख-दुखांच्या वेलीवर फूल आनंदाचे उमलू दे, फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे, नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी सुरक्षित राहू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ओळखीच रूपांतर मैत्रित, मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल, होतो जरी शरीराने वेगवेगळे पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्न म्हणजे आयुष्यातील नवे पर्व, लग्न म्हणजे दोन जीवांच मिलन, लग्न म्हणजे विश्वास आणि प्रेम, लग्न म्हणजे जन्मो जन्मीच अतूट बंधन आणि लग्नवाढदिवस म्हणजे अतूट क्षणांच्या आठवणींचा उजाळा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या शुभ क्षणी तुम्हा दोघांच्या मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
डोळ्यात तुझ्या मी माझ भविष्य पाहतो, या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची, आयुष्य भर साथ देण्याचं वचन मी तुला देतो, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याला तुमच्या दु:खाचा स्पर्श कधीही न होवो, डोळ्यात तुमच्या कधीही अश्रु न येवो, ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो आम्ही, तुमची जोडी जीवनभर सलामत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जीवनात तुमच्या बहार येवो, चेहर्यावर सदैव हास्य राहो, क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, आणि असच आपलं नात मैत्रीचं आयुष्यभर कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या शुभ दिवशी तुम्हा दोघांना वैभव, ऐश्वर्य, प्रगति, आदर्श, सुख, समाधान, संतती, आरोग्य यांचे वरदान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हा दोघांच्या जीवनामध्ये सुख, प्रेम, आनंद कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुख दु:खात एकमेकांची साथ असू द्या, एकमेकांच्या मायेची, प्रेमाची ओढ लागू द्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Wedding Anniversary Wishes in Marathi
लग्नाबद्दल नात्यांबद्दल चार शब्द:
विवाहित व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रत्येक वर्षी येणारा लग्नाचा वाढदिवस एक निराळाच आनंद घेऊन येत असतो, सुख दु:ख विसरून पुन्हा एकदा नव्याने संसार करण्याची नवी उमेद, नवी प्रेरणा मिळते. आज आम्ही या लेखामध्ये लग्न वाढदिवसाच्या समारंभादिवशी व्यक्त केल्या जाणार्या शुभेच्छा तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत, आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.
मित्रांनो लग्न म्हणजे एक सुवर्ण सोहळा आहे, ज्या मध्ये पती पत्नी सात जन्मासाठी एकमेकांचे होऊन जातात, आणि अग्नीच्या साक्षीने एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतात. पत्नी ही क्षणाची पत्नी असते आणि ती आपल्या आयुष्यभराची जोडीदारिण असते.
पत्नी ही आपल्या पतीसाठी खूप काही सहन करते तो आजारी पडल्यावर त्याची आई होते, पतीला आजारी असल्यावर घास भरवण्यासाठी त्याची माई होते. एका पत्नीला आपल्या आयुष्यामध्ये तिच्या संसारासाठी खूप काही करावे लागते, पत्नी ही आपल सर्वस्व असते.
लग्न हे सात जनमाच नात आहे ते जितकं पत्नीला निभवायला लागत तितकच ते पतीने सुद्धा निभवण गरजेचं आहे. जेवढ ती आपल्या संसारासाठी कष्ट घेते तितकच कष्ट पतीने सुद्धा आपल्या संसारासाठी घेतले पाहिजे.
सध्याच्या धावपळीच्या जीवन शैलीत नात जपण खूप कठीण होऊन बसलं आहे, कारण धावपळीच्या जीवनामुळे एकमेकांकडे लक्ष देणे अवघड होऊन बसले आहे, नवरा बायको दोघेही जॉब करत असतील तर घरामध्ये असणारा संवाद संपत चालला आहे, कारण लग्न झालं की जबाबदारी वाढते, आणि मूल बाळ झाल्यानंतर मग जीवनाची खरी परीक्षा सुरू होते.
संसाराची खरी कसोटी ही जबाबदारी अंगावर आल्यावर समजते जर तुम्ही जबाबदारी मोठ्या कष्टाने मेहनतीने पार पाडत असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विश्वास, प्रेम संपादन करण्यास समर्थ होऊ शकता.
जोडीदार हा समजूतदार असावा, आपल्या भावना समजून घेणारा असावा. जीवनातील काही छोट्या छोट्या गोष्टींवरून आपली परीक्षा घेणारा नसावा. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नात संपण्या पाठीमागच खर कारण काय आहे ते, ते म्हणजे गैरसमज!
नात्यांमध्ये गैरसमज आला की नात संपायला वेळ लागत नाही, नात दुरावायला वेळ लागत नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गैरसमज करून घेण्याअगोदर त्या गोष्टीवर स्पष्टपणे बोलणे खूप चांगले आहे.
स्पष्टपणे बोलून झाल्यावर गैरसमज लवकर दूर होऊ शकतो आणि नात्यांमधील गैरसमज पटकन दूर होऊ शकतो आणि नात अधिक विश्वासू मजबूत होऊ शकत. जीवनामध्ये जोडीदार असणं किंवा मित्र असणं खूप गरजेचं आहे,
कारण कधी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास, किंवा दु:ख असेल तर ते तुम्ही तुमच्या जोडीदाराजवळ किंवा मित्रांजवळ बोलून दाखवू शकता आणि तुम्ही तुमचे मन हलके करू शकता, थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे मित्र, तुमचा जोडीदार तुम्हाला मानसिक बळ देऊ शकतात, आणि तुम्ही तुमच्या दुखातून स्व:ताला सहजपणे सावरू शकता म्हणून जीवनात एक खरा सोबती, एक खरा जोडीदार असणं खूप महत्वाच आहे.
सूचना: जर तुम्हाला Wedding Anniversary Wishes in Marathi या लेखामध्ये दिलेल्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.
best wishes