{खास 2023} बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Sister Marathi

Birthday Wishes for Sister in Marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday messages for Sister in Marathi, bahinicha vadhdivas shubhechha Marathi madhe, ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस.

संपूर्ण जगामध्ये बहीण भाऊ यांच नात श्रेष्ठ मानलं जात. आपल्या जीवनातील आपली खरी शुभचिंतक कोण असेल तर ती आपली बहीण असते. बहीण आपल्या भावासाठी स्वत:च्या सुखाचा सुद्धा त्याग करते. दु:खामध्ये आपल अश्रु पुसणारी, दोन्ही घरी प्रकाश देणारी, आणि नात्यांना एकत्र घट्ट एकत्र बांधून ठेवणारी आपली ताई खरच खूप ग्रेट असते.

Birthday Wishes Messages for Sister in Marathi

“आई नंतर उच्चारला जाणारा दूसरा शब्द म्हणजे ताई!”
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई गेल्यावर झालीस आमचा आधार,
देऊन अथांग सागरा एवढ प्रेम केलेस आमच्यावर उपकार,
झिजवून देह स्वत:चा केलेस आम्हा भावंडाचे स्वप्न साकार.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes, Messages for Sister in Marathi
ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

सौभाग्य तुला अखंड लाभो,
सुख समृद्धि दारी नांदो,
ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो,
आमच्या ताईला शंभर वर्ष आयुष्य लाभो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

ईश्वर करो हा शुभ दिन प्रत्येक वर्षी येवो,
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes, Messages for Sister in Marathi

ताई तू आमची जान आहेस, मंमी पपांची शान आहेस.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes, Messages for Sister in Marathi
ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
तुझ प्रत्येक स्वप्न सत्यात उतरो.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

वाढ दिवस म्हणजे सोनेरी क्षणांचा सोहळा,
आणि या शुभ क्षणी ताई तुला उदंड आयुष्य लाभो.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes, Messages for Sister in Marathi

तुझ्या सुखाला कुणाची नजर न लागावी,
जीवनात धन दौलतीची भरभराट व्हावी,
आणि तुझ्या मायेचा सुगंध सर्वत्र पसरावा,
आणि हा शुभ दिवस प्रत्येक वर्षी आनंद घेऊन यावा,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या लहानपणीची मैत्रीण माझी ताई,
आणि मला मायेने खाऊचा घास भरवणारी माझी ताई,
आई घरी नसताना माझी काळजी घेणारी माझी ताई
आणि डोळ्यात तिच्या पाहिल्यावर जणू भासत होती माझी आई.
माझ्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes, Messages for Sister in Marathi

चंद्र तार्‍यांनी आकाश चमकावे,
सूर्यकिरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुगंधाने वातावरण बहरून जावे,
आणि आमच्या ताईच जीवन आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि सुख यांनी समृद्ध व्हावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes, Messages for Sister in Marathi

Birthday Wishes for Sister in Marathi

ताई तू आमच विश्व आहेस,
आणि तुझ्या शिवाय हे विश्व व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजचा दिवस खास आहे
कारण आज आमच्या लाडक्या ताईचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

ताई तू आमच्या साठी फक्त आमची ताईच नाही तर
तू आमच्या साठी मायेची, ममतेची मूर्ति आहेस,
अशी मूर्ति जी हृदयाच्या देव्हार्‍यात जीवनभरासाठी पूजली जाते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आईने जन्म दिला,
ताईने घास भरविला,
सोबत नसताना आई,
आईच्या कर्तव्याचा भार ताई तू आपल्या खांद्यावर घेतला.
ताई खरच तू खूप महान आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

“ताई” हा दोन अक्षरांचा शब्द पण या दोन अक्षरांमध्ये साक्षात आईच रूप सामावलेले आहे. लहानपणी आपल्या सोबत आपली मैत्रीण बनून राहणारी, मोठेपणी आईची जबाबदारी पार पाडणारी, आणि लग्न होऊन सासरी गेल्यावर आयुष्यभर आपली शुभचिंतक असणारी आपली ताई खरच खूप ग्रेट असते.

आपली ताई आपल्या प्रत्येक सुख दुखात सहभागी होते. आपल सुख दुख वाटून घेते. आपला गुरु आपली ताईच असते. प्रत्येक बहिणीच्या जीवनातील तिच्या भावाचा स्थान नेहमी मोठ आणि अढळ असत.

तिचा भाऊ म्हणजे तिच्यासाठी एक मोठ वरदान असत. संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात उभा राहील तरी आपली ताई आपली साथ कधीच सोडत नाही.

आई नंतर सर्वात जास्त वेदना कोणाला होत असतील तर ती आपली ताई असते जी आपल दुख पाहून आपली काळजी करते. एकवेळ सखा भाऊ तुमच्या पासून दूर निघून जाईल, तुम्हाला विसरून जाईल पण ताई तुमच्या पासून कितीही दूर गेली तरी तुमची सतत आठवण काढत राहील, तुमचं बर वाईट विचारेल.

जगातली सर्व नाती व्यर्थ ठरतील, वेळ आल्यावर बदलतील पण भाऊ बहिणीच नात हे खूप जगावेगळ असतं, कधीही न बदलणार. पण आजच्या जमान्यात आपण पाहतो कि लग्न झाल्यावर भाऊ आपल्या बायकोच्या म्हणण्यानुसार वागतात आणि आपल्या ताईला ती परकी असल्याची जाणीव करून देतात आपल्या ताईला विसरून जातात.

अरे ज्यावेळी तुम्ही लहान होता त्यावेळी तिने तुम्हाला कडेवर घेऊन संपूर्ण गाव फिरवून आणल होत. भर उन्हामध्ये तुमचे पाय भाजत असताना स्वतची पर्वा न करता तुम्हाला कडेवर उचलून घेतलं. तुम्हाला खाऊ भरवला.

आई कामावर गेल्यावर तुमचा दिवसभर सांभाळ केला आणि काल आयुष्यात आलेल्या लोकांसाठी तुम्ही तुमच्या ताईला अगदी हृदयातून, तुमच्या आयुष्यातूनच काढून टाकलं.

अरे ती ताई म्हणजे वात्सल्याची, मायेची मूर्ति आहे, साक्षात संत ज्ञानेश्वराच्या जनाबाईच रूप आहे. धन, लोभ, मोह या सर्वांसाठी आपल्या ताईच मन कधीच दुखवू नका. आईच प्रेम कुठेतरी कमी पडेल म्हणून देवान ताईला बनवलं आणि तुमच्या सेवेसाठी जन्माला घातल.

आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये पूर्वीपासूनच महिलांना कमी दर्जा दिला गेलेला आहे, आणि महिलांना समान वागणूक न देण्याची प्रथाच जणू समाजामध्ये रूजली आहे, आपल्याला काही कुटुंबामध्ये अजून ही पहायला मिळत आहे, मुलगा आणि मुलगी या दोन्ही मध्ये भेदभाव करणे, मुलांना पौष्टिक आहार तर मुलींना निकृष्ट दर्जाचं जेवण दिल जात आहे,

मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण तर मुलींना लिहण्या वाचण्यापर्यंतच शिक्षण दिल जात आहे. महिलांना, मुलींना अशा प्रकारच्या दिल्या जाणार्‍या असमान वागणुकीमुळे मुलींच महिलांच महत्व कमी ठरवलं जात आहे, आणि ही प्रवृती समाजाला घातक ठरत आहे.

म्हणून जगातील सर्व भावांना माझी एकच विनंती आहे, मित्रांनो आपल्या ताईला आयुष्यामध्ये कधीही अंतर देऊन नका.  

Leave a Comment