{Best 2024} वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा Birthday wishes for father in Marathi

Birthday Wishes for father in Marathi, Birthday wishes for father from daughter in Marathi, Birthday wishes for dad in Marathi, Birthday wishes for father from son in Marathi, Happy birthday papa in Marathi, Birthday wishes status msg quotes for father in Marathi, Happy Birthday status for papa in Marathi.

happy birthday wishes father marathi 33

माझे पप्पा माझ्यासाठी करोडो मध्ये एक आहेत,
जसा चंद्र चमकतो असंख्य चांदण्या मध्ये.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🙏हॅपी बर्थडे फादर 🎂🙏

happy birthday wishes father marathi 44

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात…
My Motivation, My Confidence,
My Happiness, My World,
My Real Hero वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday wishes father marathi 22

तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday wishes father marathi

बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि समृद्ध परिवाराचा आधार आहात,
बाबा तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Wishes Messages for father in Marathi
happy birthday papa in Marathi

आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे
कारण आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Wishes Messages for father in Marathi
Birthday wishes for dad in Marathi

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा आहात,

Happy Birthday Wishes Messages for father in Marathi

बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर घेऊन जग दाखवलं,
मायेचा घास भरवून मोठे केलं,
बाबा तुम्ही आपलं दुःख मनात ठेवुन आम्हाला सुखी ठेवल.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Wishes Messages for father in Marathi
Happy Birthday Wishes Messages for father in Marathi

तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंद घेऊन येऊ येवो,
तुमच्या मायेचा सुगंध जीवनभर असाच पसरत राहो,
तुमच्या गोड स्वभावाच्या स्पर्शाने आमच्या जीवनाचा उद्धार होवो
आणि तुमच्या वाढदिवशी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes Messages for father in Marathi
birthday wishes for father in marathi

बाबा तुम्ही नेहमी सुखी राहा,
फुलांसारखं हसत रहा,
चंद्र-तारे एवढं आयुष्यमान व्हा,

चुकलो कधी वाट अंधाररूपी जीवनात तर दिव्यासारखे आमच्या आयुष्यात प्रकाश देत रहा,
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपल्या आयुष्यातील खरी त्यागाची मूर्ती कोण असेल तर ती म्हणजे आपले बाबा,
ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं.

Happy Birthday Wishes Messages for father in Marathi

खरंच बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी धनदौलत आहात.
बाबा तुम्ही आमच्यावर केलेले उपकार मोजता येईल
असं एकही ‘माप’ या जगात शोधूनही सापडणार नाही,
बाबा तुमचे उपकार फेडणे या जन्मी तरी शक्य नाही.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं…
संघर्षाच्या वाटेवर चालायला शिकवलय,
सुखदुःख विसरुन जगायला शिकवलं,
पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं… 
अंधारातून प्रकाशाची वाट शोधायला शिकवलं,
ज्ञान देऊन दुनियातील माणसे ओळखायला शिकवलं,
पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं… 
आपल्या माणसावर प्रेम करायला शिकवलं,
मनाने खचलेल्या व्यक्तींचा भरोसा व्हायला शिकवलं,
स्वार्थाचा त्याग करून स्वाभिमानाने जगायला शिकवलं,
पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes Messages for father in Marathi
birthday wishes for father in marathi

माझा बाबा…
आम्ही आयुष्यभर सावलीत रहावं म्हणून स्वतः आयुष्य भर उन्हात झिजला,
कधी कधी स्वतः उपाशी राहुन आम्हाला अन्नाचा घास भरविला,
अशा वात्सल्याच्या च्या मुर्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हॅपी बर्थडे डिअर फादर

तुम्ही सोबत असल्यावर हे आकाश सुद्धा ठेंगण वाटतं,
अंगामध्ये हत्तीच बळ येतं,
बाबा तुम्ही सोबत असल्यावर हे संपूर्ण जग अगदी मुठीत आल्यासारखं वाटतं.
बाबा तुम्ही माझा आत्मविश्वास आहात. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes for Father in Marathi

आपले बाबा म्हणजे आपल्यासाठी साक्षात परमेश्वरचा अवतार आहेत. बाबा जीवनभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठ करतात. मुलांना चांगल्या प्रकारच शिक्षण मिळावं, मुलांचं आरोग्य चांगलं रहावं त्यांना चांगल्या प्रकारचा पौष्टिक आहार मिळावा म्हणून रात्र दिवस कष्ट घेतात. कधी कधी आई रागावली तर प्रेमाने जवळ घेणारे बाबाच असतात. आई रडून मोकळी होते पण बाबांच हृदय आतून तुटत असत.

बाबा हे आपल्या घराचे आधारस्तंभ असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या घराला धीर देणारे आपल्या घराला संकटातून सावरणारे आपले बाबाच असतात. बाबा कधी कधी आपण चुकलो तर आपल्यावर रागवतात पण ते आपल्या भल्यासाठीच पण बाबांच्या प्रत्येक कठोर शब्दा  पाठी मागे प्रेम लपलेले असते. बाबा आपल्याला लहानाचं मोठं करतात.

या जगामध्ये कसं जगायच हे शिकवतात, समाजामध्ये कसं रहायचं, मोठ्यांशी कसं बोलायचं हे सर्व बाबा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला कार्यक्षम बनवतात. आई प्रत्येक वेळीस आपली प्रत्येक चूक आपल्या पदरामध्ये घेत असते पण आईला कुठे माहित असतं की ह्याच चुका जर आपण नजरेआड केल्या तर तर उद्या आपलं मूल भविष्यामध्ये सुद्धा मोठे झाल्यावर या चुका पुन्हा पुन्हा करेल आणि वाईट मार्गाला जाईल.

मुले वाईट मार्गाला गेल्यानंतर याची फळे सुद्धा आपल्या वाईटच मिळतील. आई याचा विचार कधीच करत नाही आणि प्रत्येक वेळेस आपल्याला माफ करत असते पण बाबा आपल्या चुका माफ न करता आपल्या भविष्याचा सुद्धा विचार करत असतात. आपल्याकडून जर चुका झाल्या तर त्या चुका त्या क्षणी सुधारण्याचा बाबा आपणास सल्ला देतात.

कधी कधी रागावून ओरडून सांगतात की हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको असे बाबा आपल्याला ओरडून समजावून सांगत असतात ते आपल्या भल्यासाठीच. उद्या आपण आपल्या आयुष्यामध्ये मोठ झाल्यावर आपल्या पायावर उभा राहून एक यशस्वी व्यक्ती व्हाव, हे आपल्या बाबांचा स्वप्नं असतं. म्हणून बाबा आपल्याला प्रत्येक वेळेस काही चुकीचं दिसल्यास तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या मुलाबाळांना हवं ते मिळावं त्यांचा प्रत्येक लाड पूर्ण व्हावा याकरिता बाबा आपल्या सुखाचा त्याग करत असतात.

आपली कपडे फाटली तरी स्वतःला नवीन कपडे न घेता आपल्या मुलांना नवीन कपडे प्रत्येक सणाला घेत असतात. त्याच्या शाळेच्या फी करिता, त्याच्या आवडीचा खाऊ करता बाबा पैसे साठवून ठेवत असतात. कधीकधी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेत नाहीत व ते  पैसे वाचवून आपल्यासाठी ठेवत असतात.

आपल्या मुलांना ठेच लागल्यानंतर प्रथम आपली आई रडते. प्रथम आईच्या डोळ्यातून पाणी वाहत असते मग आपल्याला वाटतं आपली आईच आपल्यावर ती जीव लावते की काय बाबा आपला विचार सुद्धा करत नाही पण हे साफ चुकीच आहे मुलांनो, बाबांचा डोळ्यामध्ये पाणी जरी दिसत नसलं तरी बापाचं काळीज आतून रडत असतं.

बाबांना माहीत असतं जर मी ह्या क्षणी रडलो तर घरातील सर्वजण धीर सोडून देतील म्हणून आपला आत्मविश्वास हरवून बसतील या घराला मनाने आणि शरीराने सुद्धा मजबूत बनवायचे काम हे बाबा करत असतात. आपण खचून जाऊ नये म्हणून बाबा कधीही रडत नाहीत उलट आपल्याला आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचा जणू सल्ला देत असतात. पण बाबांना पण हृदय असत हे आपण लक्षात ठेवायला हव.

आपले बाबा आपल्यासाठी दिवस-रात्र कष्ट करत असतात. माझ्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं त्यांच्या पायावरती उभा रहावं ही अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून बाबा त्यांना मोठ्या जिद्दीने कष्टाने शिकवत असतात. त्यांना हवं नको ते देतात. कधी कधी स्वतःच्या चैनीच्या व आवडीच्या गोष्टी बाजूला सारून जीव मारून ठेवलेला पैसा बाबा आपल्यासाठी खर्च करत असतात.

पण खर्‍या अर्थाने आपल्याला आपले बाबा कधी कळले आहेत का? आपल्या बाबांचा त्याग आपणास कधी माहित झाला आहे का?नसेल माहित झाला तर वेळ निघून जाण्या अगोदरच आपण आपल्या बाबांना ओळखलं पाहिजे व त्यांच्या कष्टाच्या पैशाला कवडीमोलाची किंमत न देता आपण आपल्या बाबांच्या कष्टांच चीज केल पाहिजे त्यांना आदर दिला पाहिजे.

1 thought on “{Best 2024} वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा Birthday wishes for father in Marathi”

  1. तुम्हाला चांगलेआरोग्य, सुख समृद्धि आणि दीर्घायुश्य लाभो हीच प्रार्थना…!!
    वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..🎂🎂💐💐

    Reply

Leave a Comment