98+ रडवणारे ब्रेकअप स्टेटस मराठी Breakup Status in Marathi for Girl Boy

हॅलो मित्रांनो तुमचं आमच्या या ब्लॉग वर स्वागत आहे, मित्रांनो तुमचा breakup झालाय त्यासाठी ब्रेकअप स्टेटस मराठी, Breakup Status in Marathi for Girl Boy शोधताय तर मग खास हृदय तुटलेल्या हळव्या हृदयाच्या मुलींसाठी व मुलांसाठी मराठी ब्रेकअप कविता, मराठी ब्रेकअप शायरी घेऊन आलो आहोत जे तुमचं मन थोडसं हलक करतील.

तुमच्या प्रेयसीने किंवा प्रियकराने तुमच्याशी वाईट वागून तुमचं हृदय दुखावल आहे का? तुमच्या भावना दुखावल्या आहेत का? आणि तुमच्या मनातलं दुख तुम्हाला Insta वर fb वर शेअर करायच आहे त्यासाठी Breakup Status in Marathi for Girl Boy पाहिजेत व मराठी ब्रेकअप शायरी डाउनलोड करायची आहे तर ह्या पोस्ट मध्ये अपलोड केलेले ब्रेकअप स्टेटस मराठी तुम्हाला खूप आवडतील.

Breakup Status in Marathi for Girlfriend

Breakup Status in Marathi

छोटीशी गोष्ट होती आणि ती नाराज होऊन दूर निघून
गेली, माझ्या या वेड्या हृदयाला मात्र खूप रडवून गेली.

प्रेमाचा खेळ अर्ध्यावर सोडून गेलीस म्हणून काय झालं
मी एकटा तो खेळ पूर्ण करेन, तू नशिबात नाही म्हणून
काय झाल तुझ नाव माझ्या मुलीला ठेवीन.

तू मला तुझ्या पायाची धूळ समजत होतीस आणि मी
तुला माझा देव मानत होतो. मी तुझ्या प्रेमात वेडा
झालो होतो म्हणून तर तुझी रोज पुजा करत होतो.

मी खूप बिझी असते रे… वेळ मिळत नाही कॉल
करायला! हे कारण देण्याची तुला आता गरज नाही
पडणार नाही कारण मला आता समजल आहे कि तू
मला ignore करतेय ते.

जर ती दुसर्याळसोबत खुश असेल तर मला आणखी
काय पाहिजे, तीच सुख जर मला पाहावत नसेल तर
माझ प्रेम खर कस असू शकेल.

आपण रडत नाही तर आपल्याला रडवल जात, प्रेमाच
नाटक करून आयुष्यातून उठवल जात.

तू break up करून नात तोडलंस ही तुझी
मर्जी होती पण तुला आता विसरायच का आठवत
राहायचं ही आता माझी मर्जी आहे.

मी मेल्यावर तर हजारो रडतील पण शोध तर फक्त
त्या व्यक्तीचा आहे जी व्यक्ति माझ्या मरण्याने मरेल.

एखादयावर जीव लावून सुद्धा जर दुख मिळत
असेल तर जीव न लावलेला बरा.

प्रेम करण खूप सोप्पं आहे पण प्रेमात धोका
मिळाल्यावर आयुष्य सावरण खूप अवघड आहे.

हृदयावर दुखाचे, शब्दांचे व आठवणींचे वार झेलण्याची
ज्यांची तयारी असते ना फक्त त्याच लोकांनी प्रेमात
पडाव, तुमच्या सारख्या कमजोर व स्वार्थी लोकांचे ते
काम नाही.

तुझ्या आठवणी रोज येतात मला भेटायला त्यांना
तू धोका द्यायला शिकवलं असत तर बर झालं असत
त्या सुद्धा तुझ्यासारख्या दूर निघून गेल्या असत्या.

Konich Konach Nast Status in Marathi

Taunting Quotes on Relationships in Marathi

Breakup Status in Marathi

तुझ्या आठवणीत मी आज सुद्धा रडतोय, तुझ्या नावाचा
जप तर मी रोज करतोय कधी आली आठवण माझी
तर परत ये माघारी कारण आज सुद्धा मी तुझीच वाट
पाहतोय.

मी तुला माझा देव मानून बसलो होतो, माझ्या
हृदयाच्या मंदिरात रोज तुझी पुजा करत होतो पण
तू मात्र मला मंदिराच्या पायरीवर बसलेला भिकारी
समजून सोडून गेलीस.

कितीतरी खेळणी होती तुझ्यासाठी खेळायला पण तू
मात्र माझ्या हृदयाला खेळणं समजून माझ्या हृदयाशी
खेळलीस. सांगना तू इतकी का निष्ठुर झालीस.

तू रुसली असतीस तर कदाचित तुला मनवल तरी
असत पण तू तर कायमची निघून गेली आहेस आता
शोधू तरी कुठे तुला.

ज्यांच्या जाण्यामुळे जीव जाण्याची वेळ येत होती
अशा व्यक्तींना दूर जाताना पहिलं आहे मी.

सांगना तू एवढी का निष्ठुर झालीस तुझ्यावर जिवापाड
प्रेम करणार्यान तुझ्या या प्रियकराला तू सोडून का गेलीस.

मैफिलमध्ये भेटल्यावर ती मला “अनोळखी” समजायची
आणि एकांतात भेटल्यावर माझी “जान” आहेस तू अशी
म्हणायची.

खूप शौक होता मला प्रेम करायचा पण शौक शौक
मध्येच आयुष्यातून कधी उठलो मी हे समजलंच नाही.

काय काय नाही केलं मी तुझ्या फक्त एका स्माइल
साठी पण तू मात्र सोडलस मला एका अनोळखी व्यक्ती
साठी.

आयुष्याच्या प्रत्येक दिवशी आणि दिवसाच्या प्रत्येक
क्षणी मी तुझी आठवण काढत होतो इतक प्रेम करत
होतो मी तुझ्यावर पण तू माझ्याशी नात तोडताना
एवढा पण विचार केला नाही कि विरहाचे किती वार
होतील माझ्या काळजावर.

तुझ्यासाठी माझ प्रेम फक्त एक साधा खेळ होता
आणि माझ्यासाठी तुझ प्रेम जीवन जगण्याचा नवा
मार्ग होता.

तुला मला सोडून दूर निघून जायचं होत तर का
माझ्या आयुष्यात आलीस ह्या वेड्या माझ्या हृदयाला
वेड लावून दूर का निघून गेलीस.

पक्षी जितकं आपल्या घरट्यावर प्रेम करतो ना तितक
मी तुझ्यावर प्रेम करतो, मधमाशी जेवढी फुलांवर प्रेम
करते ना तितक मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यावर इतक
प्रेम करतोय म्हणून तर तू गेल्यापासून फक्त तुझीच
वाट पाहतोय.

Breakup Status in Marathi for Boyfriend

Breakup Status in Marathi

खुश असशील ना तू आता! माझ प्रेम अपूर्ण राहिलं
आहे पण तुझा time pass मात्र पूर्ण झाला असेल ना.

ज्याला मी माझा समजलं होत त्याने कधीच मला आपल
मानलं नव्हतं.

त्याने फक्त time pass केला आणि मी मात्र
त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होते. कारण माझ प्रेम
आंधळ होत.

चूक त्याची काहीच नव्हती चूक तर माझीच होती कारण
त्याच्या time pass ला मी मात्र प्रेम समजून बसली होती.

तू दिलेल्या धोक्यामुळे माझे हे हाल झाले आहेत,
मी नाही रडत रे… पण माझ्या मैत्रिणी माझे हे हाल
बघून खूप रडतात.

ज्याला नात टिकवायच असतं ना तो हजार चुका माफ
करतो पण ज्याला नात तोडायच असत ना तो शुल्ल्क
कारणावरून सुद्धा दूर निघून जातो.

काही लोकांना खर्याय प्रेमाचा अर्थच कळत नाही.

रात्र खूप शांत असते पण तुझ्या आठवणी मात्र रात्रभर
झोपून देत नाहीत.

Breakup Status in Marathi for Whatsapp

Breakup Status in Marathi

नको माझ्या मेसेजला रीप्लाय देऊ पण लक्षात ठेव
ज्या दिवशी मी ऑफलाइन असेल ना त्यादिवशी मी
या जगात तुझा मेसेज वाचायला नसेन.

खूप खूप रडशील त्यादिवशी ज्यादिवशी तुला माझी
आठवण येईल आणि मनात विचार येईल तुझ्या कि
एक वेडा होता जो माझ्यावर खूप प्रेम करायचा अगदी
वेड्यासारखा.

प्रेम एक धोका आहे हे समजल आहे मला जीवंत तर
आहे मी पण आतून मात्र मेलो आहे मी!

किती सहजपणे तू मला सांगून टाकलस कि माझ
लग्न ठरलंय आता तू मला विसरून जा! अरे पण
आपल लग्न तर त्यादिवशीच झाल होत ज्यादिवशी
तू मला I love you म्हटली होतीस आणि
मी तुला I love you too म्हटलं होत.

हजारों नात्यांना तोडलं होत मी ज्यावेळी तुला आपल
बनवलं होत मी पण तू तर तशीच निघालीस जस
मित्रांनी सांगितलं होत.

तुझ्यावर जिवापाड प्रेम केल म्हणून तू माझा जीव
घेतलास की काय.

ब्रेकअप मधून असे सावरा स्वत:ला:

मित्रांनो मी तुमच्या मनाची अवस्था समजू शकतो. आम्हाला माहिती आहे की breakup झाल्यावर काय अवस्था होते ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करतो त्या व्यक्तिला खूप like करतो, तिची खूप काळजी घेतो अशी व्यक्ति जर आपल्याला सोडून गेली, जिवापाड जपलेले नात जर काही क्षणात किरकोळ कारणासाठी तोडून गेली तर खूप वाईट वाटत. हे संपूर्ण जग उदास वाटत. कोणत्याच गोष्टी मध्ये मन लागत नाही. जीवनातला सगळा आनंद संपून गेल्यासारखं वाटत. मिठाईचा घास सुद्धा कडू लागतो अशी अवस्था होऊन जाते.

मित्रांनो आता पूर्वी सारखे खरे प्रेम करणारे लोक राहिले नाहीत, आता प्रत्येकजण आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपल्या जवळ येतो आणि त्याचे काम झाले की काही क्षणात जोडलेले नाते तोडून जातो, मग तो जाताना असा विचार करत नाही कि समोरच्या व्यक्तीचे काय होईल त्याच्या मनाची काय अवस्था होईल असा कोणीच विचार करत नाही. सगळे दगडाच्या काळजाचे लोक समाजात वावरताना आपल्याला दिसतात.

नात जोडताना मित्रांनो अशा व्यक्तीची निवड करा कि ज्या व्यक्तिला फक्त तुमची गरज आहे तुमच्या पैशाची तुमच्या प्रॉपर्टी ची नव्हे. अशा व्यक्ति बरोबर relation ठेवा ज्या व्यक्तीला फक्त तुमचा स्वभाव, तुमचं बोलणं आणि तुमची आपलुकी आवडते. जर कोणी फक्त तुमचं सौंदर्य, तुमच्या जवळ असलेला पैसा, तुमची प्रसिद्धी पाहून तुमच्यावर प्रेम करत असेल तर अशा व्यक्तींपासून थोड सावध रहा कारण पैसा, प्रसिद्धी, प्रॉपर्टि आणि सौंदर्य हे एकदिवस नष्ट होणार आहे, कमी होणार आहे पण फक्त तुमचं प्रेम तुमचा स्वभाव टिकणार आहे म्हणून फक्त अशा व्यक्तीशीच नात जोडा जो तुमच्या दिसण्यावर नव्हे तर तुमच्या स्वभावर तुमच्या गुणांवर प्रेम करतो.

तुमच्याकडे अजून काही असे Breakup Status in Marathi मध्ये असतील तर आम्हाला खाली कमेन्ट मध्ये ब्रेकअप स्टेटस मराठी नक्की पाठवा आम्ही ते या पोस्ट मध्ये add करू.

Leave a Comment