{Best 2022} झोंबणारे टोमणे Taunting Quotes on Relationships in Marathi

कोणाला तरी टोचून बोलायचं म्हटलं कि Taunting Quotes on Relationships in Marathi हे वाक्य इंटरनेट वर सर्च केल्याशिवाय मराठी टोमणे शायरी किंवा मराठी टोमणे स्टेटस चा उत्तम संग्रह सापडणार नाही हे मात्र नक्की आहे. मित्रांनो आम्ही आज या पोस्टमध्ये खास अशा लोकांसाठी मराठी टोमणे मेसेज घेऊन आलो आहोत ज्या लोकांना इतरांना टोमणे मारून त्यांची जागा दाखवून द्यायची असते व त्यांचं कुठे चुकत आहे हे त्यांना काही निवडक टोमन्यांच्या मदतीने दाखवून द्यायच असतं.

मित्रांनो हे marathi tomane तुम्हाला नक्कीच तुमच्या मनातलं बोलायला मदत करतील. ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये असे टोमणे दिले आहेत जे आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो, पण एवढ मात्र नक्की आहे कि हे टोमणे असे आहेत ज्यामुळे इतरांच मन सुद्धा दुखावेल व लोकांना हे सुद्धा कळेल कि आपल्या कडून काहीतरी चुकत आहे. शक्यतो हे टोमणे गरज असेल त्याचवेळी वापरले जावेत विनाकारण कोणाचे तरी काही कारण नसताना या पोस्ट मध्ये दिलेले मराठी टोमणे मारून मन दुखावू नये.

Best Taunting Quotes for Relatives in Marathi

Taunting Quotes on Relationships in Marathi

आमचे पण दिवस येतील तेव्हा कळेल की
कोण कुठे आहे ते!

माणूस हा कधीच वाईट नसतो परिस्थिति
त्याला वाईट बनवते.

काही लोकांच्या जिभेवर नेहमी साखर असते
तर मनात मात्र विषाचा प्याला असतो.

कोणाच्या वाचून कोणाचं काम थांबत नाही.

जर नाती जपायला जमत नाहीत तर नाती
जोडावीत तरी कशाला.

माणसाच्या नको असलेल्या अपेक्षा वाढल्या
कि आपल्याला हवी असणारी माणसे हळूहळू
दूर निघून जातात.

प्रेम पाहिजे मग प्रेम द्यायला नको.

मोबाइलमुळे जग मात्र जवळ आले पण
माणसे मात्र दुरावली.

मित्र श्रीमंत नसले तरी चालतील पण साथ
देणारे असावेत.

माणसे त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात
आणि सोईनुसार दूर जातात.

Angry Taunting Quotes in Marathi

Taunting Quotes on Relationships in Marathi

मूर्खांच्या तोंडी न लागलेलेच बरे.

वासरात लंगडी गाय शहाणी.

आम्हाला माहित आहे तू कोणाच्या जीवावर

उड्या मारतो ते.

अति शहाणा त्याचा बैल रिकामा.

उगाच दुसर्यायच्या कामात नाक खुपसायची
काय गरज आहे!

दोन शहाणी माणसं बोलत असताना तिसऱ्याने
मध्ये नाक खुपसू नये!

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं
वाकून.

अरे असू दे कळली तुझी लायकी.

उगाच शहाणपणा नको दाखवू.

तुझे हे आता करतोय ना ते तर आम्ही

आमच्या लहानपणी करत असायचो.

तू काय येडा समजतो का मला.

अरे पण लोकांच्या चौकशा करायची काय गरज

आहे तू तुझं काम कर ना.

वरुन काळा आणि आतून सुद्धा काळा.

गर्वाचे घर नेहमीच खाली असते.

तुम्ही काय मोठी माणसं तुमच्या सारख्या
मोठ्या माणसांच्या नादी लागून कसं जमलं
आमचं.

त्यांनी मला गाजर दाखवले

काही लोक चिकू सारखे असतात.

एवढा पण कंजूस नाही मी.

मग किती मार्क मिळवले.

शेवटी तू पास झालास वाटतं.

म्हशीसारखी पडून राहते नुसती.

नुसते खायला आणि हा…पाहिजे.

जिवाचा नुसता तिळपापड झाला आहे.

एकदाच संकट टळलं बाबा.

अरे असे आले किती आणि गेले किती.

गप तू शांत रहा.

वाटतं तेवढं सोपं आहे नाही ते.

करू पुढच्या वर्षी काय करायचं ते.

सरड्या सारखे रंग नको बदलु.

उद्या कळेल की कोण किती पाण्यात
आहे ते.

खिशाला कात्री लागली आहे.

बारा आण्याचा मसाला आणि चार आण्याची
कोंबडी.

तुझी डाळ अजिबात शिजणार नाही.

कोणी धुतल्या तांदळासारखा नाही शेवटी.

मला माहिती आहे तू त्याचा चमच्या आहेस ते.
वासना तसे फळ.

शेवटी हातात केळ उरले.

आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का.

आम्हाला तुमच्या घरी ठेवता का कामाला.
हो साहेब करतो.

या आग लावे!

Family Taunting Quotes in Marathi

Taunting Quotes on Relationships in Marathi

कधी कधी काहीही न बोललेलं बरं.

आज ना उद्या माझी किंमत कळेल लोकांना.

माणसाने आपल्याला जे जमतं ना तेच करावं.

उगाच कशाला वेड्याचे सोंग घेतोस.

तुम्ही नुसत्या झोपा काढा.

राहुदे आता अभ्यास पुस्तक फाडून टाकशील तू.

राहुदे किती दिवे लावणार आहे माहित आहे.

शेवटी नशिबाचा खेळ आहे, जे व्हायचे ते
होणारच!

आता मोठा अठरा वर्षाचा घोडा झाला आहेस.

गाढवा लाज वाटू दे जरा.

पण काय गरज आहे का!

बोकडासारखे केस वाढलेत ते आधी काप.

एवढी नटून थटून कुठे चाललीस.

अभ्यास घटकाभर आणि गप्पा तासभर.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.

नुसता दगड आहेस तू काही फरक पडणार
नाही तुझ्यावर.

तुझ्यापेक्षा गाढव बरा एक वेळ त्याला
समजेल पण तुला समजणार नाही.

खायला कार आणि भुईला भार.

माहित आहे शिकून किती मोठा साहेब होणार
आहे ते.

राहुद्या हो नका लई त्रास घेऊ.

Taunting Quotes for Husband in Marathi
Taunting Quotes on Relationships in Marathi

उगाच टोमणे मारु नको.

एवढं कळत आम्हाला.

शेवटी सगळे एकाच माळेचे मणी.

आता तरी चुगल्या लावायच्या बंद करा.

म्हटलं काहीतरी काम धंद्याचं पहा.

देवाने एवढी पण अक्कल दिली आहे मला.

असू द्या हो दिवस आहेत तुमचे.

मिरची झोंबली वाटत नाकाला.

ढेरी मात्र टरबूजासारखी फुगली आहे.

रंग सुद्धा काळा आणि मन सुद्धा काळे.

तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले
बाळसे.

Leave a Comment