{टॉप 48+} सावित्रीबाई फुले चारोळी मराठी | सावित्रीबाई फुले शायरी मराठी

सावित्रीबाई फुले चारोळी मराठी, सावित्रीबाई फुले शायरी मराठी: सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य नेहमी स्मरणात राहावे याकरिता व त्यांच्या कार्याचे गोडवे गाण्यासाठी अनेक कवि कवियत्री व लेखकांनी सावित्रीबाई फुले चारोळी मराठी, सावित्रीबाई फुले मराठी कविता यांवर सुंदर लेखन केले आहे. काही शायर लोकांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्या शायरी संग्रहामध्ये शायरीच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

आज आपण या लेखामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित सुंदर savitribai phule kavita charolisavitribai phule quotes या विषयवार सुंदर लेखन केले आहे, आशा आहे की आपणास नक्की आवडेल.

सावित्रीबाई फुले चारोळी

लेकीप्रमाणे आम्हाला वाढवलेस, शिकवून सवरून
मोठे केलेस, ताठ मानेने जगायला शिकवलेस,
कसे फेडू तुझे उपकार तू तर दिव्यासारखे तेवत
राहायला शिकवलेस.

सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून सवरून मोठ्या
होऊ, जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो
इतिहास घडवून जाऊ.

सावित्री तू घरोघरी शिक्षणाचे दिवे लावलेस, स्वत:
मात्र ज्योतीप्रमाणे जळून आमचे आयुष्य प्रकाशित
केलेस.

अज्ञानाच्या अंधारात सर्व स्त्रीयांचे खूप हाल होते,
तू पेटवून दिवा ज्ञानाचा आयुष्य उजळवले सर्वांचे
खरच सावित्री तुझे कार्य महान होते.

तूच आमची क्रांतीज्योति तूच आमची ज्ञानाई,
सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई,
तुझ्यामुळेच तर नशिबी आली पाहण्या निळी
शाई.

समाजाच्या विरोधाला नाही कधी डगमगलीस,
स्वप्न होते स्त्री शिक्षणाचे मनात जे पूर्ण करण्या
तुझी वाट तू चालत राहिलीस, धन्य ती क्रांतीज्योती
धन्य ती माऊली.

सावित्रीबाई फुले यांनी बालविवाहाला विरोध केला,
शोषित पीडित लोकांवर जीव लावला, कर्मकांडांना
धडा शिकवून स्त्रियांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा
पेटवला.

समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती
क्रांतीज्योती माऊली.

तुझे उपकार फेडणे अशक्य आहे या जन्मात,
क्रांतीज्योती तुझेच प्रतिबिंब आहे आमच्या मनात.

मुलींना शिकवा समजाला घडवा.

धुण्याभांड्यांपेक्षा शिक्षण महत्वाचे आहे, समाजाला
पुढे नेण्या मुलींना शिकवणे गरजेचे आहे.

सावित्री बाई फुले हे नाव जरी ऐकल तरी डोळ्या
समोर सावित्रीबाई फुले यांचं प्रभावी प्रतिबिंब उभ
राहत.

जिज्ञासा निर्माण होणं, याच नाव म्हणजे सावित्री
आहे.

मुली शिकतील तरच नाती टिकतील.

ती धैर्याने लढली महणून आम्ही घडलो.

तुम्ही शेळी गाय वर दया दाखवता, नागपंचमीला
नागाला दूध पाजता पण तुम्ही शोषित पीडित
लोकांना माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही.

आळशी बसू नका उठा आणि शिक्षण घ्या.

आपल्या खऱ्या शत्रूचे नाव अज्ञान आहे उठा आणि
त्याला जीवनातून दूर हाकलून लावा.

उठा शिक्षण घ्या, स्वावलंबी बना, कष्टाळू व्हा.
कष्ट करा आणि ज्ञान आणि धन एकत्र करा
विना ज्ञानाचे सर्व काही व्यर्थ जाते.

व पु काळे प्रेरणादायी वाक्य

सावित्रीबाई फुले एक अशी महान ज्ञानाची माऊली, ज्ञानाची ज्योति जिने कर्मठ, व रूढीपरंपरावादी समाजाचा विरोध असताना सुद्धा स्त्रीयांना शिक्षित करण्याचे महान कार्य केले. त्यावेळी समाज हा अज्ञानाने, रूढी परंपरावादी विचाराने, कर्मठ नियमांमुळे अगदी अधोगतीला लागला होता.

त्याकाळी शोषित पीडित लोकांना तसेच स्त्रीयांना खूप मोठ्या मानसिक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते अशा भयानक परिस्थितीमध्ये सामाजाच्या विरुद्ध जाऊन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे हे खूप मोठे हिंमतीचे काम होते आणि ते सावित्रीबाई फुले यांनी करून दाखवले.

गेली कित्येक वर्षापासून स्त्रीयांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. स्त्रीयांना दुय्यम स्थान दिल्या जाणार्‍या समाजामध्ये त्यांनी स्त्रीयांना शिक्षित करून मानाचे स्थान मिळवून दिले. बालविवाह यांसारख्या कठोर रूढीला त्यांनी प्रखर विरोध केला आणि घरोघरी जाऊन मुलींना शिक्षत करा असा संदेश दिला.

सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांना त्यांचे शैक्षणिक कार्य चालू ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्या कार्याला विरोध करणार्‍या समुदयाने प्रसंगी त्यांच्यावर शेण, चिखल व दगड यांचा मारा केला व त्यांना अपमानीत केले पण सावित्रीबाई फुले कधीही अशा धमक्यांना, कटकारस्थान यांना घाबरल्या नाहीत कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांचा आधार होता.

ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना नेहमी त्यांच्या कार्यासाठी प्रेरित केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले समाजातील वाईट प्रवर्तीच्या लोकांना कधीच घाबरल्या नाहीत उलट त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य जोमाने सुरू ठेवले.

If you want to share beautiful words that can inspire other friends, these savitribai phule quotes (सावित्रीबाई फुले चारोळी मराठी) will be the best option. 

Leave a Comment