Dohale Jevan Message In Marathi: मित्रांनो आपण अनेक ठिकाणी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जातो पण या सोहळ्याला संबंधित व्यक्तिला डोहाळे जेवण शुभेच्छा (Dohale Jevan Wishes In Marathi, Dohale Jevan Shubhechha) कशा द्यायच्या हे माहीत नसते त्यामुळे आज आम्ही खास तुमच्यासाठी dohale jevan sms in marathi, otibharan quotes in marathi मध्ये घेऊन आलो आहोत.
डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय?
डोहाळे जेवण म्हणजे गरोदर श्रीचे आवडते पदार्थ तिला खायला घालणे, तिची हौस पूर्ण करणे व तिच्या अवतीभोवती प्रस्सन वातावरण ठेवण होय.
Topics
Dohale jevan message in Marathi
चिमुकल्या पावलांनी कोणीतरी तुझ्या आयुष्यात खूप सारे सुख घेऊन येणार आहे त्या सुखासाठी तयार रहा. डोहाळे जेवण शुभेच्छा.
जगातलं सर्वात बेस्ट आणि महागड गिफ्ट तुला थोड्याच दिवसात मिळणार आहे, ते आयुष्यभर जपून ठेव आणि हो आम्हाला पण विसरू नको. डोहाळे जेवण शुभेच्छा.
गोड बातमी लवकरच आम्हाला कळवा आणि तुमच्याच हाताने आम्हाला पेढा नाहीतर बर्फी भरवा.
आज (होणार्या आईचे नाव) तुझ आहे डोहाळ जेवण जमलो आम्ही सारेजण, तुझ्यावर शुभेच्छांचा व आशीर्वादांचा वर्षाव करत साजरी करू हे आनंदाचे क्षण. डोहाळे जेवण शुभेच्छा.
कोणीतरी येणार येणार ग… ज्याच्या कोमल स्पर्शाने तुझं अंग सारं न्हाऊन जाणार ग. त्याच्या गोड आवाजाने घर सारं दुमून जाणार ग. तोच होणार तुझा आधार, तोच तुझ्या भाग्याचा दिवा ठरणार ग. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
लक्ष्मीच्या रूपाने गोड परी यावी तुझ्या दारी, डोहाळ जेवणाच्या तुझ्या या सोहळ्याला रंगत यावी न्यारी, डोहाळ जेवणाच्या सोहळ्याला शुभेच्छा द्यायला जमलो आम्ही मंडळी सारी. डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा.
Dohale jevan wishes in Marathi
आई होणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं सुख आहे, ते सुख आता थोड्याच दिवसात तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला खूप सारे सुख व आशीर्वाद मिळो हीच देवाकडे प्रार्थना डोहाळ जेवणाच्या गोड शुभेच्छा.
आम्हाला आतुरता आहे चिमुकल्या पावलांची, आम्हाला आतुरता आहे गोड आवाजाची, आम्हाला आतुरता आहे तुझ्या चेहर्यावरचा तो आनंद पाहण्याची, ज्यादिवशी तुझं बाळ तुझ्या कुशीत असेल. डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा.
आनंदाचे कारंजे मनी थुई थुई उडत आहेत. तुझ्या चिमुकल्याचा गोड आवाज ऐकायला मन माझं आतुर होत आहे. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
जेव्हा तू आई होशील तेव्हा खरा स्वर्ग काय असतो याचा अनुभव तुला येईल, बाळाच्या मधुर आवाजाने व नाजूक स्पर्शाने मन तुझे भरून जाईल. डोहाळ जेवण शुभेच्छा.
संपूर्ण घरादाराला परिपूर्ण करणारी कळी तुझ्या अंगणात फुलणार आहे, त्या कळीच्या मधुर सुगंधाने तुम्हा सर्वांचे आयुष्य दरवळणार आहे. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
पेढा कि बर्फी याचा विचार आता करू नको, ताटात वाढलेल्या निरनिराळ्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घे आणि भरपूर खा. डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा.
आता सर्व काही तुझ्या मनासारखे घडेल, आता प्रत्येक जण तुझा लाड करेल, तू फक्त खात रहा तुझ्या आवडीचा प्रत्येक पदार्थ आता तुझ्या ताटात पडेल. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
Otibharan quotes in Marathi
तुझ्या डोहाळे जेवणाची तयारी सर्व झाली, हिरव्या साडीतली होणारी आई तू शोभतेच भारी, रंगीबिरंगी फुलांची सजावट पूर्ण झाली, नवीन पाहुण्याच्या आगमनाला सर्व मंडळी उत्सुक झाली. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
तुझे डोहाळ जेवण तुझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरावा हीच मनी अपेक्षा. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
जगातील सर्व सुखे तुझ्या आई होण्यापूढे व्यर्थ आहेत. तुझ्या होणार्या बाळावर व तुझ्यावर देवाची कृपादृष्टी नेहमी रहावी. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
आई होण ही जगातली सर्वात मोठी भूमिका आहे आणि ती तुला आता थोड्याच दिवसात पार पाडावी लागणार आहे. आम्ही सोबत आहोतच. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
डोहाळे जेवण हे प्रत्येक स्रिच्या आयुष्यातील एक सुवर्ण सोहळा आहे. एक अविस्मरणीय असा आनंदाचा दिवस आहे. हा सोहळा श्रीचे सासर आणि माहेर या दोन्ही घरी आनंद घेऊन येणारा सोहळा असतो. डोहाळे जेवण या सोहळ्याला हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे महत्व आहे. आपली मुलगी सून ही गरोदर असल्याची बातमी कानावर येताच घरातील वडीलधार्या महिला आपल्या मुलीच्या किंवा सुनेच्या डोहाळ जेवणाच्या तयारीला लागतात.
डोहाळे जेवण हा सोहळा हा अगदी लहान मुलांपासून ते थोर मंडळीपर्यंत सर्वांना एक विलक्षण आनंद देणारा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणार्या महिलांच्या आनंदाळा पारावार राहत नाही. हा आनंद इतका असतो की तो मोजताच येणार नाही. या आनंदाची तुलना दुसर्या कोणत्याही आनंदाशी करता येणार नाही इतका हा आनंद विलक्षण असतो. या सोहळ्याला गरोदर मुलीचे माहेरच्या मंडळीकडून तसेच सासरच्या मंडळीकडून खूप गोड कौतुक करण्यात येते.
गरोदरपणात महिलांना तिच्या आवडीचे गोड, आंबट पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी डोहाळे जेवण घालणे ही पद्धत सुरू झाली आहे. डोहाळे जेवण हे जास्तकरून मुलीच्या आईच्या घरी घातले जाते, म्हणजेच मुलीच्या माहेरी घातले जाते.
या पोस्टमध्ये शेअर केलेल्या Dohale jevan message in Marathi, dohale jevan shubhechha आणि डोहाळे जेवण शुभेच्छा तसेच otibharan quotes in marathi तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या, तुमच्या ताई, वहिनी व मैत्रिणी यांच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला त्यांना ह्या शुभेच्छा आवर्जून द्या. ह्या शुभेच्छा ऐकुण सर्वजण खुश होतील.