{हटके100} Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl, मैत्रिणीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा.

Funny Birthday Wishes in Marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या
स्वप्नांना बहर येऊ दे, बस झालं आता, आता तरी
तुझ्या घरच्यांना तुझे पराक्रम कळू दे. तुला प्रकट दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.

सतत मोबाईल मध्ये गप्पा मारण्यात व्यस्त असणाऱ्या,
आईला मी अभ्यास करतेय म्हणून कामाची नेहमी
टाळाटाळ करणाऱ्या, घरात असल्यावर मोबाईल
सायलेंट मोडवर ठेवणाऱ्या, कॉलेजला जाताना उगाच
टिफिनच ओझं नको म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या
वडापावच्या गाड्यावर सलग दहा वडापाव खाणाऱ्या,
दिवसागणिक इंच इंच अंगाने वाढत जाणाऱ्या
माझ्या मैत्रिणीला प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

मी डायटवर आहे म्हणून पाणीपुरीच्या गाड्यावर
जाऊन पाणीपुरीवर ताव मारणाऱ्या माझ्या मैत्रिणीला
वाढदिवसाच्या किलोभर शुभेच्छा.

Funny Birthday Wishes in Marathi

ग्रुपमधल्या फेवरेट, चेहऱ्याने सभ्य दिसणाऱ्या,
पण अंगात 36 किडे असणाऱ्या, दंगेखोर,
कोणीही ऐकत नसताना सुद्धा सतत बडबड करणाऱ्या
मिस कॉलेज कुमारीला माझ्याकडून प्रकट दिनाच्या
सर्वांसमोर जाहीर शुभेच्छा.

रोज पावशेर चॉकलेट खाणाऱ्या, रोज एका नवीन
मुलाला हॅलो हाय करणाऱ्या, मी कशी दिसते म्हणून
सारखं समोर येऊन विचारणाऱ्या, सतत काहीतरी
चावट बोलणाऱ्या माझ्या मैत्रीणीला तिच्या प्रकट
दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

शॉपिंगला चल म्हटलं की मला काहीतरी चारणार का
असा हलकट हट्ट करणार्याी, स्वतःचं काही काम
असल्यावर मधासारखा गोड गोड बोलणाऱ्या,
तिच एखादं काम नाही केलं की म्हशीसारखं फुगणाऱ्या,
मैत्रिणीशी भांडताना अंगापेक्षा भोंगा जास्त पसरवणाऱ्या
मैत्रीणीला आम्हा सर्व मैत्रिणीकडून
तिच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

Funny Birthday Wishes in Marathi

समोरून पाहिल्यावर ऐश्वर्या रॉय वाटणाऱ्या
व पाठमोरी झाल्यावर जर्शी गायप्रमाणे दिसणाऱ्या,
अगदी सेलिब्रिटी असल्यासारखा आव आणणाऱ्या
मैत्रिणीला प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

जराशा कंजूष, जराशा धाडसी, जराशा घाबरट
पण मनाने चांगल्या असणाऱ्या मैत्रिणीला इथून पुढे
फक्त मोजकेच प्रेम आणि तुझ्या आवडत्या
पदार्थांवर ताव मारण्यासाठी देव तुला दीर्घायुष्य देवो.
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कॉलेजची आन-बान शान, मनाने दिलदार,
मैत्रिणीवर पपाने नाश्तासाठी दिलेले पैसे उधळणाऱ्या,
न मागता पाणीपुरीची पार्टी देणाऱ्या माझ्या
गोंडस मैत्रिणीला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Funny Birthday Wishes in Marathi

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl

साखरे सारख्या गोड मैत्रिणीला मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कॉलेजची आन-बान शान, हजारो मुलांच्या दिलाची
धडकन असणाऱ्या, रंगाने गोरी व अंगाने स्लिम
असलेल्या माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई बाबांची परी असलेल्या, हजारो टपोरी आणि
सभ्य मुलांचे विशेष आकर्षण असणाऱ्या,
घरी हुशार तर वर्गात ढ समजल्या जाणाऱ्या माझ्या
मैत्रिणीला प्रकट दिनाच्या दोन टेम्पो व दोन रिक्षा
भरून शुभेच्छा.

प्रत्येक वाढदिवसाला अधिक मनमोहक व अधिक
सुंदर दिसणाऱ्या पण एरवी कधीतरी आंघोळ करणाऱ्या,
माझ्या छोट्याशा बोलण्यावर मनमुरादपणे हसणाऱ्या,
प्रत्येक जण तिच्याकडे पाहून म्हणतो किती हुशार आहे
ही मुलगी पण तिच्या एका इशाऱ्याने भल्याभल्यांच्या
हृदयात वाजते हलगी. तुझ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसानिमित्त देव करो तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो,
वाढदिवसानिमित्त देते तुला शुभेच्छा तुझ्या पराक्रमाचे
गोडवे प्रत्येक गल्ली बोळात गायले जावो.

If you like “Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl” please share with your friends on social media.

Leave a Comment