{५५+ मनाला स्पर्श करणारे} भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी २०२४

सध्या आपणास भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी हे सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळतात नातेवाईक, मित्र किंवा कुटुंबातील सदस्य यांचे निधन झाल्यास भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठीतून टाईप करून हे संदेश सोशल मीडियावर मरण पावलेल्या व्यक्तीच्या फोटोसह अपलोड केले जातात व त्या व्यक्तीस श्रद्धांजली वाहिली जाते.

अशा पद्धतीने ऑनलाइन श्रद्धांजली वाहण्याचा एक नवा ट्रेण्ड आजच्या इंटरनेटच्या जमान्यात आपणास पाहायला मिळतो. आज आपण या पोस्टमध्ये असेच काही मनाला स्पर्श करणारे भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठीतून पाहणार आहोत.

काही निवडक भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी संग्रह

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

ज्यांच्या फक्त असण्याने आमच्या आयुष्यात सर्व
काही होते, ज्यांच्या शब्दांनी एक नवे बळ,
एक नवी प्रेरणा मिळत होती, ज्यांच्या मायेच्या
सावलीत आम्ही मोठे झालो व घडलो आज तीच
व्यक्ती आमच्यापासून खूप दूर निघून गेली आहे.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

ज्यांच्या प्रेमाने व विचाराने आमच्या जीवनाला
एक नवी दिशा मिळाली व एक नवा आकार
मिळाला, ती व्यक्ती आज आमच्यामध्ये नाही
याचे फार दुःख होत आहे. देवाच्या कृपेने त्यांच्या
आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली.

मित्रांचं काळीज तर आई-वडिलांचा जीव होता,
मनात प्रेम तर तोंडात नेहमी त्याच्या गोडवा होता,
नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीत कधीच नव्हता,
सर्वांना नम्रतेने मदत करत होता, खरच माझा मित्र
लाखात एक होता. ईश्वराच्या कृपेने तुझ्या आत्म्यास
शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.

जीवनभर कष्ट केले, घरात आनंदाचे क्षण फुलविले.
शब्द होते कठोर पण मनात प्रेम होते, डोळे कधी
नव्हते ओले पण हृदय मात्र त्यांचे रडले होते.
आयुष्यभर होते सोबत आमच्या पण बाबा आम्हाला
कधी कळलेच नव्हते. तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच देवाकडे प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

….आपला जीवन प्रवास संपवून आपल्या मधून दूर
देवाघरी निघून गेले आहेत, देव त्यांच्या आत्म्यास
शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.

….यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी खर्च केले,
फुलांप्रमाणे आपल्या थोर विचारांचा सुगंध समाजामध्ये
पसरवून ज्यांनी जनसामान्यांना प्रेरणा दिली, ज्यांनी
पंचक्रोशीत विकास कामाची मुहूर्तमेढ रोवून चोहीकडे
हिरवळ फुलवली, असे थोर व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही.
यासारखे मोठे दुःख कोणतेच नाही. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली.

आकाशातून ज्याप्रमाणे सूर्य नाहीसा व्हावा, फुलांमधून
ज्याप्रमाणे सुगंध नाहीसा व्हावा, मंदिरातून ज्याप्रमाणे देव
अदृश्य व्हावा आज अशी परिस्थिती ….यांच्या जाण्याने निर्माण
झालेली आहे. त्यांची कमी कोणीच भरून काढू शकत नाही.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.

अशी एकच मूर्ती होती जी जगण्याची प्रेरणा देत होती,
अशी एकच मूर्ती होती जी जीवनाचा आधार होती, अशी एकच
मूर्ती होती जिच्या डोळ्यात प्रेमाचा सागर होता, अशी एकच मूर्ती
होती जीच्या सहवासात जगण्याचा आनंद होता. भावपूर्ण श्रद्धांजली.💐

आम्हाला आशा आहे की आपणास या पोस्टमध्ये दिलेले भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी आवडले असतील. आपणास जर हे भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी आवडले तर, आपणही या संदेशांचा वापर एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी याकरिता या संदेशाचा वापर करून भावपूर्ण श्रद्धांजली ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने वाहू शकता.

आपणास भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी कसे वाटले हे आपण खाली कमेंट करून सुद्धा सांगू  शकता व आपल्या काही सूचना असतील तर खाली कमेंटमध्ये लिहून आम्हास कळवू शकता.

आपल्याकडेही अशा काही चारोळ्या असतील तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता आम्ही त्या आमच्या या ब्लॉग पोस्टमध्ये अपलोड करू जेणेकरून आणखी या ब्लॉग पोस्टची शोभा वाढेल. ही पोस्ट आपला किमती वेळ देऊन वाचल्या बद्दल आपले आभार.

Leave a Comment