Motivational quotes in Marathi for success, Motivational quotes in Marathi for students, थोरांचे विचार मराठी: यश अपयश हे सर्वस्वी आपल्या ज्ञानावर, आपल्या विचारांवर व आपल्या मेहनतीवर अवलंबून असते. विचार हे वाचायला सोपे जरी असले तरी त्यामध्ये जीवन व जग बदलण्याची ताकत असते. चांगले प्रेरणादायी विचार हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा राजा बनवण्याचे सामर्थ्य ठेवतात. मित्रांनो आज आम्ही या पोस्टमध्ये असेच काही थोरांचे विचार मराठी, Motivational quotes in Marathi for students, Motivational quotes in Marathi for success विचार आणले आहेत जे तुमचे जीवन पुर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवतात.
Motivational Quotes in Marathi for Success

या जगात फक्त दोनच प्रकारच्या व्यक्ती अपयशी
होतात एक जे विचार करतात पण काम करत
नाहीत आणि दुसरी जे फक्त काम करतात पण
विचार करत नाहीत.
तेव्हाच ते काम कठीण आहे असे म्हणा,
जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व शक्तिचा वापर करून
सुद्धा तुम्हाला ते काम जमत नसेल.

संकटापासून पळून जाणे हे सोपे असते,
संकटांना घाबरून जाणार्यां ना आयुष्यात काही
मिळत नाही, पण लढणार्यां च्या पायाजवळ
जग सुद्धा येऊन ठेपते.
ज्यावेळी हे सर्व जग गाढ झोपी गेलेलं असत
त्यावेळी उठून जो अभ्यास करतो तो इतिहास
निर्माण करतो.

नजर बदलाल तर समोरचे दृश्य बदलेले,
विचार बदलाल तर नशिब बदलेल, नौका बदलण्याची
काहीच गरज नाही दिशा बदलली की किनारे
आपोआप बदलतात.
वाघ पुढे छलांग मारण्याकरिता एक पाऊल
पाठीमागे येतो, त्याचप्रमाणे आयुष्यसुद्धा
कधी कधी आपल्याला पाठीमागे ढकलत कारण
त्यावेळी आयुष्य आपल्याला एक अप्रतिम यश
देण्यासाठी सज्ज असत.

तोपर्यंत कष्ट करत रहा जोपर्यंत तुम्हाला
तुमचा परिचय करून देण्याची गरज पडणार नाही.
तुम्ही तुमचे पाऊल जरी ध्येयाच्या दिशेने टाकले
असेल तर लक्षात असू द्या तुमच्या रस्त्यातील
काटे सुद्धा तुम्हाला रस्ता दाखवतील.

जी माणसे रात्रभर मेहनत करतात त्यांचे यश
हे जग दिवसा पाहते.
प्रयत्न करत रहा जरूर मार्ग सापडेल,
आज नाही तर उद्या मार्ग मिळेल.

जर आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ते
मिळवण्यासाठी आपण मार्ग बदलले पाहिजेत,
आपली ध्येये नव्हे.
सर्व काही मिळेल फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर
कायम रहा.

एखादे काम तोपर्यंत अशक्य वाटते जोपर्यंत
ते पूर्ण होत नाही. नेल्सन मंडेला
पहिल्या प्रयत्नात अपयशाला कधीच घाबरू नका
कारण एका यशस्वी गणिताची सुरुवात सुद्धा शून्याने होते.
जर तुम्ही चालू शकत नाही तर पळा,
जर तुम्ही पळू शकत नाही तर तुम्ही चाला
आणि जर तुम्ही चालू शकत नाही तर
तुम्ही रांगा पण तुम्ही जे काम करता ते
तुम्ही चालू ठेवणे गरजेचे आहे.
मार्टिन लूथर किंग
सर्व पक्षी पावसामध्ये निवारा शोधतात पण
गरुडपक्षी पावसामध्ये न भिजता तो पाण्याने
भरलेल्या ढगांच्या वरून उडतो आणि पावसा
पासून स्वतःला वाचवतो. अडचणी या सर्वसामान्य
असतात पण त्यावर मात करायची ताकत
अंगात असायला हवी. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
जर तुम्हाला जगामध्ये बदल हवा असेल
तर तुम्ही अगोदर स्वतःला बदलायला हव.
महात्मा गांधी
मी या गोष्टीची कधीच काळजी करत नाही
जरी हे जग माझ्या विरोधात असलं आणि
ते माझी निंदा करत असल. स्वतः मध्ये
विश्वास ठेवा मग जगाला काहीही म्हणू द्या.
मायकल जॅक्सन
यश हे अपघाताने मिळत नसत तर ते
मिळवण कठीण काम आहे. जिद्द, चिकाटी
अभ्यास, मेहनत व त्याग या सर्व गोष्टींचा मेळ आहे.
मी नेहमी हळू चालतो पण मी माघारी
कधी फिरत नाही. अब्राहम लिंकन
जर एखादा व्यक्ति कोणत्याही संकटाशिवाय
जिंकत असेल तर तो एक विजय असतो
पण जो अनेक संकटे असताना सुद्धा त्या
संकटाशी लढून जिंकतो तो इतिहास घडवतो.
ॲडॉल्फ हिटलर
जर दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची
अडचण येत नसेल तर तुम्ही अशी खात्री
करून घ्या की तुम्ही चुकीच्या मार्गाने
चालला आहात. स्वामी विवेकानंद
हकीकतमध्ये अपयशी होणे केव्हाही चांगले
स्वप्नांमध्ये यशस्वी होण्यापेक्षा. -मायकल जॅक्सन
कृती ही सर्व यशाची मूलभूत चावी आहे.
ब्लू पिकासो
यशाची स्वप्ने कधीच पाहू नका जर
तुम्हाला यश हवे असेल तर तुम्ही जे
काम करता त्याच्यावर प्रेम करा आणि
स्वत:वर विश्वास ठेवा, यश आपोआप
तुमच्याकडे येईल.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न
करत नसाल तर कोणीतरी एखादा येऊन
त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर
करून घेईल. धीरूभाई अंबानी
तुमचा वेळ स्पष्टीकरण देण्यासाठी वाया
घालवू नका कारण लोकांना तेवढेच ऐकायचे
असते जे त्यांना ऐकायचे असते.
भविष्य हे आपण जे काही सध्या करतो
त्याच्यावर अवलंबून असते. महात्मा गांधी.
जेव्हा तुम्हाला माहित होईल की तुमचे
विचार किती शक्तिशाली आहेत तेव्हापासून
तुम्ही कधीही नकारात्मक विचार करणार नाही.
कल्पना हीच सर्वकाही आहे स्वप्ने हेच सर्व
काही आहे कारण भविष्यामध्ये येणाऱ्या जीवनाचे
ते पूर्वचित्र आहे. अल्बर्ट आइंस्टीन
इतिहास पुरावा आहे की मोठ मोठ्या यशस्वी
विजेत्या लोकांना सुद्धा यश मिळवण्या अगोदर
मोठ मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे,
त्यांना यश फक्त याकरिता मिळाले आहे कारण
ते अपयशाने कधी नाराज झाले नाहीत व मागे
हटले नाहीत. बी सी फोर्ब्स
दयाळू शब्द हे खूप छोटे आणि बोलायला सोपे असतात
पण त्यांचा आवाज हा कधीही न संपणारा असतो.
मदर टेरेसा
माझे दुःख कदाचित एखाद्याच्या हसण्याचं
कारण असू शकते पण माझं हास्य कधीच
एखाद्याच्या दुःखाच कारण होऊ शकत नाही.
चार्ली चापलीन
आम्हाला आशा आहे की आपण वाचक वर्ग नक्कीच थोरांचे विचार मराठी, Motivational quotes in Marathi for students, Motivational quotes in Marathi for success या विचारांतून प्रेरणा घेऊन स्वतचे व इतरांचे जीवन बदलण्यासाठी प्रयत्न कराल.