Navra Bayko Quotes In Marathi [55+] नवरा बायको कोट्स स्टेट्स

Navra Bayko Quotes In Marathi, Navra Bayko Love Quotes In Marathi, Bayko Quotes In Marathi, Husband Marathi Quotes, Husband Wife Relation Quotes In Marathi: नवरा बायकोच नात हे सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ व पवित्र समजलं जात. अग्नीच्या साक्षीने एकमेकांच्या हातात हात घेऊन अग्निभोवती साथ फेरे मारून जोडलेल पती पत्नीच नात असत.

एकमेकांच्या सुख दुखात सहभागी होण्याच वचन दिल जात. मित्रांनो व मैत्रिणींनो जर तुम्ही सुद्धा सुख दुखात साथ देण्याचं, एकमेकांना समजून घेण्याच वचन जर तुमच्या बायकोला तुमच्या पतीला दिल असेल तर तुमचं आमच्या साइटवर स्वागत आहे. म्हणजे तुम्ही नक्कीच एक चांगली व्यक्ति आहात.

जर तुम्ही Navra Bayko Quotes In Marathi, Navra Bayko Love Quotes In Marathi गूगल वर शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आम्ही तुमच्यासाठी खूप सुंदर असे Husband Wife Relation Quotes In Marathi घेऊन आलो आहोत.

Navra Bayko Quotes In Marathi

Navra Bayko Quotes In Marathi

एक उत्कृष्ट सोज्वळ सुसंस्कृत अशी पत्नी
त्याच्या नवऱ्यासाठी त्याचा सोनेरी मुकुट असते.

नवरा आणि बायकोचे नाते हे असेच असते
जितके वेळा भांडण असते तितक्याच वेळा
प्रेम सुद्धा असते.

नवरा आणि बायकोमध्ये एकमेकांच्या चुका
माहित असताना सुद्धा जर तुम्ही चांगले आनंदात
जीवन जगत असाल तर यालाच खरे प्रेम म्हणतात.

एकमेकांना प्रोत्साहन देणे, एकमेकांना समजून घेणे
आणि एकमेकांवर प्रेम करणे हेच तर नवरा
बायकोचे खरे कर्तव्य आहे.

या जगात लग्नासारखे पवित्र नाते व
पवित्र सोहळा दुसरा कोणताच नाही.

नवऱ्यासाठी बायको आणि बायकोसाठी
नवरा एकमेकांचे उत्तम मित्र असतात
जर दोघे एकमेकांचा सल्ला घेत असतील
तर कोणत्याही संकटावरती त्यांना सहज
मात करता येते.

नवरा बायको एकमेकांना इज्जत देत असतील,
एकमेकांची किंमत करत असतील तर जगाला
त्यांना नाव ठेवायला कोणतीच जागा मिळत नाही.

या जगात सर्वात संवेदनशील नाते कोणते
असेल तर ते आहे पती-पत्नीचे पती पत्नीचे
नाते हे सर्व नात्यांचा पाया आहे.

नवरा आणि बायको ही एक टीम आहे
दोघेजण सोबत मिळून एक नवे साम्राज्य
निर्माण करू शकतात.

आपल्या आयुष्यामध्ये बहिणीची,
आईची भुमिका पार पाडणारी दुसरी
कोणी नसुन त्याची पत्नी असते.

Navra Bayko Quotes In Marathi

एखाद्या व्यक्तीची आईनंतर काळजी घेणारी
दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी होय.

आयुष्यात कितीही मोठं संकट आलं
तर मागं न हटणारी नेहमी आपल्यासोबत
चालणारी बायकोच असते.

नवरा बायकोच आयुष्य हे एखाद्या
चित्रासारख असतं एकमेकांच्या पसंतीनुसार
त्या चित्रांमध्ये रंग भरल्यास ते अधिक खुलून येतं.

तुमची पत्नी सर्व नाती सोडून तुमच्या सोबत
आयुष्य घालवायला आली आहे तिला कधीच
दुखवू नका.

नात्याने नवरा-बायको असण्यापेक्षा मनाने
नवरा-बायको असण खूप महत्त्वाच आहे.

बायकोच एक हास्य नवऱ्यासाठी त्याचं जग असतं.

नवरा-बायको असणं प्रेमाचे पूर्णत्व आहे.

बरे वाईट विचारणारे खूप जण असतात पण
काळजी घेणारा घेणारी फक्त नवरा आणि
फक्त बायकोच असते.

चूक नवर्‍याची असो किंवा बायकोची असो
कारण नातं तर दोघांच आहे. कधीकधी दोघांना
चूक मान्य सुद्धा करावी लागेल आणि दोघांना
तडजोड सुद्धा करावी लागेल.

नवरा बायकोचे नाते असेच असते कितीही
भांडले तरी मन भरत नाही आणि कितीही
प्रेम केले तरी मन भरत नाही.

कधीकधी नशीब आणि बायको खूप त्रास देते
पण ज्यावेळी नशीब आणि बायको साथ देते
त्यावेळी आयुष्य स्वर्ग होऊन जाते.

सर्वजण म्हणतात बायको खूप त्रास देते
पण कधी कुणी असं म्हणत नाही की ती
संकटात साथ पण देते.

पती-पत्नीचं नातं असं निभावल पाहिजे की
दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्यावरील हास्य बनल
पाहिजे, मैत्रीच एक उत्तम उदाहरण बनल पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेले Navra Bayko Quotes In Marathi, Husband Wife Relation Quotes In Marathi आवडले असतील अशी आशा आहे.

Leave a Comment