{50 मंत्र} मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ Marathi thoughts with meaning

मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, Marathi thoughts with meaning: मित्रांनो जर तुम्ही Google वर मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, Marathi thoughts with meaning शोधत असाल तर इथेच तुमची शोध यात्रा संपली अस समजा कारण आज आम्ही या पोस्ट मध्ये खास वाचकांसाठी तुमच्या जीवनाला आकार देणारे मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, Marathi thoughts with meaning घेऊन आलो आहोत.

1. वाईट माणसे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात
पण हीच माणसे एक चांगला धडा सुद्धा शिकूवुन जातात.

Marathi thoughts with meaning

वाईट व्रतीची माणसे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला भेटतात ते कधीच आपले चांगले करण्याच्या भावनेने आपल्याशी मैत्री करत नाहीत उलट आपल्यालाच त्रास देतात आपल्यालाच फसवतात आणि यातून आपणास एक चांगला अनुभव मिळतो आणि नंतर आपण कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवत नाही. आणि नंतर अशा मंडळीशी आपण एक हात लांब राहतो.

2. वाईट मार्गाने यश मिळवण्यापेक्षा चांगल्या
मार्गाने अपयशी होणे केव्हाही चांगले.

Marathi thoughts with meaning

काही लोक लवकर यशस्वी होण्यासाठी, लवकर खूप मोठे श्रीमंत होण्यासाठी वाईट मार्ग निवडतात व त्या मार्गाने मोठे होण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा वाईट मार्गाने सुद्धा यश मिळवता येते पण ते यश थोड्या काळासाठीच असते. पण काही लोक चांगल्या मार्गाने प्रयत्न करून सुद्धा अपयशी होतात ते अपयश सुद्धा काही काळासाठीच असते पण एखदा का चांगल्या मार्गाने यश मिळवले तर ते आयुष्यभर आपले व आपल्या आईवडिलांचे नाव रोशन करते आणि या यशाने समाजात इज्जत सुद्धा मिळते.

3. कर्म नेहमी चांगले केले पाहिजे कारण दिलेले
श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाहीत.

Marathi thoughts with meaning

माणसाने त्याच्या आयुष्यात प्रत्येक काम हे इमानदारीने व प्रामाणिकपणे केले पाहिजे. माणसाचे प्रत्येक काम हे चांगले असायले हवे असे काम की ज्यामुळे लोकांचे कल्याण होईल. माणसाने असे काम कधीच नाही केले पाहिजे ज्यामुळे इतर लोकांना त्रास होईल इतर लोकांचे मन दुखावेल.  चांगले काम केल्यावर लोक चांगलेच आशीर्वाद देतात आणि वाईट काम केल्यावर लोक वाईटच आशीर्वाद देतात.

हे पण वाचा:

Good Thoughts Marathi | Changle Vichar Marathi

शालेय सुविचार मराठी छोटे Education Quotes in Marathi

4. देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि
जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका.

Marathi thoughts with meaning

माणसाने त्याच्या आयुष्यात नेहमी आशावादी असायला हवे. माणसाने नेहमी देवावर विश्वास ठेवून काम केले पाहिजे आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. कारण आपले कष्ट एकदिवस आपल्याला नक्की चांगले फळ देते.

Great Marathi thoughts with meaning

5. ज्यांना खाली पडण्याची भीती असते
ते आकाशात कधीच उंच भरारी घेऊ शकत नाहीत.

Marathi thoughts with meaning

ज्या लोकांना त्यांच्या आयुष्यात हरण्याची भीती असते ते लोक त्यांच्या आयुष्यात कधीच जिंकू शकत नाहीत, कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत.

6. एक कुटुंब आणि समाज तेव्हाच उध्वस्त
होऊन जातो जेव्हा एक समजुतदार माणूस
गप्प बसतो आणि मूर्ख माणूस बोलायला लागतो.

Marathi thoughts with meaning

कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये जर एखादी अडाणी, वाईट व्रतीची व्यक्ति जास्त पुढाकार घ्यायला लागली व एका शिक्षित विचारवंत व्यक्तीचे विचार जर कोणी ऐकत नसेल त्या समजुतदार व्यक्तिला महत्व दिले जात नसेल तर कुटुंब व समाज नक्कीच अधोगतीकडे दरीद्र्याकडे जाणार हे निश्चित आहे. त्या आपण नेहमी शिक्षित नम्र विचारवंत थोर माणसाच्या पाठीशी उभा राहील पाहिजे.  

7. उशिरा का होईना पण आयुष्यात यशस्वी व्हा
कारण अनेक वर्षांनी सुद्धा लोक तुमची खुशहाली
नव्हे तर तुमची औकात विचारतात.

Marathi thoughts with meaning

आपण आपल्या आयुष्यामध्ये उशिरा का होईना पण एक यशस्वी व्यक्ति होणे गरजेचे आहे. समाजामध्ये आपण आपले एक चांगले व्यक्तिमत्व निर्माण केले पाहिजे. एक हुशार आदर्श व्यक्ति म्हणून आपण आपल्या आई वडिलांचे नाव रोशन केले पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे आपण घेतलेल्या शिक्षणाचे चीज केले पाहिजे.

8. कष्ट ही अशी चावी आहे जी बंद झालेल्या
नशिबाचे दरवाजे सुद्धा उघडते.

Marathi thoughts with meaning

माणूस आपल्या अपयशासाठी आपल्या नशिबालाच दोष देतो. नशिबाला दोष देण्याचे कारण म्हणजे तो आपले प्रयत्न अर्ध्यातूनच सोडून देतो म्हणून त्याला अपयश येते. जर त्याने आपले प्रयत्न जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत चालू ठेवले तर तो कधीच आपल्या नशिबाला दोष देणार नाही.

9. काय विचित्र लोक आहेत समाजात कुणासाठी
कोणाजवळ टाईम नाही पण टाईमपास सर्वजण करतात.

आपल्या अवती भोवती आपणास अशी काही माणसे पहायला मिळतात ज्यांच्या जवळ आपल्यासाठी व त्यांच्या जवळच्या लोकांसाठी कधीच वेळ नसतो पण अशी माणसे आपणास कधी कधी त्यांचा वेळ लोकांची निंदा मस्करी करताना पहायला मिळतात. लोकांना त्रास देताना पहायला मिळतात.

नक्कीच तुम्हाला या पोस्टमधून नवी प्रेरणा मिळाली असेल अशी आशा आहे आम्हाला. मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ Marathi thoughts with meaning हे विचार शेअर करायला विसरु नका.

Leave a Comment