{60 पावरफुल} शालेय सुविचार मराठी छोटे Education Quotes in Marathi

शालेय सुविचार मराठी छोटे, education quotes in Marathi, education thoughts in Marathi, स्कूल सुविचार मराठी, education suvichar in Marathi. शिक्षणामुळे निर्णयक्षमता, आत्मविश्वास, कौशल्य, समुजूतदारपणा, माणुसकी, निसर्गप्रेम, नम्रता, चातुर्य, स्वावलंबीपणा, व नेतृत्व असे सर्व गुण अंगी विकसित होतात.

शिक्षण हे सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा एकमेव उपाय आहे, एकमेव मार्ग आहे. शिक्षणामुळे समाजातील सर्व मतभेद दूर होण्यास मदत मिळते. शालेय विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी व शिक्षणाची आवड असणार्‍या सर्व लोकांसाठी शिक्षणाचे महत्व सांगणारे सर्वश्रेष्ठ शालेय सुविचार घेऊन आलो आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे सुविचार नक्की आवडतील.

शालेय सुविचार मराठी छोटे

शालेय सुविचार मराठी छोटे Education Quotes in Marathi

शिक्षण हे एक असे शस्त्र आहे ज्याच्या
मदतीने आपण हे सर्व जग बदलू शकतो.

शिक्षणाने मनुष्य जीवनाचा उद्धार होतो.

शिक्षणाची मुळे ही कडू असतात
पण त्याला लागलेली फळे मात्र गोड असतात.

शिक्षण हे भविष्याचा पासपोर्ट आहे.

अपयश हेच यश असते जर आपण
त्या अपयशाकडून काही धडा शिकलो
असेल तर.

मनात शिकण्याची इच्छा असेल तर
शिक्षक कुठेही मिळू शकतो.

ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक नेहमी चांगले व्याज देते.

ज्ञाना विषयी सुंदर गोष्ट म्हणजे ज्ञान
कधीच चोरीला जाऊ शकत नाही.

स्वातंत्र्याची सोनेरी द्वारे खोलण्यासाठी
शिक्षण ही एक उत्तम चावी आहे.

शिक्षित आणि अशिक्षित या दोन्ही मध्ये
तेवढाच फरक आहे जितका एक जीवंत
आणी एक मृत व्यक्ति मध्ये असतो.

शालेय सुविचार मराठी छोटे Education Quotes in Marathi

चुका ह्या सिद्ध करत असतात की तुम्ही
शिकत आहात प्रयत्न करत आहात.

शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे जो
एका पिढीकडून दुसर्या् पिढीकडे दिला जातो.

विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थीच असतो.

शिक्षण ही एक अशीच प्रक्रिया आहे
जी शेवटच्या क्षणापर्यंत चालूच असते.

माणूस शेवटच्या क्षणापर्यंत काही ना
काही शिकतच असतो.

मनामध्ये शिक्षणाची जिद्द निर्माण करा
मग पहा तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही.

शिक्षण हे हिंसा होऊ नये याकरिता एक लस आहे.

बदल हाच चांगल्या शिक्षणाचा परिणाम आहे.

शिक्षणाची सुरुवात अपयशाने होते पण पहिलं
अपयश हीच शिक्षणाची खरी सुरुवात असते.

शिक्षणाचे महत्व:  

मनुष्याच्या जीवनामध्ये शिक्षण हे खूप म्हत्वाचे आहे. शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शिक्षणामुळे मानवामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षण हे महत्वाची भूमिका बजावते.

प्राथमिक शिक्षण हे मुला मुलींसाठी खूप म्हत्वाचे या शिक्षणाच्या टप्यामध्ये मुलामुलींचा मानसिक तसेच शारीरिक विकास होतो. मुलामुलींना चांगल्या सवयी लागतात. प्राथमिक शिक्षण मिळाल्यामुळे मुला मुलींमध्ये आत्मविश्वास वाढीस लागून त्यांच्या मध्ये क्रीएटिविटि व सकारात्मकता या गोष्टींचा विकास होतो.

उच्च शिक्षण हे मुला मुलींना त्याच्या भविष्यासाठी तयार करते. उच्च शिक्षणामुळे एखाद्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवता येते. उच्च शिक्षण हे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी अनेक संधीची द्वारे खुली करते. उच्च शिक्षणामुळे अशिक्षित लोकांच्या तुलनेत लवकर प्रौढपणा येते.

प्रत्येकाला मिळालेले शिक्षण हेच त्याचे भविष्य ठरवत असते जर एखाद्या व्यक्तीला वाईट प्रकारचे शिक्षण किंवा अपूर्ण शिक्षण मिळाले असेल तर त्या व्यक्तीचे भविष्य सुद्धा फारसे चांगले नसते. त्यामुळे शिक्षण खूप महत्वाची भूमिका बजावते.  

समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षणाची सर्व द्वारे समान खुली असावीत. सर्वांना कोणताही मतभेद न करता शिक्षण दिले गेले पाहिजे, तरच समाजाचा विकास होऊ शकतो. मुलगा मुलगी जातिभेद या सर्व गोष्टी दूर करून सर्वांना समान शिक्षणाची संधी मिळावी हेच आपले धोरण असायला हवे.

We hope you will love these Education Quotes in Marathi शालेय सुविचार मराठी छोटे.

Leave a Comment