{Best 2024} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता Birthday Poem Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, birthday poem in Marathi, vadhdivas kavita, chhan marathi vadhdivas kavita, babancha vadhdivas kavita, baykocha vadhdivas kavita, mulicha vadhdivas kavita, aai vadhdivas kavita, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,

दिवस हा आनंदाचा आहे,
वाढदिवस आमच्या ….साहेबांचा आहे,
विसरू म्हणता विसरता येत नाही,
तुमचा वाढदिवस सदैव आठवणीत राही,
वाढदिवसाला तुमच्या देवलोकातून फुलांचा वर्षाव व्हावा,
तुमचा सहवास नेहमी सोबत असावा. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

क्षण रोज सुखाचे यावे,
पाहून हसरा चेहरा तुझा हृदयी प्रेम दाटावे,
कधी न यावे अपयश आयुष्यात तुझ्या,
तू नेहमी यशाचे शिखर गाठावे,
वाढदिवसानिमित्त देतो तुला शुभेच्छा,
तुला निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे।

आनंदाच्या क्षणी आनंदी गाणे गावे,
प्रेमाच्या पाऊसात तू चिंब भिजावे,
वाढदिवसानिमित्त देतो तुला गोड शुभेच्छा तू नेहमी सुखी रहावे.

आजचा शुभ दिवस ठरावी तुमच्यासाठी एक गोड आठवण,
व्हावी हृदयात आपल्या या शुभक्षणांची साठवण,
आपल्या नात्यांमधील गोडी कायम राहावी साखरेपरी,
कधीही न संपावी आम्ही दिलेली प्रेमाची शिदोरी,
व्हावीत तुझी सर्व स्वप्ने साकार,
मिळू दे तुझ्या जीवनाला एक नवा आकार.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते,
प्रेम दिल्याने प्रेम वाढते,
आणि जेव्हा येतात तुमच्यासारख्या गोड व्यक्ति
आमच्या आयुष्यात तेव्हा सर्वकाही चांगलेच घडते.
💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

सूर्य उगवला प्रकाश देण्यासाठी,
फुले बहरली सुगंध देण्यासाठी,
आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात फक्त आनंद देण्यासाठी.
🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹

दिवसामागून दिवस उलगडले, ऋतु मागून ऋतु,
अपार कष्ट तुम्ही घेतले,
जीवनभर जबाबदारीचे ओझे वाहिले,
तुमच्या ज्ञानाने सर्वजण अनुभव समृद्ध झाले,
तुमच्या सहवासात सर्वजण सुखी राहिले,
आज तुमचा वाढदिवस आहे,
हाच आमच्यासाठी आनंदाचा सण आहे.
वाढदिवसानिम्मीत आपणास उदंड आयुष्य लाभो.
🎂🍰वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.🎂🍰

आज तुझा वाढदिवस आहे,
आई वडिलांचे हे पुण्य आहे,
सर्वांच्या सानिध्यात जन्म तुझा झाला,
आनंदाने सर्वांनी बाळकृष्ण पाहिला,
आज तुझा वाढदिवस आहे,
हे आनंदाचे क्षण पाहण्या आज आमचे सौभाग्य आहे,
शंभर वर्षे तू निरोगी जीवन जगावे,
जगातील सर्व सुख तू पहावे. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आनंदी आहे मी आयुष्यात तुमच्या सारखा प्रेमळ जोडीदार मिळवून,
आज तुमच्या वाढदिवसाला जीव टाकते तुमच्यावर ओवाळून.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ जीवन उमलत्या फुलांसारख फुलून जाव,
सूर्य बनून तू सर्वांना प्रकाश देत रहाव,
अलौकिक असे कार्य तुझ्या हातून घडाव,
निराधार लोकांना तू आपलस कराव,
तुझ्या सहवासाने सर्वांच कल्याण व्हाव.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
आपण भरपूर आयुष्य जगावे हीच मनी सदिच्छा.

इंद्रधनुष्य नभी शोभतो,
रिमझिम पावसात मोर नाचतो,
डोंगरदऱ्यातून खळखळ झरा वाहतो,
पाहून आनंदाचा सोहळा हा,
आनंदाच्या अश्रूंचा डोळ्यात पाऊस साचतो.
वाढदिवसानिमित्त आपणास लाभावे सुख समृद्धी
आणि निरोगी जीवन हीच प्रार्थना मी देवाकडे करितो.

आपण कितीही दूर असलो तरी आपल्या नात्यात कधीही न यावा दुरावा,
कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या भेटीचा नेहमी योग यावा,
वाढदिवसा दिवशी देतो आपणास शुभेच्छा
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जावा.

सुगंधाविना फुलांना किंमत नाही,
प्रकाशाविना ताऱ्यांना किंमत नाही
आणि तुमच्या शिवाय आमच्या जीवनाला अर्थ नाही.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आकाशातील लखलखत्या ताऱ्यांनी सजावट केली,
फुलांनी वातावरण सुगंधित केले,
कोकिळेने गोड गाणे गायले,
वाढदिवसानिमित्त देतो तुम्हाला शुभेच्छा बाबा,
तुमच्या चरणी मी संपूर्ण आयुष्य वाहिले.

वाढदिवस वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं
आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी एकत्र यायचं असतं
चांगल्या गुणांचं तोंड भरून कौतुक करायचं असतं
वाईट गुणांकडे दुर्लक्ष करायचं असतं
कारण या जगात सर्वगुणसंपन्न कोणीच नसतं
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायचे असतात
आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची असते
एकमेकांच गोड घासाने तोंड गोड करायच असत,
जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो.
एकमेकांच्या सुख दुखात सहभागी व्हायच असत,
एकदा जोडलेल नात आयुष्यभर टिकवायच असत.
भावी आयुष्यामध्ये तुमच्या हातून चांगल कार्य व्हाव
आणि तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच सदिच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
– Poem by Gajendra Bhalke sir

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

ज्या दिवशी वाढदिवस आपल्या मित्र-मैत्रिणींचा, नातेवाईकांचा किंवा घरातील सदस्यांचा असतो त्यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कवितेच्या माध्यमातून देण्याचा एक वेगळाच आनंद असतो.

पूर्वी कविता फक्त प्रेमावरती, एखाद्या निर्जीव सजीव व्यक्ती वस्तू वरती, निसर्गावरती केल्या जात असत पण अलीकडे कविता सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे वाढदिवसावर सुद्धा केल्या जाऊ लागल्या आहेत.

कविता म्हटलं की खूप जास्त अलंकारिक शब्दांचा वापर आपल्याला कवितेच्या शब्दांमध्ये करता येतो, आणि फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दोन ओळीत द्यायच्या असतील तर फक्त मोजक्याच शब्दांचा वापर करता येतो

पण कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण आपल्या मनातील भावना कवितेच्या शब्दांद्वारे व्यक्त करू शकतो. अलीकडे वाढदिवसाचे स्वरूप सुद्धा खूप मोठे होऊ लागले आहे.

अगदी वाढदिवसाला लग्नाचे स्वरूप येऊ लागले आहे. रंगबेरंगी पडदे, मंडप, लाऊड स्पीकर, स्वादिष्ट व रुचकर जेवण, प्रमुख पाहुण्यांना दिले जाणारे आमंत्रण, फटाके, आतषबाजी, नवीन कपडे, पाहुण्यांच्या स्वागताला फेटे, श्रीफळ या सर्व वस्तूंचा खर्च पाहता एखादे लग्न पार पडेल एवढ्या खर्चात.

असो आपण या ठिकाणी काहीच करू शकत नाही कारण ही नवीन पिढी आहे आपण या नवीन पिढीला बचतीचे, काटकसरीचे कितीतरी सल्ले दिले तरी ते थोडी ऐकणार आहेत. आपण मात्र स्व:त शहाणे झालेल बर.

if you like ” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, birthday poem in Marathi,” please share with your friends on social media.

Leave a Comment