Best 25+पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी, आई, भाऊ, मित्र, आजोबा, आजी

प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा, वाडिलांसाठी, भावासाठी, आई, काका, भाऊ, मित्र, काकी, ताई, आजी, आजोबा, पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी, चतुर्थ पुण्यस्मरण मराठी संदेश, प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश मित्र, द्वितीय पुण्यस्मरण मराठी संदेश आई, प्रथम पुण्यस्मरण बॅनर,

पुण्यस्मरण मराठी संदेश भाऊ/मित्र/मुलगा

हसता हसता रडवलस, रडता रडता फसवलस,
फूल उमलण्याअगोदर कळी गेली सुकून,
का रागावलास आमच्यावर, असा मधेच गेला सोडून,
हृदयात आमच्या कायम तुमचे अस्तित्व राहील,
तुम्ही परत येणार नसला तरी आम्ही तुमची वाट पाहतच राहू,

जगण्यातला आनंद नाहीसा झाला आहे तुझ्या अचानक जाण्याने,
ये पुन्हा घेऊन पुनर्जन्म आम्हाला भेटण्याच्या बहाण्याने,

पुण्यस्मरण मराठी संदेश भाऊ/मित्र/बाबा/आई/आजी/आजोबा

प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना,
न उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला,
कल्पनेतही नव्हते तुमचे जाणे, अधुरे राहिले जीवन गाणे,
आता फक्त एकच उरले तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहणे,
तुमच्या स्मृतींना आमची भावपूर्ण आदरांजली.

स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते
तुम्ही आम्हास असे अचानक सोडून जाल,
वाटले नव्हते देवाचे बोलावणे येईल असे अचानक तुम्हाला,
प्रेम, माया, आपुलकी व माणुसकी या गोष्टींची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात अगोदर बाबा तुमची आठवण येईल.

तो आनंदी चेहरा, नाही कोणा दुखवले,
मनाचा होता मोठेपणा, नाही जमला कधी खोटेपणा,
सर्वांना जवळ केले, पाहता पाहता दूर देशी निघून गेले.
तुमच्या स्मृतींना आमची भावपूर्ण आदरांजली.

पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी/आईसाठी/आजी/आजोबा

अपार कष्ट सोसले, स्वसुख भोगायचे राहून गेले,
थोरा मोठ्यांना जीव लावला, सर्वांच्या कल्याणासाठी देह झिजविला,
आता उरली नाही साथ आम्हाला, वाट पाहतो तुमची यावे पुन्हा जन्माला.

क्षणो क्षणी आता आमच्या मनी तुमचीच आठवण येत आहे,
हृदयात साठवलेल्या आठवणींना आता अश्रुद्वारे वाट मोकळी होत आहे.

आपल आमच्यावरच प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही,
जितके कडक होता तुम्ही तितकीच माया केली सर्वांवर,
म्हणूनच आपल्यातील आपुलकी कधीच विसरता येत नाही.

सूर्याप्रमाणे प्रकाश दिला सर्वास, अनेक सुखे घालून पदरात,
दुखे कवटाळून उरात तेजोमय जीवन यात्रा संपवली एका क्षणात,
अनेक सुखे असूनही पदरी आम्ही पाडतो अंधारात,
आपल्या चरणी आम्हा सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली.

शोक सभेत द्यावयाचे भाषण:

ज्या गोष्टीला सुरुवात असते त्या गोष्टीचा अंत ठरलेला असतो हे एक त्रिकालबाधित सत्य आहे. जो व्यक्ती जन्म घेतो त्या व्यक्तीचे हे जग सोडून जाणे अटळ आहे. म्हणजेच ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू सुद्धा आहे पण अलीकडे आपण एका माणुसकी हरवलेल्या जगामध्ये जगत आहोत.

ह्या माणूस हरवलेला जगामध्ये जगत असताना आपण पाहतो की प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये फक्त पैसा कमवण्याचा पाठीमागे लागला आहे. पैसा हेच सर्वस्व असा तो समजू लागला आहे पण या पैसा कमवण्याच्या प्रक्रियेमध्ये तो आपल्या जवळच्या माणसांना पण विसरू लागला आहे. ज्यावेळी त्याच्या जवळची व्यक्ती, त्याच्यावर जीव लावणारी व्यक्ती त्याला सोडून जाते, त्यावेळी त्याला लोकांची किंमत कळते. तरीही काही लोकांना ज्या लोकांची हृदये दगडाची आहेत अशा लोकांना पैशापुढे काहीच आठवत नाही.

प्रत्येकाला एक दिवस मरणाला सामोरे जावे लागणार आहे हा निसर्गाचा नियमच आहे तो कोणाला चुकलेला नाही. परंतु जीवन जगत असताना आपण आपल्या हातून कोणाचेही मन दुखावले जाऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या सहवासात असणारा प्रत्येक व्यक्ती एक दिवस आपल्या पासून दूर निघून जाणार आहे ही भावना मनात ठेवून आपण त्यांच्याशी आपुलकीने वागले पाहिजे.

नाहीतर त्यांच्या पाठीमागे त्यांचे गोडवे गाण्यात काय अर्थ आहे. त्यांच्या पाठीमागे हा खूप चांगला होता, तो खूप चांगला होता या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. म्हणजे जिवंत असताना विचारायचे नाही आणि मरण पावल्यावर त्यांच्या कार्याचे गोडवे गायचे हे पूर्णत चुकीचे आहे.

जीवन जगत असताना आपण चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेत असतो. काही वेळेस आपल्या हातून चुका घडत असतात, काही वेळेस आपल्या हातून एखाद्या व्यक्तीचे मन दुखावले जाते पण अशावेळी आपल्या मनामध्ये एखादा चुकून सुद्धा असा विचार येत नाही की कमीत कमी आपण त्या व्यक्तीची माफी तरी मागावी पण आपण असे करत नाही कारण कुठेतरी आपला अहंकार आपणास रोखून धरत असतो.

आपण फक्त पैसा कमवण्यासाठी झपाटून गेलो आहोत. मात्र एक दिवस या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळणार आहे याचा आपणास विसर पडतो आहे आणि आयुष्य कधी संपून गेले हे कळतच नाही. आपण इतके मोठे कसे झालो, म्हातारे कसे झालो याचा आपणास विसर पडतो. मग आतापर्यंत कमवलेल्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा राहून जातो, म्हणजेच जीवनामध्ये पैशाला नव्हे तर एकमेकांसोबत घालवलेल्या सहवासाला किंमत आहे. आपुलकीला माणुसकीला किंमत आहे या गोष्टीची आपणास जाण असायला हवी.

if you like “प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा, वडिलांसाठी, भावासाठी, आई, काका, भाऊ, मित्र, काकी, ताई, आजी, आजोबा,” please share with your friends on social media.

Leave a Comment