25+ Anniversary Wishes for Parents in Marathi {Wedding} 2020
Anniversary wishes for parents in Marathi wedding, 25th Happy wedding anniversary wishes for parents in Marathi.

जगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Marriage Anniversary!
माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई! आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो. Happy Marriage Anniversary!
दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात. आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम, Happy Marriage Anniversary Aai Baba!

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुमच्यासारखे parents मिळालेत, Happy Marriage Anniversary Mom Dad!
तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे, तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे, आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे. Happy Marriage Anniversary Aai Baba!

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Happy Marriage Anniversary Aai Baba!
तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्यावरील हास्य, अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. Happy Marriage Anniversary Aai Baba!

Anniversary wishes for parents in Marathi
माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही “Aai Baba” आहात. Happy Marriage Anniversary Aai Baba!
माझ्या life मधील खास “आई बाबांना” लग्न वाढदिवसाच्या special शुभेच्छा.

आई बाबा! थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार! Happy Marriage Anniversary Aai Baba!
आई बाबा तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे, फक्त तुम्हा दोघांची साथ आयुष्यभर अशीच मला मिळावी एवढेच मागणे देवाकडे मागतो आहे! Happy Marriage Anniversary Aai Baba!

हा खास दिवस तुमच्या आयुष्यात असेच न संपणारे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा घेऊन येवो. Happy Marriage Anniversary Mom Dad!
एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही. Happy Marriage Anniversary Aai Baba!

पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! Happy Marriage Anniversary Aai Baba!
या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स, आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत. Happy Marriage Anniversary Aai Baba!
आणखी वाचा:
Wedding Anniversary Wishes in Marathi
50th Birthday Wishes in Marathi
Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi
Happy Birthday Wishes in Gujarati Text
आई बाबां बद्दल लेखकाचे मनोगत:
मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट आणि ग्रेट कोण असेल तर आपले आई बाबा आहेत. या माणुसकी हरवलेल्या दुनियेत तुमच्यावर स्व:तपेक्षा सर्वात जास्त प्रेम करणारे फक्त आपले आई बाबाच आहेत.
आपण लहान असताना पासून आपले सर्व हट्ट पूर्ण करणारे आपले आईवडील खरच खूप ग्रेट आहेत. स्व:तच्या इच्छा मारून आपले लाड, आपली स्वप्ने, आपल्या इच्छा आपले आई वडील पूर्ण करत असतात. मित्रांनो या जगात आपल्या आई वडिलांची जागा दुसर कोणीच घेऊ शकत नाही.
आपल्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून आपले आई वडील दिवस रात्र कष्ट करत असतात. आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठ व्हाव म्हणून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण सकस आहार, आणि योग्य मार्गदर्शन आपले आई वडील आपल्याला देत असतात.
सध्याच्या जमान्यात मुलांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची त्यांच्या त्यागाची अजिबात जान नाही. आताची मुले फक्त ह्या जगाच्या बाहेरील आकर्षणात गुंतलेली आहेत, नुसत्या वरुन दिसणार्या मोहक जाळ्यात अडकत चाललेत. सोशल मीडिया, फसव प्रेम, वाईट सवयी, वेळ वाया घालवणे, नको फालतू हट्ट करणे, आई वडिलांचा सल्ला न घेणे, त्यांना न विचारता कोणताही निर्णय घेणे या सर्व गोष्टी करत असतात.

मित्रांनो या जगात योग्य सल्ला ही फक्त आपलीच माणसे देत असतात कारण आपल्या लोकांना आपली काळजी असते, त्यांना वाटत आपल्या मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊन वाया जाऊ नये म्हणून पण आपल्याला वाटत ते अडाणी आहेत त्यांचं काय एकायची गरज आहे
पण ज्यावेळी वेळ निघून जाते ना त्यावेळी आपल्याला समजत की घरच्यांच ऐकल असत तर खूप बर झाल असत. पण तोपर्यंत वेळ निघून गेलीली असते आणि आपण त्यावेळी त्याचे परिणाम भोगत असतो. मित्रांनो खरच आपण आपल्या आईवडिलांच थोड फार तरी ऐकल पाहिजे कारण ते आपल्या भल्यासाठीच सांगत असतात.
आपण आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचं मन कधीही दुखवल नाही पाहिजे, आपण त्यांना त्यांच्या उतार वयात आधार दिला पाहिजे. त्यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, आपण लहान असताना त्यांनी आपल्या साठी किती कष्ट घेतलेले असतात मग आपण सुद्धा त्यांच्या उतार वयात त्यांची काळजी घेतली पाहिजे.

जर आपण आपल्या आईवडिलांची जीवंत असताना जर काळजी नाही घेऊन शकलो त्यांचा सांभाळ नाही करू शकलो तर आपल्या जीवनात काहीच अर्थ नाही कारण आपण आपल्याआयुष्यात successful होऊन तरी आपला काय उपयोग, आणि हो आपली मूल सुद्धा उद्या आपल्याला तशीच वागणूक नक्की देतील याच सुद्धा आपल्याला भान असायला हव.
मराठी मध्ये एक सुविचार आहे “स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी” हे अगदी खर आहे इथे आपण दूसरा एक सुविचार लिहुया “स्वामी तिन्ही जगांचा बाबा विना भिकारी” मित्रांनो आई वडील आहेत तर सर्व काही आहे, मग तुम्ही हे सर्व जग जरी जिंकलात तरी ते तुमच्यासाठी अपूर्ण आहे.
या जगात तुम्हाला सर्व काही मिळेल पण आई बाबा पुन्हा कधीच मिळणार नाहीत, आपलं खर सामर्थ्य, आपली खरी प्रेरणा, आपलं खरा आत्मविश्वास आपले आई बाबा आहेत, त्यांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण ज्यावेळी त्यांची खरी किंमत कळेल तेव्हा वेळ निघून गेलीली असेल.
love your parents from the bottom of your heart