मामाला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा Birthday Wishes for Mama in Marathi

Birthday Wishes for Mama in Marathi. मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश. मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर.

आयुष्यातील प्रत्येक संघर्षाच्या वळणावर मामा साथ तुझी मिळाली,
प्रत्येक संकटावर पुन्हा प्रयत्न करून मात करण्याची प्रेरणा तुझ्याकडून मिळाली,
मामा तू माझ्या आयुष्यातील खरा हिरो आहेस.
मामा तुला या जगातील सर्व सुख भेटो आणि तुला उदंड आयुष्य लाभो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मामा तु माझा बेस्ट फ्रेंड आहेस,
मामा माझा तू गुरु आणि माझ्या आयुष्यातील खरा मार्गदर्शक आहेस,
मामा तुझी मोलाची साथ सोन्याहून प्रिय आहे,
मामा तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला उदंड आयुष्य लाभो,
हीच बाप्पा चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for Mama in Marathi
Birthday Wishes for Mama in Marathi

मामा तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे सूर्याच आकाशात असण होय.
मामा तुझा सहवास म्हणजे बहरलेला वसंत ऋतु होय,
आणि मामा तुझी माया म्हणजे साक्षात वडिलांचं दुसरं रूप होय.
मामा तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि तुला दीर्घायुष्य लाभो,
हीच मनी इच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती जी नेहमी माझ्या हृदयात राहते,
जी व्यक्ती दयाळू प्रेमळ आणि मनाने मोठी आहे,
ज्या व्यक्तीच्या मायेची सावली सतत माझ्यावर असते,
अशी व्यक्ती म्हणजे माझे मामा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मामा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त या जगातील सर्व सुख भेटो
आणि चंद्र, सूर्य, तारे यांच्या एवढं तुला आयुष्य मिळो, हीच देवाकडे प्रार्थना

मामा तू आम्हा सर्वांसाठी एक नवी प्रेरणा आहेस,
मामा तुझं मार्गदर्शन तुझे मोलाचे शब्द साक्षात् भविष्यवाणी आहे.
मामा तुझी मदत म्हणजे साक्षात देवाचा कृपा आशीर्वाद आहे.
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुख दुःखात मामा तुझी साथ रहावो,
तुझ्या मायेचा सुगंध जीवनभर दरवळत रहावो,
मामा तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला शंभर वर्षे आयुष्य लाभो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

चंद्र तार्‍यांनी रात्र सजावी,
रंगीबेरंगी फुलांच्या सड्याने अंगण बहरावे,
कोकिळेच्या गोड आवाजाने मन मंत्रमुग्ध व्हावे.
मामा तुझ्या वाढदिवसाच्या शुभ दिवशी तु पाहीलेल प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हाव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गंध फुलांतला गेला सांगून,
मामा तुझे आणि माझे कधीही न तुटो मायेचे बंधन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मामा तुझ्या आनंदाला सीमा न रहावो,
तुझ्या स्वप्नांना नवा आकार येवो,
मामा हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मामा तुझी माया हेच खरे धन,
मामा तुझी साथ हेच खरं न फिटणार ऋण,
आणि मामा तुझा वाढदिवस हाच आमच्यासाठी दिवाळीचा सण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for Mama in Marathi

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आईच्या भावाला मामा असे म्हणतात. मामा म्हटल की आई नंतर आपला हट्ट पुरवणारी दुसरी व्यक्ती म्हणजे मामा होय. जीवनामध्ये मामा असं म्हणजे मोठे भाग्य होय. मामा म्हणजे आपल्या लहानपणीची आवडती व्यक्ती होय. मामा हा आपला पाठीराखा असतो. आपल्याला कोणतीही अडचण आल्यास आपण सर्वप्रथम ती आपल्या मामास बोलून दाखवतो, आणि अशावेळी मामाची साथ घेतो.

शाळेतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जाण्याची मजाच काही न्यारी असते. मामाचं गाव म्हटलं की ते आपल्या स्वप्नांच गाव असतं. मामाचा गाव म्हणजे प्रत्यक्षात श्रीकृष्णाचं गोकुळ होय. जगामध्ये मामाचं आणि भाचा भाचीचं नातं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. मामा हा आपला बेस्ट फ्रेंड असतो. मामा समोर आपण प्रत्येक गोष्ट मनमोकळेपणाने सांगतो, कारण आपल्याला समजून घेणारी सर्वात जवळची व्यक्ती मामा असते.

मामाच्या गावी भाचा किंवा भाचीचा खूप मोठा थाट असतो. मामाच्या गावी गेल्यानंतर नवीन कपडे, खाऊ आणि स्वादिष्ट पदार्थाची अगदी मेजवानीच असते. मामाच्या लग्नामध्ये सर्वात जास्त लाड भाच्याचा केला जातो. मामाच्या लग्नामध्ये आपण जर लहान असलो तर वरातीच्या घोड्यावर मामाच्या पुढे आपल्याला बसवले जाते. त्याचबरोबर स्टेजवर सुद्धा मामामामी च्या जोडीच्य मध्ये उभा राहून छान पैकी फोटो काढले जातात.

आई जेव्हा सणादिवशी मामाच्या घरी जाते तेव्हा आपल्याला सोबत घेऊन जाते कारण आईला माहित असतं आपण जर आपल्या चिरंजीवांना सोबत घेऊन गेलो नाही तर हा आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. इतका मामाच गाव आपल्यासाठी आवडत असतं. यात्रेमध्ये, मार्केटमध्ये आईबाबा पेक्षा मामा सोबत फिरायला खूप आवडते, कारण आपल्याला हवी असलेली वस्तू मामा आपल्याला नक्की घेणार ही आपल्याला खात्री असते.

लहान असताना खाऊसाठी मामाला जर आपण पैसे मागितले तर मामा आपल्याला जेवढे हवे आहेत त्यापेक्षा जास्त पैसे खिशातून काढून देतो. मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मामा मला खांद्यावर घेऊन फिरायला नेत असे. कधी कधी मामा आवडीने त्याच्यासोबत आंघोळ सुद्धा घालत असे. मामाच्या गावी असताना मामा कामावरून घरी येताना नेहमी माझ्यासाठी कॅडबरी आणत असे.

माझ्या वाढदिवसादिवशी मामा छान पैकी मोठा आईस केक आणत असे आणि भाच्याच्या भाचीच्या वाढदिवसादिवशी मामा जर हजर नसेल तर वाढदिवस साजरी करायला काही अर्थच उरत नाही कारण आपल्या वाढदिवसादिवशी आपल्या आवडीची गिफ्ट आपल्याला आपला मामाच घेऊन येणार असतो.

रक्षाबंधन या सणा दिवशी तर मामा आई साठी एक छानशी साडी घेऊन येतो मग काय आईसोबत माझं गिफ्ट ठरलेलं असतं कारण मामाला माहीत असते आईला एक वेळ गिफ्ट नाही घेऊन गेलो तरी चालेल पण आपल्या लाडक्या भाच्यासाठी किंवा भाची साठी काहीतरी त्याच्या आवडीचे घेऊन गेलं पाहिजे. मामा हा शब्द दोन अक्षरांचा आहे पण या शब्दात मायेचे जग सामावलं आहे.

Note: जर तुम्हाला Birthday Wishes for Mama in Marathi या लेखामध्ये दिलेल्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करा.

Leave a Comment