Birthday Wishes for Uncle in Marathi, birthday wishes for kaka in marathi, heart touching birthday wishes for uncle in marathi,

आमच्या आयुष्यातील एक आदर्श, एक मार्गदर्शक,
एक प्रभावी व्यक्तिमत्व यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुम्ही आम्हास अंकलच्या रूपात मिळालात हे आम्ही आमच भाग्य समजतो,
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अंकल तुमच्या मोलाच्या मार्गदर्शनाशिवाय आज मी जिथे आहे तिथपर्यंत पोहोचन शक्य नव्हतं.
अंकल तुम्ही माझ्यासाठी एक प्रेरणा आहात.
तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी रहावो हीच अपेक्षा.
🎂❤️ वाढदिवसानिमित्त काका आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो.🎂👑

अंकल तुम्ही माझ्यासाठी जगातल सर्वात बेस्ट गिफ्ट आहात.
तुमच्या चेहऱ्यावर सदैव हास्य रहावं आणि या जगातल सर्व सुख तुम्हाला मिळाव.
वाढदिवसानिमित्त आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रिय अंकल आज तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त एक गोष्ट सांगावीशी वाटते,
तुमच्यासारखे अंकल माझ्या आयुष्यात असणं म्हणजे एक माझ्यासाठी देवाचं वरदानच आहे.
अंकल तुम्ही सोबत असल्यावर प्रत्येक क्षण अगदी आनंदी होऊन जातो.
तुमचा वाढदिवस तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल घेऊन येवो आजच्या दिवसाचा भरपूर आनंद घ्या,
आणि भरपूर निरोगी आयुष्य जगा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐

माझ्या आदरणीय अंकलला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा. जीवेत शरद: शतम्

अंकल तुम्ही माझ्या आयुष्यातील Hero आहात,
तुम्ही माझी Inspiration आहात,
अंकल तुम्ही माझा Confidence आहात,
अंकल तुम्ही माझे Energy Booster आहात.
🎂👑हॅपी बर्थडे माय डियर अंकल.🎂👑

जेव्हा जेव्हा आम्ही हात जोडतो तेव्हा तेव्हा अंकल तुमच्या सुखाची व उत्तम आरोग्याची कामना करतो.
हा शुभ दिवस पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येवो आणि तुमची साथ आम्हाला आयुष्यभर लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंकल.


आणखी वाचा:
Birthday wishes for father in Marathi
Birthday Wishes for mother in-law in Marathi
Birthday Wishes for Wife in Marathi

तुमच्या शिवाय प्रत्येक खेळ बोअरिंग आहे.
अंकल तुमच्या शिवाय माझा अभ्यास सुद्धा बोअरिंग आहे.
अंकल तुम्ही माझ्या लाईफ मधले मला नेहमी हसवणारे जादूगर आहात.
तुम्ही नेहमी खुश रहा. आजच्या दिवसाचा आनंद घ्या. हॅपी बर्थडे अंकल.
Birthday Wishes for Uncle in Marathi
अंकलबद्दल चार शब्द:
सध्याच्या जमान्यात “अंकल” हा इंग्रजी शब्द खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. वडिलांच्या भाऊला “अंकल” म्हटले जाते, तसेच मावशीचा नवरा काका यांना सुद्धा अंकल म्हटले जाते. समाजातील सर्व वडीलधार्या व्यक्तींना अंकल म्हटले जाते.
मित्रानों अंकल या इंग्रजी शब्दामुळे नात्यांमध्ये असणारे प्रेम कमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा अंकल या शब्दाचा जास्त वापर केला जात नव्हता तेव्हा वडीलधारी व्यक्तीना नाना, काका, तात्या, भाऊ, मामा, दादा या नावाने बोलले जात होते. नाना, काका, तात्या या शब्दांमध्ये एक विशिष्ट माया प्रेम आणि आपुलकी लपलेली आहे.
ती माया, प्रेम, आपुलकी. आपल्याला आत्ताच्या काळातल्या इंग्रजी शब्दात दिसत नाही. मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागात गेलात तर तुम्हाला अंकल या इंग्रजी शब्दाचा वापर फार कमी दिसेल कारण आजही खेड्यापाड्यात वडिलधार्या व्यक्तींचा आदर केला जातो, त्यांचा सन्मान केला जातो.
वडीलधाऱ्या व्यक्तींची आज्ञा पाळली जाते. शहराच्या ठिकाणी सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना अंकल म्हटले जाते, मग ती व्यक्ती आपला काका, नाना, तात्या किंवा चुलता असो. मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात वडिलधार्या व्यक्तींचा मान राखला पाहिजे, त्यांची आज्ञा पाळली पाहिजे.
वडीलधारी व्यक्ती आपण कुठे चुकत आहोत, आपण जर वाईट मार्गाकडे जात आहोत तर अशा मोठ्या व्यक्ती आपल्याला चांगला मार्ग दाखवन्याचा, चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला आपल्याला त्यांचे शब्द कठोर मनाला लागणारे वाटतात पण ते आपल्या भल्यासाठी असतात.
आपले कोणा बरोबर भांडण झाले असल्यास किंवा आपल्याला कोणी त्रास देत असले तर आपण सर्वप्रथम आपल्या मामाला काकाला किंवा चूल त्याला सांगतो म्हणजे आपल्या अडचणीच्या वेळी आपल्या सोबत आपला मामा काका व चुलता उभा राहतो मला वाटतं काकाला काका मामाला मामा या नावानेच बोलावं, हे शब्द जरा मायेची वाटतात.
आपल्या मराठी भाषेत जेवढे प्रेम आहे तेवढे प्रेम इंग्रजी भाषेमध्ये अजिबात नाहीये. मराठी भाषा ही आपली मायभाषा आहे. आपल्या मातीतली भाषा आहे. मराठी भाषेतून व्यक्त केलेले प्रेम हे सहज हृदयाला भिडतं. इंग्रजी भाषेमधून अशा भावना व्यक्त करताना असे प्रेम, आपुलकी व माया दिसत नाही.
आईला मम्मी न म्हणता आई या नावाने हाक मारल्यास आई हा शब्द आईच्या काळजाला भिडतो आई शब्द उच्चारताना आई हा शब्द मायेने प्रेमाने भिजलेला असतो. जर तुमचे एखाद्यावर प्रेम असेल व ते प्रेम इंग्रजीमध्ये न व्यक्त करता मराठीत व्यक्त केल्यास आपल्या भावना सहजपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.
मित्रांनो, थोडे पहा आपण मोठ्या भावाला दादा म्हटल्यावर ऐकणाऱ्याच्या आणि बोलणाऱ्याच्या मनाला किती बरे वाटते किंवा बहिणीला ताई म्हटल्यावर किती प्रेम वाढते अशा मराठी शब्दांमध्ये मित्रांनो किती प्रेम जाणवते. तसे पाहिले तर मामी, काकी मावशी, ताई, आत्या, आजी, आजोबा, मामा, काका, दादा, नाना, तात्या या सर्व मराठी शब्दांमध्ये खूप प्रेम, माया भरलेली आहे.
मित्रांनो आपण आपल्या जीवनात प्रिय व्यक्तींना इंग्रजी शब्दांने हाक न मारता आपल्या माय भाषेतून बोलल पाहिजे, मग पहा आपली मराठी भाषा किती श्रेष्ठ ठरेल आणि नात्यांमधला गोडवा, प्रेम, आपुलकी आणि ओढ सुध्दा वाढेल.
मित्रांनो दररोजच्या संभाषणमध्ये शक्यतो जवळच्या व्यक्तींना अंकल या इंग्रजी शब्दाने हाक न मारता त्यांना आपल्या आवडीच्या नावाने हाक मारावे. मित्रानो, मी इंग्रजी भाषेच्या विरोधात नाहीये पण आपल्या लोकांबद्दल आपले प्रेम वाढावे म्हणून सांगत आहे.
अंकल म्हणजे एक प्रकारे आपल्या हक्काची व्यक्ति असते, कधी आपणास आपल्या आईकडून बाबाकडून काही हव असल्यास किंवा काही बाबतीत आई बाबांची समंती हवी असल्यास आपण आपल्या अंकलला आई बाबांची संमती मिळवण्यास मदत करा अशी विनंती करतो आणि अंकलने आईबाबांना समजवून सांगितल्यास परवानगी सुद्धा नक्की मिळते.
Note: जर तुम्हाला Birthday Wishes for Uncle in Marathi/ birthday wishes for kaka in marathi या लेखामध्ये दिलेल्या चुलता, नाना, काका, तात्या यांच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करा.