4+ पहिलं खर प्रेम पत्र First Real Love Letter in Marathi

आवडत्या व्यक्तिला पहिलं प्रेम पत्र लिहताय त्यासाठी first real love letter in Marathi मध्ये लिहून हवय तर मग आम्ही खाली एकुण 4 सोपी, काळजाला स्पर्श करणारी, मोजक्या शब्दात जास्त अर्थ दडलेली प्रेमपत्रे लिहली आहेत.

Examples of First Real Love Letter in Marathi

First Real Love Letter in Marathi

1)

Dear Sweetheart,

कशी आहेस तू!

आज मला तुला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं आहे. या पूर्वी तुला मनातलं सांगण्याचा कित्येकदा प्रयत्न केला पण तू नाराज होशील म्हणून सांगण्याच कधी धाडस झालं नाही. पण तुझी ओढ इतकी आहे कि मला राहावलच नाही.

जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मी माझा न राहिलो, कधी तुझा झालो हे मला कळलच नाही. पण मला कधी वाटलं नव्हतं कि माझ हे वेड हृदय तुझ्यासाठी इतक वेड होऊन जाईल ते. आपल्या भेटी वाढत गेल्या आणि तुझ्या बद्दल असणारी माझी ओढ सुद्धा वाढत गेली.

हळू हळू तुझा सहवास हवा हवासा वाटू लागला आणि माझ हृदय तुझ्यावर प्रेम करू लागलं. तुझी एक खास गोष्ट सांगू का! तुझ मन हे तुझ्याइतकच सुंदर आणि समजूतदार आहे. तुझ बोलणं, तुझ वागणं आणि तुझ प्रेम, या सर्वांवर फिदा झालो आहे मी. मी तुझ्यावर अगदी मनापासून खर प्रेम करतो. I love you so much jaan.

मला माहिती आहे कि मी खूप काही लिहल आहे या पत्रामध्ये, अपेक्षा आहे कि तू नाराज होणार नाहीस.

फक्त तुझाच मी.  

2)

प्रिय प्राणसखे,

माझ heart फक्त तुलाच like करत त्याला तुझ्या आठवणीत रमून जायला आवडत. तुझ नाव ह्या letter मध्ये लिहण व्यर्थ ठरेल कारण तुझ नाव तर already माझ्या heart मध्ये लिहल गेल आहे.

ज्या दिवशी मी तुला first time पाहिलं तो दिवस माझ्या life मधील सर्वात सुंदर दिवस होता. तू माझ्यापासून भले ही दूर आहेस पण तू माझ्या हृदयात कायमची घर करून राहिली आहेस. तू माझ्या हृदयाची धडकन आहेस.

तूच माझ सुख, तूच माझी प्रेरणा, तूच माझा श्वास आणि तूच माझ जीवन आहेस. माझ तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे. please मला समजून घे. नाही राहू शकत मी तुझ्याशीवाय. i love you.

फक्त तुझाच मी. 

3)

डियर जान,

तुला सांगायला बरच काही आहे माझ्या मनात, पण कळत नाही कस सांगू तुला कुठून सुरुवात करू पण न सांगता ही राहावत नाही. म्हणून तुझ्याशी या पत्राच्या माध्यमातून दोन शब्द बोलत आहे. जेव्हा पासून मी तुला पाहिल आहे, जेव्हापासून तुझे शब्द मी ऐकले आहेत.

तेव्हा पासून तुझे सुंदर रूप माझ्या डोळ्यात सामावले आहे. मला जणू तुझी सवयच झाली आहे. तुझ्याशिवाय प्रत्येक क्षण डोंगरासारखा वाटू लागला आहे. हे सर्व माझ्या बाबतीत का घडतय कदाचित याला प्रेम तर म्हणत नाहीत ना! अस वाटू लागलय कि मी आता फक्त तुझाच झालोय.

माझ हृदय तुझ्याबद्दल जे विचार करतय ते आज मी या छोट्याशा पत्रात लिहल आहे. आशा आहे कि तू मला समजून घेशील व तुझ्या मनात जे काही आहे ते नक्की कळवशील.

फक्त तुझाच मी.

4)

प्रिय जिवलगा,

कशी आहेस तू,

गेली कित्येक दिवस तुझ्याशी दोन शब्द बोलायचे धाडस करतोय मी पण माझा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतोय. कदाचित या भीतीने कि तू माझ्यावर नाराज होशील. पण आज मनाची समजूत काढून, मन थोड धीट करून तुला हे पत्र लिहीत आहे.

मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात तुझ्याइतकी दुसरीकोणी सुंदर, प्रेमळ, समजूतदार, सुसंस्कृत व गोड स्वभावाची व्यक्ति पाहिली नाही. आपल्या पहिल्या भेटीतच मला समजलं कि तूच ती व्यक्ति आहेस जी आयुष्यभर मला साथ देऊ शकते. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला माझ सगळ आयुष्य तुझ्यासोबत जगायच आहे.

तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना मी करुच शकत नाही. मी तुला वचन देतो कि तुझ्या सुखासाठी मी माझ सगळ आयूष्य खर्च करेन. मला तू नेहमी हसत असलेले पाहायचं आहे. तुझ्या चेहर्‍यावरची स्माइल हीच खरी माझी प्रॉपर्टि आहे.

मला तुला पुन्हा भेटायचं आहे. तुझी वाट पाहत आहे.

फक्त तुझाच मी.

How to Write First Real Love Letter in Marathi

पहिलं प्रेम पत्र लिहण म्हणजे मनात थोडीशी भीती निर्माण होण हे साहजिकच आहे. पण पहिलं प्रेम पत्र लिहण्याचा अनुभव ही खूप रोमॅंटिक असतो. प्रेम पत्र लिहताना प्रेम पत्राच्या प्रत्येक शब्दात आपुलकी, ओढ व प्रेम व्यक्त करावे लागते. प्रत्येक शब्द काळजाला स्पर्श करणारा असावा लागतो.

प्रेम पत्र हे वास्तविकतेला धरून असावं, खर असावं, उगाच ढगात गोळ्या मारल्याप्रमाणे लिहल जाऊ नये. ज्यावेळी आपल समोरच्या व्यक्तीवर खर प्रेम असत ना तेव्हा प्रेमाचे शब्द त्या प्रेम पत्रात आपोआप उतरतात. जास्त विचार सुद्धा करावा लागत नाही.

असो, तर मित्रांनो पहिल्या प्रेम पत्राला कशी सुरुवात करायची याच्या काही टिप्स खाली शेअर केल्या आहेत त्या नक्की वाचा.

1. सर्वात अगोदर पत्राची सुरुवात डियर स्वीटहार्ट/प्रिय प्राणसखे/प्रिय प्राणसख्या/ डियर जान या शब्दांनी करावी.

2. तुमची भेट कशी झाली, कुठे झाली, आणि त्यातून तुमचे त्या व्यक्तीवरचे प्रेम कसे वाढत गेले, तुमची ओढ कशी निर्माण झाली हे लिहा.

3. ती व्यक्ति तुम्हाला का आवडते त्या व्यक्तिमध्ये कोणते चांगले गुण आहेत ते लिहा.

4. तुमच्या मनात तुमच्या आवडत्या व्यक्तीबद्दल काय भावना आहेत त्या लिहा. तिच्याशिवाय तुम्हाला कसे वाटते, तिच्याशिवाय तुमचा वेळ कसा जातो हे स्पष्ट करा.

5. तुमची त्या व्यक्तिसोबत काय स्वप्ने आहेत ते लिहा. तुम्ही तुमच्या प्रेमाशी किती प्रामाणिक आहात हे पटवून द्या. तुम्ही त्या व्यक्तीसाठी काय करू शकता हे लिहा.

6. तुमचे प्रेम किती खरे व खोल आहे ते सांगण्यासाठी आलंकारिक शब्दांचा वापर करा. (उदा. प्रत्येक क्षण डोंगरासारखा वाटतो तुझाशिवाय/तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.)

7. तिचे त्याचे तुमच्या आयुष्यात किती महत्व आहे हे स्पष्ट करा.

8. प्रेमपत्र लिहण्यासाठी शांत जागा निवडा म्हणजे अर्थपूर्ण असे शब्द सुचतील व अगदी मनातील शब्द कागदावर उतरतील.

तर मग प्रेमवीरांनो या लेखामध्ये दिलेला पहिल्या प्रेमपत्रांचा संग्रह (Collection of First Real Love Letter in Marathi) कसा वाटला आम्हाला comment मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment