Top 50 Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

heart touching birthday wishes for mother in marathi: या जगात सर्वात सोपा आणि अनमोल शब्द कोणता असेल तर तो म्हणजे आई होय. आई ह्या शब्दाची बरोबरी या जगातला कोणताच शब्द करू शकत नाही, या जगातलं कोणतच धन आईच्या प्रेमाची, आईच्या मायेची बरोबरी करू शकत नाही.

आई हा जगातला एक असा अनमोल शब्द आहे ज्याला कोणत्याच व्याख्येची गरज पडत नाही, कारण आई हा एक शब्द नाही तर ती एक भावना आहे, एक हृदय स्पर्श आहे. खर तर आई ही साक्षात परमेश्वराच दुसर रूप आहे. आई ही आपल्या घराला घरपण देत असते. घरातील नाती घट्ट प्रेमाने, मायेने बांधून ठेवण्याच काम आई करत असते.

पुढे आम्ही खास तुमच्या आईच्या वाढदिवसासाठी हृदयस्पर्शी शुभेच्छा (heart touching birthday wishes for mother in marathi) दिल्या आहेत. तुमच्या आईला नक्की आवडतील, या शुभेच्छा वाचून तुमची आई आनंदी होईल.

Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

1. आई तुझ प्रेम सूर्यासारख प्रकाशमय आहे जे माझा प्रत्येक दिवस प्रकाशमान करत, आई तुझ प्रेम मला दिशा देत, जगातल्या सर्वात बेस्ट आईला माझ्याकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

2. आई तुझ्या पोटी जन्म मिळाला हाच खरा आनंद आहे मनाला, आई तुझी साथ व तुझे प्रेम शेवटपर्यंत मिळो हेच मागणे आहे देवाला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

3. आई तू माझ्या आयुष्यातील माझा आदर्श आहेस, आणि आई तुझी साथ, तुझे प्रेम, तुझे मार्गदर्शन यासाठी मी तुझा सदैव ऋणी राहीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

4. आज माझ्या जगातल्या माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, आज माझ्या सर्वात बेस्ट फ्रेंडचा वाढदिवस आहे, आज माझ्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या माझ्या आईचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

5. आई तू फक्त माझी आई नाहीस तर तू माझी बेस्ट फ्रेंड सुद्धा आहे, तू एक कणखर आई व एक उत्तम मित्र बनून मला नेहमी मार्गदर्शन केलेस, आई मी तुझा सदैव ऋणी राहीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

6. प्रिय आई, आज तुझ्या वाढदिवसानिम्मीत मला माझ तुझ्यावर असलेल प्रेम व्यक्त करायचं आहे, तुला खूप सार्‍या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आई तू नेहमी माझ्यासाठी एक प्रेरणा बनून राहिली आहेस, जी मला जिंकण्यासाठी नेहमी बळ देते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

Happy Birthday Mummy in Marathi

Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

1. आई, जर कोणी मला विचारलं कि तू कोण आहेस तर मी त्यांना अभिमानाने सांगेन मी या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे कारण माझ्याजवळ तुझ्यासारखी प्रेमळ आई आहे.

2. आई तुझ प्रेम हे माझ्या जीवनातील मला मिळालेली मौल्यवान भेट आहे, आई तुझा आशीर्वाद आणि प्रोत्साहन मला माझ्या जीवनातील सर्वात कठीण आव्हानांना सामोरे ज्याण्यासाठी बळ देतात. आई आज तुझा वाढदिवस आहे आणि हा माझ्या लाइफ मधील सर्वात ग्रेट दिवस आहे. हॅप्पी बर्थडे आई.

3. संत सांगून गेले सारे ब्रह्मांड आईत सामावले आहे, सारे सुख आईत सामावले आहे आणि आई माझे विश्व तुझ्यात सामावले आहे. हॅप्पी बर्थडे आई.

4. आई म्हणजे काळजाची हाक, आई म्हणजे निशब्द असे जग, आई म्हणजे अमृताची गोडी, आई म्हणजे साक्षात ईश्वराचे रूप. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

5. या जगात प्रत्येकाला सुख पाहिजे पण मला माझ्या सुखात फक्त माझी आई पाहिजे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

6. रात्रंदिवस कष्ट करून उभा केलास संसार, प्रेम देऊनी दिलास चिमुकल्या जीवांना आधार, आई तुझे थोर आहेत उपकार, सांग आई मानू कसे मी तुझे आभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

Birthday Wishes for Mom in Marathi

Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

1. अंगात शंभर हत्तींच बळ निर्माण करणारी आई तू शिवरायांची जिजाऊ वाटतेस, शिकवून स्वत:च्या पायावर उभ करणारी आई तू फुलेंची सावित्री वाटतेस, आई तू कधी वासराची गाय वाटतेस, तर आई तू कधी संघर्ष करणार्‍या शेतकर्‍यांची धरणी माय वाटतेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

2. आईचे प्रेम हे कधीच मोजल जाऊ शकत नाही तर ते मौल्यवान रत्नांसारखं साठवून ठेवलं जात. माझ्यासाठी माझी खरी दौलत माझी आई आहे. हॅप्पी बर्थडे आई.

3. आई तुझ्या जीवनातला प्रत्येक क्षण सुखाचा जावा, मिळावे इतके सुख तुला कि डोळ्यातून कधी अश्रुचा थेंब न यावा. ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो आई तुझा सहवास जीवनभर मिळावा. हॅप्पी बर्थडे आई.

4. आई तू माझ्यासाठी देवाहून श्रेष्ठ आहेस, आई तू जेव्हा सोबत असतेस तेव्हा सर्व दुखाचा, संकटांचा विसर पडतो. आई आज तुझा जन्मदिवस आहे आणि आज तुला या जगातल सर्व सुख मिळो आणि तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना. हॅप्पी बर्थडे आई.

5. प्रिय आई, ज्याप्रमाणे तू मला प्रेम दिलस, स्वत:च्या सुखाची पर्वा न करता जीवनभर माझ्या सुखासाठी कष्ट केलेस. आई तुझा माझ्या आयुष्यात खूप मोठा सन्मान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

6. आई तुझा प्रत्येक शब्द प्रेरणेने भरलेला असतो, आई तुझ्या हातच्या प्रत्येक घासाला अमृताची गोडी असते आणि आई तू दिलेली मायेची शिदोरी कधीच संपत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

Deep Birthday Wishes for Mom in Marathi

1. आई तूझ प्रेम हीच माझ्या जगण्याची आशा आहे, आई तुझ प्रेम हाच माझा विश्वास आहे, आणि आई तुझ प्रेम हेच माझ जीवन आहे. आई तुझ प्रेम हाच माझा विश्वास आहे. वाढदिवसानिम्मीत आई तुला निरोगी असे दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे आई.

2. मी या जगाला विसरू शकतो पण त्या त्यागाच्या, प्रेमाच्या मूर्तीला विसरू शकत नाही, जीने आपल संपूर्ण आयुष्य स्वत:च्या सुखाचा विचार न करता माझ्यासाठी खर्च केल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

3. आई मला माझ्या आयुष्यात अगदी तुझ्यासारख कर्तुत्ववान, यशस्वी बनायच आहे, अगदी तुझ्यासारखं इतरांच्या सुखासाठी जगायच आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

4. या जगात भरपूर आई आहेत पण माझ्या आई सारखी बेस्ट आई या जगात कुठेच सापडणार नाही. कारण तिच्या इतकं प्रेम माझ्यावर दुसर कोणी करूच शकत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

5. आई मी आज जो काही आहे हे केवळ तुझ्यामुळेच, आई तू माझ्या आयुष्यातील व्हीआयपी व्यक्ति आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

6. आई, जोपर्यंत मी या जगात असेन तोपर्यंत तू माझ्या सोबत असशील, जोपर्यंत माझे हृदय धडकत राहील तोपर्यंत तू माझ्या हृदयात असशील, आणि जोपर्यंत या जगात प्रेम असेल तोपर्यंत तुझे अस्तित्व कायम राहील. हॅप्पी बर्थडे आई.

आईचे महत्व सांगावे तितके कमीच आहे. या जगात येण्याअगोदर आपली सर्वात अगोदर आतुरतेने वाट कोण पाहत असेल तर ती आई आहे. ती रात्रीचा दिवस करून आपल्याला लहानाच मोठ करते. स्वत उपाशी राहून आपणास घास भरवते. बोटाला धरून चालायला शिकवते. वाईट चांगले यातला फरक समजावून सांगते. जर कधी आपण मनाने हरलो तर ती आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण करते, पुन्हा लढण्याच, पुन्हा प्रयत्न करण्याच सामर्थ्य ती आपल्यामध्ये निर्माण करते.

मित्रांनो वरती दिलेल्या आईच्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छा संग्रह हा आईसाठी समर्पित केलेला हृदयस्पर्शी वाढदिवसांचा शुभेच्छा संग्रह आहे. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या heart touching birthday wishes for mother in marathi मध्ये नक्की आवडतील.

Leave a Comment