10,000+ मोटिवेशन स्टेटस इन मराठी | motivation status in marathi

1.ज्याला मन जिंकता आलं त्याने माणूस जिंकला आणि ज्याने माणूस जिंकला त्याने जग जिंकले …

2.shivaji maharaj जीवन चरित्रातून एक गोष्ट घ्यायची झाली तर मोठी स्वप्न बघण्याची असामान्य ताकद घ्या . स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रचंड हिंमत आणि धमक घ्या … #motivation status in Marathi

Motivation status in marathi

3.ज्या माऊलीनं आपल्या लेकरांच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली … माणसाला आपल्या अस्मिता आणि अस्तित्वाची जाणीव करून दिली … स्वराज्य रक्षणासाठी आपलं मातृत्व पणाला लावलं अशा जगाच्या पाठीवर सर्वात आदर्श आई … Motivation marathi

संकट , अपयश , अडचणी या एकट्या येत नसतात . त्याबरोबर त्या संधी घेऊन येत असतात . सकारात्मक विचारांची माणसं या संकटात संधी शोधून सोनं करतात तर नकारात्मक विचारांची माणसं ही संकटाच्या गर्तेत मार्ग हरवून बसतात .

शिवाजी महा जितकी संकटे आली त्यांनी त्यात ताकदीने प्रचंड मोठी संधी शोधली आणि महानतेच्या दिशेने एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकले . motivation marathi

# Motivation marathi ज्याच्या आयुष्याला ध्येय आहे त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थ प्राप्त होतो . त्याचे पडणारे प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने असते . आपला जन्म काहीतरी असामान्य घडवण्यासाठी झाला आहे असं ज्याला वाटतं ते आपल्या वैयक्तिक सामाजिक , व्यावसायिक जीवनात भव्य – दिव्य बदल करू शकतात

जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात राजा व्हायचे असेल तर आतापर्यंत कोणी केला नाही असा विचार करा … आतापर्यंत कोणी बघितले नाही असे स्वप्न बघा …

आतापर्यंत कोणी केलं नाही असं काम करा … आतापर्यंत कोणी गेले नाही अशा वाटेवर जा . कारण दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या वाटेवर सर्वच चालतात ; परंतु जी माणसं स्वतःच्या वाटा स्वतः निर्माण करतात त्यांचाच इतिहास घडतो .

जगातील सर्व महान माणसांच्या यशाचं गमक एका गोष्टीत आहे ती गोष्ट म्हणजे मनाची खुणगाठ बांधुन ठेवा . जीवनात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर शिक्षण आडवं येत नाही , गरिबी आडवी येत नाही , वय आडवं येत नाही , जात आडवी येत नाही , की धर्म आडवा येत नाही . मग काय आडवे येत तर … आडवे येतात ते नकारात्मक विचार आणि उत्तुंग यश मिळवायचं असेल तर आपल्या मनातील नकारात्मक विचारांना आडवं करा . सकारात्मक विचारांना उभ करा , हेच खरे शिवसूत्र आहे .

असाध्य ते साध्य करी सायास कारण अभ्यास तुका म्हणे ‘ या जगाच्या पाठीवर अशक्य असे काही नाही . .. अशक्य ते शक्य … असंभव ते संभव असाध्य ते साध्य करण्याची ताकद प्रयत्नांमध्ये आहे . ज्याने मनामध्ये काहीतरी करण्याचा निश्चय केला अशा माणसाला जगामधली कुठलीही ताकद रोखू शकत नाही . आणि ज्याने मनामध्ये काहीच न करायचे ठरवले त्याला जगातील कुठलीही ताकद उठवू शकत नाही .

शिवाजी महाराज हे भारतीय व्यवस्थापनाचे खरे जनक आहेत उच्च दर्जाचे व्यवस्थापन कसं असावं हा शिवरायांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास आज जगाच्या पाठीवर केला जातोय कमीत – कमी वेळेत कमीत – कमी माणसांमध्ये जास्तीत – जास्त पराक्रम करून शिवाजी महाराजांनी जगाला अचंबित केले .

जीवनात गरिबी दूर करायची असेल तर विचारांची गरिबी दूर करून श्रीमंत विचारांचे मालक बना . ज्या दिवशी विचारांची श्रीमंती येईल त्या दिवशी पैशांनी श्रीमंती यायला वेळ लागणार नाही . जगामध्ये पैसे कमवायला पैसे लागत नाही , तर पैसे कमावण्यासाठी लागते ती अक्कल !

भगवंताने आपल्याला जन्माला घातले . आपण कुठल्या जाती धर्मात जन्माला यावे हे आपल्या हातात नसते ; परंतु आपण कुठल्या धर्मात जन्माला आलो याने काही फरक पडत नाही . आपण कुठल्या जातीत जन्माला आलो यानेही काही फरक पडत नाही . आपण कसे दिसतो यानेही काही फरक पडत नाही . आपण मानवी जीवनामध्ये येऊन काय कार्य करतो याने मात्र फार नक्कीच फरक पडतो . कारण माणूस त्याच्या जाती – धर्माने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो .

जोखीम जितकी मोठी यश देखील तितकच मोठं असतं . मैदानात उतरण्याचा धोका पत्करा . ज्या माणसाच्या मनामध्ये असलेल्या भीतीचे राज्य नष्ट होऊन निर्भयतेचे राज्य येईल त्या दिवशी तो माणूस जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही . मराठी माणसामध्ये क्षमता आहे … मराठी माणसामध्ये ताकद आहे … मराठी माणसामध्ये दम आहे … मराठी माणूस मागे का राहतो कारण तो धाडस करत नाही … मुश्कील नही है कुछ दुनिया मैं । तू जरा हिम्मत तो कर । ख्वाब बदलेंगे हकीगत में । तू जरा कोशिश तो कर ॥

आत्तापर्यंत आम्ही जगाला इम्प्रेस करण्यात आपला वेळ वाया घालवत आलो . जगाला इम्प्रेस करण्यात स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आयुष्यात घेऊन आपल्या कार्य कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करा . जग अपोआप दखल घेतल्याशिवाय राहणार नाही .

Great शिवाजी महाराजांची आई तुळजाभवानी मातेवर निस्सीम श्रद्धा होती . स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ‘ असं शिवाजी महाराज म्हणत होते . ‘ जगदंब जगदंब ‘ हे नामस्मरण महाराजांच्या मुखात नेहमी असायचे . महाराज धार्मिक होते , पण अंधश्रद्धाळू मात्र नव्हते … महाराजांनी अमावास्येला युद्ध केली सिंधुबंदी झुगारून आरमार उभे केले . ज्या काळात समुद्रात काही किलोमीटर अंतरावर जाणे पाप मानले जायचे त्या काळात महाराजांचे आरमार मस्कदपर्यंत गेली . जर आपण सर्वांनी अंधश्रद्धा झुगारून जर विज्ञानाची कास धरली तर भारत महासत्ता होण्यापासून जगातील कोणतीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही . कारण ज्या ठिकाणी अंधश्रद्धा आहे त्या ठिकाणी शिवरायांचा भगवा असूच शकत नाही . आणि ज्या ठिकाणी शिवरायांचा भगवा आहे त्या ठिकाणी अंधश्रद्धा असूच शकत नाही .

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ मराठी माणसासाठी नव्हे , केवळ भारतीय माणसांसाठी नव्हे , तर अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक आहे . माणूस कुठल्याही जातीचा असेल , कुठल्याही धर्माचा असेल , कुठल्याही प्रांताचा असेल , कुठल्याही पंथाचा असेल , तो कुठल्याही देशाचा असेल , ज्या दिवशी शिवाजी महाराजांचे खरे विचार तो डोक्यात घेईल त्या दिवशी हे संपूर्ण जग त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही . हे सामर्थ्य , ही ताकद , ही शक्ती निश्चितच शिवचरित्रात आहे

एक असा राजा जो रयतेच्या कल्याणासाठी जगला … एक महान योद्धा जो अन्याय विरुद्ध उभा ठाकला … एक असामान्य नेता ज्याने वर्षानुवर्षाचे गुलामीच जीवन नाकारलं … एक अलौकीक व्यक्तिमत्त्व ज्याने सामान्य रयतेतील असामान्यत्व जागरुक केलं … एक महान व्यक्तिमत्त्व ज्याने माणसांची मन जिंकली , माणूस जिंकला आणि जन्म दिला जगातील सर्वात महान साम्राज्य असलेल्या हिंदवी स्वराज्याला ...

एक वेळेस तुम्ही धन गमावले तर काहीच नाही गमावले . एक वेळेस तुम्ही शरीर गमावले तर थोडं फार गमावले . परंतु तुम्ही चारित्र्य गमावले तर तुमच्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नाही ,

इराणचं राज्य शहाबादचं होतं , अफगानिस्ताणचे राज्य हे आली दुरानीचे होते , अहमदनगरचे राज्य निजामशहाचे होतं , विजापूरचे राज्य हे आदिलशहाचे होते , गोवळकोंड्याचे राज्य हे कुतुबशहाचे होते . पण शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य कुठल्या बादशहा , सुलतान किंवा सम्राटाचे नव्हते . ते रयतेचे राज्य होते . जिथे रयतेचे राज्य आहे तिथे माणसं जगायला आणि मरायला मागे – पुढे पाहत नाहीत

Leave a Comment