50+पाणी वाचवा घोष वाक्य। Save Water Slogans in Marathi

Save Water Slogans in Marathi. importance of water in marathi, uses of water in points in Marathi, pani vachava information in marathi, pani vachava ghosh vakya marathi, pani vachava ya vishayavar ghosh vakya.

चला सर्वांना सांगूया
उज्ज्वल भविष्यासाठी पाणी वाचवूया.

जर असच पाणी वाया जाईल
तर प्रत्येक जीव तहानलेला राहील.

पाणी आहे अमृताची धारा
पाणी आहे प्रत्येक जीवाचा सहारा.

चला हात हाती देऊया
भविष्यासाठी पाणी वाचवूया.

पाणी वाचवा जीवन वाचवा.

चला सर्वजण मिळून शपथ घेऊया
थेंब थेंब पाणी वाचवूया.

पाणी आहे जगण्याचा आधार
पाण्याशिवाय शक्य नाही जीवनाचा उद्धार.

चला पाणी जतन करूया
धरती मातेच सरंक्षण करूया.

जीवन छोट आहे पण
जीवनात पाण्याच महत्व खूप मोठ आहे.

जर असेल स्वच्छ पाणी स्वच्छ परिसर
तरच होईल जीवन अति सुंदर.

चला सर्वांना सांगूया
पाणी बचतीचे उपाय सुचवूया.

बचत करा पाण्याची नाहीतर
होईल हानी जीवनाची.

थेंब थेंब पाणी वाचवा
दुष्काळातले दिवस आठवा.

Save Water Slogans in Marathi

चला झाडे लावूया
पाणी संकटापासून वाचुया.

जी माणसे वाचवतील पाणी
तीच माणसे समजली जातील शहाणी.

नका घालू पर्यावरणावर घाला
पाणी वाचवण्याची सवय लावा.

एक पाऊल पाणी वाचवण्यासाठी
एक पाऊल जीवन समृद्धीसाठी.

जर आज तुम्ही पाणी वाचवाल
तर उद्या तुम्हाला पाणी वाचवेल.

जाणा महत्व पाण्याचे होईल कल्याण जीवनाचे.

जर आज तुम्ही पाणी व्यर्थ नष्ट कराल
तर उद्या पाण्याविना तूमचे जीवन नष्ट होईल.

पाणी आहे प्रकृतीची अनमोल धारा,
पाण्याचा वापर काटकसरीने करा.

घरो घरी देऊया नारा पाण्याचा
वापर काटकसरीने करा.

चला पाण्याचे महत्व जाणूया
आपल्या जीवनाला अर्थ आणूया.

पाणी पृथ्वीचा प्राण आहे
मानवी जीवनाची शान आहे.

पाणी आहे अमृताची धारा
पाणी आहे प्रत्येक जीवाचा सहारा.

चला हात हाती देऊया
भविष्यासाठी पाणी वाचवूया.

पाणी वाचवणे प्रत्येकाच कर्तव्य आहे
कारण पाणी जगण्यासाठी अति आवश्यक आहे.

स्वच्छ पाणी सुंदर मन
चला वाचवूया निसर्गाचे धन.

पाणी आहे सर्वश्रेष्ठ तीर्थ
पाण्याशिवाय नाही जीवनाला अर्थ.

पाणी आहे प्रत्येक जीवाचा श्वास
त्यास वाचवण्याचा घ्या थोडा त्रास.

पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे.

पाण्याच रक्षण भविष्याच सरंक्षण.

पाण्याविना जग अधुर आहे
पाण्यावर जीवसृष्टी निर्भर आहे.

नवीन वर्षी नवा संकल्प करू पाण्याचा
वापर काटकसरीने करू.

पाणी वाचवण्याचे घ्या आज कष्ट
नाहीतर येणारी पिढी होईल उद्या नष्ट.

आज तुम्ही पाणी वाचवा
उद्या पाणी तुम्हाला वाचवेल.

पाण्याच रक्षण परिवारच सरंक्षण.

पाणी वाचवण्याचा घ्या पुढाकार
उद्या पाणीच देईल तुमच्या भविष्याला आकार.

पाणी आहे खर सोन
पण पाण्याला वाचवेल कोण?

पाणी हा प्रत्येक सजीवाच्या जीवनातील अतिशय महत्वाचा घटक आहे. संपूर्ण सजीवसृष्टी पाण्यावर अवलंबून आहे. पाणी पृथ्वीचा आत्मा आहे, पाणी पृथ्वीचा श्वास आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी पाणी अतिशय महत्वाची भूमिका बजावते. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने केला पाहिजे, आवश्यक तेवढेच पाणी वापरले पाहिजे.

दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खाली चालली आहे त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा अपव्यय टाळला पाहीजे, पिण्याचे स्वच्छ पाणी दूषित होण्यापासून वाचवले पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्याच्या पाण्याची तोटी(नळ) पुर्णपणे बंद केली पाहिजे.

आपल्या घरामध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळला पाहीजे, किचन आणि बाथरूम मध्ये आवश्यक तेवढेच पाणी वापरले पाहिजे. पाणी वाचवण्यासाठी जर योग्य पाऊल उचलले गेले नाहीत तर पाण्याविना येणारा भविष्यकाळ खूप भयानक असेल, संपूर्ण सजीव सृष्टी संकटात सापडेल. खेडोपाडी, शहरामध्ये होणारा पाण्याचा गैरवापर थांबला पाहिजे.

पाणी वाचवणे किंवा पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे या विषयावर ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. जर प्रत्येक जन दररोज थोड थोड पाणी वाचवेल तर संपूर्ण देशामध्ये कितीतरी करोडो लीटर पाणी प्रत्येक दिवसाला वाचू शकते आणि आपण भविष्यात येणार्‍या पाणी संकटातून वाचू शकतो.

if you like “Save Water Slogans in Marathi” please share with your school friends on social media.

Leave a Comment