{Best 56+} मदत केल्याबद्दल आभार संदेश, मदत करणारे होतील खुश

मदत केल्याबद्दल आभार संदेश, Thank you for helping message in Marathi, आर्थिक मदत केल्याबद्दल आभार: मानवता हाच खरा धर्म आहे आणि एकमेकांना मदत करणे हे माणसाचे माणुसकीच्या नात्याने खरे कर्तव्य आहे. माणसाने जीवन जगत असताना त्याला शक्य होईल तेवढी मदत इतरांना संकटाच्या वेळी करत राहिले पाहिजे.

मित्रांनो आज आम्ही या पोस्टमध्ये खास अशा लोकांसाठी मदत केल्याबद्दल आभार संदेश घेऊन आलो आहोत जी मंडळी त्यांच्यावर केलेल्या मदतीसाठी मदत करनारांचे आभार मानन्यासाठी उत्सकू असेल.

मदत केल्याबद्दल आभार संदेश

मदत केल्याबद्दल आभार संदेश मराठी

मानू कसे आभार तुमचे खरच काही कळत नाही
तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाही.

सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्यापाठी,
काळजातले दोन शब्द तुमच्यासाठी

शब्दातून आभार कसे व्यक्त करावे तुमचे?
तुमच्याविषयीच्या आदराने मन भरून आले तुमचे.

तुम्ही माझी मदत करून माझ्यावर खूप मोठे
उपकार केले आहेत, मी तुमचा ऋणी आहे.
तुमचे खूप खूप आभार

तुम्ही माझ्यासाठी देव माणूस आहात तुम्ही
केलेली मदत माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.
तुमचे खूप खूप आभार

अशीच आपली कृपा आमच्यावर राहू द्या.
मदत केल्याबद्दल खूप खूप आभार.

तुमची लाख मोलाची मदत मी कधीच
विसरणार नाही. तुमचे खूप खूप आभार

शेवटी मित्रच मित्राच्या कामी येतात.
मदत केल्याबद्दल खूप खूप आभार.

तुम्ही अगदी देवाच्या रूपात माझ्यासाठी
धावून आलात. तुमचे खूप आभार

संकट काळी जो मित्र धावून येतो तोच
खरा मित्र. आपले आभार

मी त्या लोकांचा नेहमी आभारी असेन
ज्या लोकांनी माझ्या वाईट वेळेत मला मदत केली.

तुमची मदत म्हणजे प्रत्यक्षात देवाचीच कृपा आहे.
धन्यवाद तुमच्या मदतीने मी अगदी धन्य झालो.
आपले आभार

तुमची मदत म्हणजे मैत्रीचं एक सुंदर उदाहरण आहे.

कोणत्या शब्दात तुमचे आभार व्यक्त करू
यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे. मदत
केल्याबद्दल खूप खूप आभार.

माझ्या जीवनातील दुखात माझी मदत
केल्याबद्दल मी सर्व मित्रांचा आभारी आहे.

अगदी योग्य वेळी माझी आपण सर्वांनी मदत केलीत
त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

फूल नव्हे फुलाच्या पाकळी प्रमाणे सर्वांनी
थोडी थोडी मला मदत करून मला या
संकटातून बाहेर काढलेत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

आज मी या ठिकाणी उभा आहे याला केवळ
तुमचेच आशीर्वाद कारणीभूत आहेत, तुमच्याशिवाय
या कठीण संकटातून बाहेर पडणे शक्य झाले नसते.
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

आपला किमती वेळ काढून मला मदतरूपी प्रेम
दिलेत त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.

तुम्हा सर्वांचे प्रेम, आपुलकी व मदत माझ्यासाठी
नेहमी एक जगण्याची नवी उमेद ठरली आहे.
मदत केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.

ज्यावेळी संकट आले त्यावेळी सर्व रक्ताच्या
नात्यांनी साथ सोडली आणि शेवटी मानलेले
मित्रच कामी आले. अशा सर्व मित्रांचे खूप खूप आभार.

जीवनात जेव्हा जेव्हा हरण्याची वेळ आली तेव्हा
तेव्हा माझे जिवलग मित्र धावून आले.
अशा सर्व मित्रांचे खूप खूप आभार.

इतरांना मदत करणे म्हणजे स्वतालाच
मदत केल्यासारखे आहे.

जर तुम्ही इतरांच्या मार्गावर दिवा पेटवाल
तर तो दिवा तुमच्या मार्गात सुद्धा उजेड पाडेल.

एखाद्याला तुम्ही त्याच्या गरजेच्या वेळी मदत
कराल तर तो कधी तुमच्या उपयोगी पडेल हे
सांगाता येणार नाही. त्यामुळे तुमची थोडीशी
मदतीची गुंतवणूक तुम्हाला मोठा परतावा देवू शकते.

मनुष्य जन्माचा हेतूच हा आहे की सर्व गोष्टी
व्यवस्थित चालण्यासाठी प्रयत्न करणे.

या जगात असा एक ही व्यक्ति नाही जो
इतरांना मदत करून भिकेला लागला आहे.

यह भी पढ़ें:

Thank You Message in Marathi

Thank You for Birthday Messages to Family and Friends

ज्यावेळी एखाद्यावर एखादे संकट येते त्यावेळी कोणी सुद्धा त्याच्या मदतीला धावून येत नाही पण काही माणुसकी जपणारी माणसे या जगात आता सुद्धा आहेत. जी मोठ्या मनाने कोणी आजारी पडल्यावर किंवा नैसर्गिक अनैसर्गिक अपघात झाल्यावर मदतीला धावून येतात व आपले मित्र, नातेवाईक या नात्याने कर्तव्य पार पाडतात.

जर आपण एखाद्याला त्याच्या अडचणीच्या वेळी मदत केली तर तो सुद्धा आपल्याला आपल्या अडचणीच्या वेळी मदत करतो. पण काही मंडळी या जगात अशी आहे जी लोकांनी त्यांना कितीही मदत केली तरी अशा लोकांना त्याचे काही महत्व वाटत नाही. अशी मंडळी इतरांनी त्यांच्यावर केलेले उपकार लगेच विसरून जातात.

We hope that you will love and share these Thank you for helping message in Marathi. (मदत केल्याबद्दल आभार संदेश) with your friends and family on social media.  

Leave a Comment