{Best 2024} प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, pratham varsha shraddha quotes in Marathi: एखादी व्यक्ति मरण पावून एक वर्ष झाले कि त्यांच्या पश्चात त्याची मुले नातवंडे त्या व्यक्तीचे प्रथम वर्ष श्राद्ध घालतात. प्रथम वर्ष श्राद्ध घालणे हे हिंदू धर्मामध्ये पवित्र कार्य मानाले जाते, पितृ ऋण फेडण्याकरिता, मरण पावलेल्या व्यक्तीच्या कार्याचे स्मरण करण्याकरिता वर्ष श्राद्ध घातले जाते.

मरण पावलेल्या व्यक्तीचे प्रथम वर्ष श्राद्ध घालणे हे त्यांच्या पश्चात हयात असलेल्या व्यक्तींचे परम कर्तव्य समजले जाते. आपण सर्वांनी प्रथम वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे मनामध्ये कोणताही द्वेष न बाळगता मनासून श्रद्धांजली वाहिली पाहिजे.

त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना शब्दांचा आधार दिला पाहिजे, त्यांचे सांत्वन केले पाहिजे, हेच खरे माणुसकीचे कार्य आहे. मित्रांनो जर आपण प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश/ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो संदेश यांच्या शोधात असाल तर आम्ही काही मनाला स्पर्श करणारे प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश/ ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो संदेश या लेखामध्ये दिले आहेत.

प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश

तुमचे जीवन हे कर्म प्रधान होते,
आपण अगदी सोन्याचा संसार केला,
नाही दुखावले कधी कोणाला,
कोणाचा कधी राग नाही धरला,
प्रेमाने सर्वांना जवळ केले असे होता
आपण, तुमची आठवण सदैव
काळजात नांदेल. ईश्वर त्यांच्या
आत्म्यास शांती देवो.

साथ जरी सुटली तरी तुमची आठवण
फुलांच्या सुगंधापरी मनात दरवळत राहील,

जेव्हा वाटेल आयुष्यात कधी एकटे
तेव्हा मन फक्त तुम्हाला शोधत
राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास
शांती देवो.

प्रेमाचे नाव होता तुम्ही, माणुसकीचे
गाव होता तुम्ही, आयुष्यरूपी
समुद्रातील बुडत्याची नाव होता तुम्ही,
तुम्हाला हरवणे म्हणजे सूर्याचे
डोंगराआड कायमचे बुडणे होय.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

ढग येतात पण पाऊस पडत नाही
आठवण येती तुमची पण तुम्ही
काही येत नाही, आठवतात सुख
दुखाचे क्षण तुमच्या सोबत व्यतीत
केलेले, सोबत दोघांनी हे सर्व जग
पाहिलेले. तुमची कमी सारखी
जाणवत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास
शांती देवो.

फूल जरी कोमेजले तरी सुगंध देणे
थांबवत नाही, तुम्ही जरी आमच्या
पासून दूर गेलात तरी आज ही तुमचे
विचार आम्हाला रस्ता दाखवत आहेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

आई विना बाळ क्षणभर ही राहत
नाही, न पाहता आईला होते कासावीस,
जीवनातला प्रत्येक क्षण तुमच्या सोबत
घालविला, आता तुमच्या विना काय
असेल आमची अवस्था. ईश्वर तुझ्या
आत्म्यास शांती देवो.

मायेची सावली होतीस तू, दयेचा सागर
होतीस तू, देवार्‍यातील दिवा तर
चिमुकल्या जीवांचा मेवा होतीस तू,
आई तू फक्त आई नव्हतीस तर साक्षात
वात्सल्याची मूर्ति होतीस तू. ईश्वर तुझ्या
आत्म्यास शांती देवो.

तुझ्याविना नव्हता कोणाचा आधार,
तू दिले जीवन केला जीवनाचा उद्धार.
ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो.
वाट पाहून डोळे थकले सांग कधी परत
येशील तू, आठवणीत तुझ्या रडतो आहे
सांग कधी डोळे पुसायला येशील तू.
🙏ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो.🙏

जसा झुडुपाला आधार मातीचा, जसा
पक्षाला आधार फांदीचा, तसा दुखाचे
अश्रु पुसायला पदर होता माझ्या आईचा.
ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो.

Rest in Peace Message in Marathi

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

आशा आहे कि या लेखामध्ये दिलेले प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश/ ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो तुमच्यासाठी उपयोगाचे ठरतील. इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.

Leave a Comment