{अगदी सुंदर ५०+} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ (मोठ्या/लहान) २०२१

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, vadhdivsachya hardik shubhechha bhau, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा png, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश,

जगातील सर्वात बेस्ट अशा प्रेमळ,
मनमिळावू, व प्रत्येक परिस्थितिमध्ये पाठीशी उभा राहणाऱ्या
भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

फुलात फूल जाईचे आणि जगात प्रेम माझ्या भाऊचे,
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भाऊ.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या प्रेरक शब्दांनी
पंखामध्ये बळ निर्माण करणारे,
भरारीसाठी सज्ज झालेल्या युवा वर्गाला
आपल्या ज्ञानाने मार्गदर्शन करणारे,
आपल्या गोड वाणीने लहान थोरांची मने जिंकणारे
थोर नेतृत्व व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ
यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आभाळा एवढी माया आणि सागरा एवढं प्रेम देणाऱ्या
माझ्या भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

जरी आनंदाची चाहूल होती तरी भाऊराया आम्हाला तुझी साथ होती,
जरी संकटाची काळरात्र होती तरी भाऊराया तुझी आम्हाला साथ होती.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भाऊ.

आभाळा एवढं विशाल मन असणाऱ्या,
शब्दांना साखरे एवढी गोडी असणाऱ्या,
आई-वडिलांसारखं प्रेम करणाऱ्या
आमच्या भाऊला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो,
शिल्पकार ज्याप्रमाणे ओबडधोबड दगडावर घाव घालून सुंदर मूर्ती घडवतो,
त्याचप्रमाणे आमच्या भाऊंनी आम्हाला घडवले आहे.
आज जे कोणी आहोत आम्ही ही केवळ भाऊंची कृपा आहे.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपल्या कर्तबगारीने आपले आयुष्य सुगंधित करणारे,
आपल्या महान कर्तृत्वातून स्वता सोबतच
जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे,
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे कार्य करणारे
थोर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ,
आमच्या भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुमची सर्व स्वप्ने साकार व्हावीत,
प्रेमाने आपुलकीने जपलेली आपली नाती
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अमर राहावीत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

मन लावून करावा तू अभ्यास,
घ्यावीस तू आयुष्यामध्ये उत्तुंग झेप,
आई-वडिलांच्या इच्छा अपेक्षा व्हाव्यात पूर्ण तुझ्या हातून,
अपार कष्ट घेऊन आपल्या घराण्याचं नाव करावे तू रोशन.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

करून दाखवावे बरेच काही आयुष्यामध्ये मोठे तू होताना,
हेवा वाटावा या जगास तुझा तू यशस्वी झालेला पाहताना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझ्या आयुष्याला मिळो नवे वळण नवे पर्व,
करुनी यशाचा पाठलाग लाभो आनंद व उत्तम आरोग्य,
ठरो तू भरगच्च यशाचा मानकरी.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझा गोड सहवास हेच आमचे वैभव,
तुझे यश तुझे आरोग्य हेच आमचे धन
आणि तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी जणू दिवाळीचा सण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

प्रत्येक घरामध्ये लहान व मोठा भाऊ असतो. आपण आपल्या घरातील मोठ्या भावाचा आदर करतो आणि लहान भावाचा लाड करतो म्हणजेच लहान भाऊ घरातील सर्व सदस्यांचा आवडता असतो. सर्वजण त्याचा लाड करतात त्याचा हट्ट पुरवतात. घरातील सर्वजण घरामध्ये मोठा भाऊ असेल तर मोठ्या भावास घाबरतात. तो म्हणेल ते आपणास ऐकावे लागते. आपल्या वडिलांनाच्या पाठीमागे आपला मोठा भाऊच असतो.

जो आपल्या घराला आधार देत असतो. घरामध्ये मोठा भाऊ असेल तर तो काही प्रमाणात आपल्या वडिलांची जबाबदारी स्वतावर घेतो आणि घर सांभाळण्याचं घराला आधार देण्याचे काम वडिलांप्रमाणे मोठा भाऊ सुद्धा करत असतो. आपल्या आई वडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी ही मोठ्या भावावरती येत असते व घरामध्ये लहान बहीण असेल किंवा भाऊ असेल त्याचं पालन पोषण शिक्षण संगोपन करणे ही सर्व जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते आणि ही जबाबदारी तो मोठ्या कष्टाने पार पडत असतो.

समाजामध्ये सुद्धा काही वडीलधारी व्यक्तींना भाऊ असे म्हटले जाते कारण समाजातील वडीलधारी व्यक्ती आपल्याला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपल्याला संकटकाळी मदत करत असतात. शासकीय खाजगी कामांमध्ये आपल्याला योग्य सल्ला देण्याचे काम समाजातील वडीलधारी व्यक्ती करत असतात. आपल्याला योग्य दिशा दाखवून आपल्या जीवनाची प्रगती कशी होईल यादृष्टीने ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. म्हणून वडीलधारी

व्यक्तींना भाऊ म्हटले जाते. भाऊ हा शब्द आदराने वापरला जाणारा शब्द आहे. भाऊ या शब्दांमध्ये आपणास आदर पाहायला मिळतो. भाऊ हा शब्द आपल्या नम्रतेचे  लक्षण आहे. जर आपण समोरच्या व्यक्तीला भाऊ असे म्हटले की त्याच्या मनामध्ये आपले एक विशिष्ट स्थान  निर्माण होते. दोघांमधील आपुलकी वाढविण्याचे काम भाऊ हा शब्द करत असतो. दोघांमधील प्रेम वाढवण्याचे काम भाऊ हा शब्द करत असतो.

सहज आपण एखाद्याला भाऊ असं जरी म्हटलं आणि जर आपले काही काम असेल तर ते काम जवळ जवळ नव्वद टक्के पूर्ण झालेलं असतं. म्हणजे पहा भाऊ या शब्दामध्ये किती ताकत आहे. आपल्या समाजातील महिलांचं शस्त्र कोणत असेल तर ते म्हणजे भाऊ. आपल्या समाजातील महिलांवर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी त्यांचा भाऊच त्यांच्या मदतीला धावून येत असतो.  भाऊ हा सर्व काही असतो

मग तो मानलेला भाऊ असो किंवा सखा भाऊ असो. काही बाबतीत मानलेला भाऊ सुद्धा सख्ख्या भावापेक्षा आपल्याला जास्त मदत करतो तर काही बाबतीत मानलेले भाऊ फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी नाते जोडतात तर सख्खे भाऊ आपली जबाबदारी पार पाडत असतात. खरच भाऊ या शब्दामध्ये खूप मोठी ताकत आहे. आपण आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीस भाऊ हमखास म्हटलं पाहिजे. इतर नात्यापेक्षा भावाचं नातं हे सुद्धा सर्वश्रेष्ठ नातं मानल जातं कारण हे नातं अगदी कुणाशीही कधीही निस्वार्थीपणे निर्मळ मनाने जोडल जाऊ शकत.

जर तुम्हाला “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ” या लेखामध्ये दिलेल्या भाऊसाठी वाढदिवसाच्या शूभेच्छा आवडल्या असतील तर सोशल मीडिया फेसबूक, व्हॉटसअप्प वर नक्की शेयर करा.

Leave a Comment