{हृदयस्पर्शी} वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba

वडील चारोळ्या वाचून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. Marathi Kavita Baba Sathi, baba Marathi status, vadil status quotes in marathi, वडील म्हणजे काय, fathers day quotes in Marathi, वडील स्टेटस मराठी, वडील शायरी मराठी, father Shayari in Marathi, few lines on father in Marathi, emotional quotes on father in Marathi.

वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba

आई घर सजवते आणि बाबा आयुष्य सजवतात.

आई घरांच आंगण जरी असली ना
तरी बाबा घरांच कुंपण आहेत,
कारण बाबा आपल्या घरावर येणाऱ्या
संकटाला सर्वात अगोदर सामोरे जातात.

वडील म्हणजे बरच काही असत,
वडील म्हणजे कधीही नष्ट न होणाऱ्या
उर्जेचा स्त्रोत, वडील म्हणजे कधीही न
आटणाऱ्या मायेचा सागर, तर वडील म्हणजे
कधीही न संपणाऱ्या पैशाची बँक!

वडील आहेत तर आपली सगळी स्वप्ने पूर्ण होणार,
वडील आहेत तर बाजारातली सगळी खेळणी आपलीच असणार.

वडील म्हणजे नदीत बुडालेल्या व्यक्तीला पाण्याबाहेर
येण्यासाठी हाताला लागलेला लाकडी ओंडका होय.

हे पण वाचा:

Heart Touching Quotes on Mother in Marathi

Marathi thoughts with meaning

नवरा बायकोच्या सुंदर नात्यावर कोट्स व स्टेट्स

वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba
वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba

हृदयाला वेदना झाल्याशिवाय डोळ्यातून
पाणी येत नाही, वडील काय असतात हे
आपण स्वत: वडील झाल्याशिवाय कळत नाही.

मला हरवण्यासाठी लोकांनी मला घाबरवण्याचे
प्रयत्न केले होते, पण त्यांना काय माहीत मला
जिंकवण्यासाठी बाबांनी मला संघर्षाचे अमृत पाजले होते.

कधीच उपाशी झोपलो नाही मजबूर बनून,
स्वत:ची स्वप्ने विकून बाबांनी भरवले मजदूर बनून.

न मागताच सर्वकाही वेळेअगोदर मिळत,
मी काळा गोरा कसाही असो पण मी
दिसल्यावर माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर हास्य येत.

बाबांची बरोबरी या जगात दुसर कोणी काय करू शकेल,
बाबांच्या कष्टापूढे या जगात दुसर कोणी काय टिकू शकेल.

baba vadil marathi status 3

आई दिव्यातून पडणारा प्रकाश जरी असला
तरी वडील त्या दिव्यातील जळणारी वात आहे.

बाबा समजायला बाबांपासून खूप दूर जाव लागत.

वडिलांच कष्ट जर डोळ्यासमोर असेल तर
कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज पडत नाही.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति माझ्यासाठी माझे बाबा आहेत.

बाबा तुम्ही मला खूप काही दिल पण आता काही
नको आहे, आता फक्त एका संधीची गरज आहे.
या जगाला मला दाखवून द्यायच आहे की तुमच्या
मुलामध्ये सुद्धा काही खास आहे.

वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba
father quotes in marathi, Vadil status, father Shayari

आयुष्य जगण्यासाठी वडिलांची दौलत
नव्हे तर वडिलांची सोबतच खूप झाली.

आज आपण रोटी बनवणाऱ्या हातांना नव्हे
तर रोटी कमवून आणणाऱ्या हातांना सलाम करूया.

कष्ट करून मोठी होण्याची स्वप्ने मी पाहतो,
पण जेव्हा मनात हरण्याची भीती येते तेव्हा
फक्त बाबांकडे पाहतो,
कारण माझी प्रेरणा माझे बाबा आहेत.

आपल्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत
आपल्या मुलांवर कुर्बान करतो,
अरे तो बापच असतो जो आपल्यासाठी
दुखामध्ये सुद्धा हसत असतो.

बाबांचे ते वाक्य आज समजले तेव्हा बाबा
म्हणायचे बाळा ज्यावेळी तू स्वत कामवशील
ना त्यावेळी याची किंमत कळेल तुला.

वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba
वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba

आवाज न करता, डोळ्यातून अश्रु न येता रडणारा
या जगात फक्त एकच व्यक्ति आहे ते म्हणजे आपले वडील.

कष्ट करून मोठी होण्याची स्वप्ने मी पाहतो,
पण जेव्हा मनात हरण्याची भीती येते तेव्हा
फक्त बाबांकडे पाहतो,
कारण माझी प्रेरणा माझे बाबा आहेत.

आपल्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत
आपल्या मुलांवर कुर्बान करतो,
अरे तो बापच असतो जो आपल्यासाठी
दुखामध्ये सुद्धा हसत असतो.

बाबांचे ते वाक्य आज समजले तेव्हा बाबा
म्हणायचे बाळा ज्यावेळी तू स्वत कामवशील
ना त्यावेळी याची किंमत कळेल तुला.

बाबा तुम्ही मला खूप काही दिल पण आता काही
नको आहे, आता फक्त एका संधीची गरज आहे.
या जगाला मला दाखवून द्यायच आहे की तुमच्या
मुलामध्ये सुद्धा काही खास आहे.

वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba
वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba

पुस्तकातून नव्हे तर मी रस्त्यावर लागणाऱ्या
ठेसांतून शिकलोय, आणि संकट असताना
सुद्धा हसायला मी माझ्या बाबांकडून शिकलोय.

झाडाप्रमाणे उन्हात झिजून आपल्या मुलाबाळांना
सावली देणारे वडील कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार
करत नाहीत, सर्व काही ते मुकाट्याने सोसतात.
आपल्या मुलांना आयुष्याच्या शर्यतीमध्ये जिंकवण्यासाठी
ते नेहमी स्वतला हरवतात.

बाबा या दोन शब्दात संपूर्ण जग सामावल आहे,
कारण बाबा सोबत असल्यावर हे जग आपल्या
मुठीत असल्यासारख वाटत.

वडील म्हणजे फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्याचे
दुकान नाही तर वडील म्हणजे प्रत्यक्षात देवाचा अवतार आहे,
आपली काळजी घेण्यासाठी आपल्यावर, जिवापाड प्रेम
करण्यासाठी देव आपल्या बाबांच्या रूपात आला आहे.

लहान असताना ज्यावेळी आपण आजारी पडायचो
त्यावेळी फक्त आईच रात्रभर जागत नसायची तर
आपले बाबा सुद्धा अर्ध्या झोपेत असायचे,
आपल्या लेकराच्या डोळ्यातील पाणी पाहून
बाबा सुद्धा पांघरूण अंगावर घेऊन रडायचे.

मी रडतो तेव्हा तो मला हसवतो, मी रूसतो
तेव्हा तो मला मनवतो, काय माहीत कोणत्या
मातीपासून बनला आहे बाबा जो स्वत दुखी
राहून सुद्धा आम्हाला हसवत राहतो.

आज आपल्या सुख दुखात सामील होणारे शंभर
मित्र असतील, पण बाबा आपले खरे मित्र आहेत,
कारण आपल्या लेकरांच सुख हेच आपल सुख
समजणारे फक्त आपले बाबाच असतात.

जगाने कितीही वेड लावू द्या पण तुम्ही मात्र
आपल्या आई बाबांची ओढ कधीच संपू देऊ नका.

वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba

खाली दिलेले शेवटपर्यंत वाचा नक्की काही तरी बोध मिळेल (वडील म्हणजे काय?)

आतापर्यंत या जगात फक्त आईचेच गोडवे गायले गेले आहेत, आई वरती कविता केल्या गेल्या आहेत, आईचे महातम्य वर्णिले गेले आहे. पण बाबांविषयी फार कमी काव्य, कविता व गायन केले गेले आहे. पडद्यासमोर असते ती आई आणि पडद्यामागे असतात ते बाबा.

आई आपल्यासाठी खूप काही करत असते पण खर्‍या अर्थाने आयुष्याला योग्य आकार देण्याचे, योग्य वळण लावण्याचे काम आपले बाबा करत असतात. आपल्या डोक्यावरच आभाळ आहे बाबा. बाबा अगदी एखाद्या झाडाप्रमाणे ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता झाडाप्रमाणे आपल्याला मायेची सावली देत असतात.

घराचं कुंपण बनून आपल्यावर येणाऱ्या संकटाला प्रथम ते स्वतः सामोरे जातात आणि आपले संरक्षण करतात. बाबा हे चंदनाप्रमाणे आपला देह झिजवून आपल्या प्रत्येक दुःखावर औषध बनतात आणि आपल्याला बरे करतात. आपण लहान असताना ज्या वेळी आजारी पडायचो त्यावेळी आई रात्रभर जागायची आपली काळजी घ्यायची पण बाबासुद्धा अर्धे जागेचे असायचे

फक्त पांघरून अंगावर असायचं पण डोळे मात्र पांघरुणाच्या आतमध्ये उघडेच असायचे. आपला रडण्याचा आवाज ऐकून बाबासुद्धा दचकून उठायचे. आई घराबाहेर असल्यावर बाबा सुद्धा आपल्याला कडेवर घ्यायचे आणि आपली समजूत घालायचे. आपला हट्ट बाबा पूर्ण करायचे. जसे जसे मोठे होत गेलो, तसतसे आपण आपल्या बाबांना हव ते आणून देणारे दुकान समजायला लागलो.

स्वतःची स्वप्ने स्वतःच्या इच्छा यांचा विचार न करता बाबा आपला सर्व हट्ट पूर्ण करायचे. आपल्याला हव ते आणून द्यायचे. स्वतःच्या बनियनला कितीही छिद्रे पडलेली असू द्या तरीपण बाबा आपल्या मुलाला त्याच्या पसंतीप्रमाणे कपडे घेत असत मग ती कितीही महागडे असू द्या. मुलांच्या शिक्षणासाठी,

मुलीच्या लग्नासाठी बाबा सावकाराकडे स्वतःला विकतात, प्रसंगी चाकरी करतात व सावकाराकडून व्याजाने पैसे काढून मुलाच्या नोकरीसाठी, शिक्षणासाठी, लग्नासाठी ते पैसे खर्च करतात व आपल्या मुलांची हौस पूर्ण करतात. खरच या जगात आपल्या बाबांची वडिलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.

बाबा आपल्यासाठी सर्व काही आहेत. बाबा हा शब्द दोन अक्षरांचा असेल पण मित्रांनो या शब्दाचा अर्थ जेवढा समजायला जाऊ तितका कमीच आहे. या दोन अक्षरांच्या शब्दामध्ये विशाल समुद्राएवढे स्वरूप सामावले आहे. ना त्याला किनारा आहे ना खोलीची मर्यादा असा हा मायेचा अथांग महासागर आहे.

मित्रांनो जर तुम्हाला बाबा काय आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला घर सोडावे लागेल. ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न कराल ना, त्यावेळी तुम्हाला पैशाची किंमत कळेल त्या वेळी तुम्हाला त्या वस्तूची किंमत कळेल आणि तुम्हाला त्या वेळी बाबांची आठवण नक्की येईल.

उपाशी असल्यावर बाबा आईला सांगायचे ना, “त्याला जेवायला वाढ, बघ तो कुठे गेला आहे” त्यावेळी अन्नाची किंमत कळत नव्हती. कष्टाची किंमत कळत नव्हती. अगदी आईकडे आवडत्या जेवणाची मागणी करायचो आपण आता तेच जेवण स्वतच्या पायावर मिळवायला जाऊ ना त्यावेळी आपणास आपले बाबा नक्की आठवतील व डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मित्रांनो अजून वेळ गेलेली नाही आपले आई-बाबा आपल्याबद्दल कधीच वाईट विचार करत नाहीत. ते नेहमी आपल्या भल्यासाठी सांगतात आणि आपण त्यांचे ऐकले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या आई-बाबांना न सांगता स्वतः जर एखादा निर्णय घेत असाल तर

लक्षात ठेवा एक दिवस तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होईल. म्हणून वेळीच सावध व्हा. आताची तुमची वेळ आहे ना करिअर करण्याची त्या वेळेचा उपयोग करून घ्या, आहे त्या परिस्थिती मध्ये शिक्षण घ्या, घरी हट्ट करू नका, साधे राहा, आकर्षणाला बळी पडू नका, सायकल वापरा, खूप अभ्यास करा कष्ट करा व आई-बाबांचा आदर करा पुन्हा नाही मिळणार ही विठ्ठल रुक्माई ची जोडी!

If you like “father quotes in Marathi, Vadil status, father Shayari, वडील चारोळ्या” please share with your friends on social media.

1 thought on “{हृदयस्पर्शी} वडील चारोळ्या Baba Marathi Status Marathi Kavita Baba”

Leave a Comment